बारामतीमध्ये अजित पवार यांना फक्त विजय शिवतारे नाही तर शिंदे सेनेचा विरोध, मेसेज व्हायरल
lok sabha election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाला अनेक पातळ्यांवर लढावे लागणार आहे. कुटुंबातून विरोध होत असताना महायुतीचे पक्ष सोबत नसल्याचे चित्र समोर येत आहे. शिवसेनेकडून विजय शिवतारे यांच्यानंतर खडकवासला मतदार संघातील शिवसैनिक आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. आता हा मेसेज पाठवणारे पदाधिकारी कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बारामतीचा गड सोपा नाही. बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. एकीकडे पवार कुटुंबातील लढाईत अजित पवार यांना कुटुंबातून विरोध आहे. त्यांच्या सोबतीला परिवारातील कोणी नाही. त्याचवेळी शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी रविवारी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टाईनंतर विजय शिवतारे यांनी भूमिका सोडली नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून अजित पवार यांना विरोध सुरु झाला आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत एक मेसेज फिरत आहे. यामुळे अजित पवार अधिक अडचणीत येणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा ही विरोध सुरु झाला आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातील शिवसेनेला विचारात घेत नसल्याने शिवसैनिक नाराज आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करू या, असा मेजसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना येत आहे. हा मेसेज शिवसेनेच्या एकास व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला आहे.
अजित पवार यांना खडकवासलामधून विरोध
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाला अनेक पातळ्यांवर लढावे लागणार आहे. कुटुंबातून विरोध होत असताना महायुतीचे पक्ष सोबत नसल्याचे चित्र समोर येत आहे. शिवसेनेकडून विजय शिवतारे यांच्यानंतर खडकवासला मतदार संघातील शिवसैनिक आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. आता हा मेसेज पाठवणारे पदाधिकारी कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
बहुजन मोर्चाही रिंगणात
प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन मोर्चाच्या माध्यमातून आणखी एक ओबीसी चेहरा बारामतीच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. दौंड येथील महेश भागवत यांनी बारामती लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. बारामती मतदारसंघात जवळपास 65 टक्के ओबीसी आणि इतर मागास मतदार असून जातीय समीकरणाची गणिते जुळवून आपला विजय निश्चित होईल असा विश्वास महेश भागवत यांनी व्यक्त केलाय.