मतदानाच्या धामधुमीत बीडमध्ये मन हेलावणारी घटना, अपक्ष उमेदवाराला मतदान केंद्रावर हृदयविकाराचा झटका, लोक सुन्न!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मतदान केंद्रावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निधनाने बीडमध्ये शोककळा पसरली आहे.

मतदानाच्या धामधुमीत बीडमध्ये मन हेलावणारी घटना, अपक्ष उमेदवाराला मतदान केंद्रावर हृदयविकाराचा झटका, लोक सुन्न!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 9:01 PM

महाराष्ट्रासाठी आज मोठा दिवस होता. कारण महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीसाठी आज दिवसभर मतदान पार पडलं आहे. या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठमोठे राडे झालेले बघायला मिळाले. काही ठिकाणी बुथवर राडा झालेला बघायला मिळाला. पण तरीही लोकांनी मतदानाला उत्सफुर्त प्रतिसाद दिला. असं असताना बीड शहरात एक दुर्दैवी घटना आज घडली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असताना बीड विधानसभा मतदासंघात दुर्दैवी घटना घडली. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या तीव्र झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मतदान केंद्रावरच बाळासाहेब शिंदे यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येत उमेदवार आणि नेतेमंडळी वेगवेगळ्या बुथवर जावून मतदान योग्य होत आहे ना, कुठे गैरप्रकार होत नाही ना? याची शाहनिशा करण्यासाठी विविध पोलिंग बुथला भेट देतात. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. बाळासाहेब शिंदे हे देखील बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात पोलिंग बुथवर पाहणी करण्यासाठी आले होते. सर्व काही सुरळीत होत आहे ना? याकडे ते लक्ष देत होते. यावेळी त्यांचे कार्यकर्तेदेखील त्यांच्यासोबत होते.

या दरम्यान, अचानक बाळासाहेब शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हा झटका आल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे पोलिंग बुथवर एकच खळबळ उडाली. त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला. तसेच मतदारही नेमकं काय घडलं? हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे धावत आले.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब शिंदे यांची प्रकृती जास्त गंभीर असल्याने त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांना बीड शहारातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथून त्यांना लगेच छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे बीड शहरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे बाळासाहेब शिंदे यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.