Pankaja Munde | परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात! खून, मारामारी, महिला अत्याचार त्रासदायक, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली चिंता

पोलिसांसह प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर टीका केली

Pankaja Munde | परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात! खून, मारामारी, महिला अत्याचार त्रासदायक, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली चिंता
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 12:13 PM

मुंबईः गेल्या काही महिन्यांपासून परळी शहर (Parali) आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. खून, मारामाऱ्यांसारख्या घटानंमुळे परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलीस आणि सत्ताधाऱ्यांचा कसलाही अंकुश या भागात राहिला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. मुंबईत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सातत्याने वाढणाऱ्या घटनांमुळे कायद्याचा गुन्हेगारांवर काही धाक राहिलाय की नाही, अशी स्थिती आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पोलिसांसह प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर टीका केली आहे.

शनिवारी युवकाची हत्या

शनिवारी परळी शहरता शैलेश राजनाळे या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परळीत खळबळ माजली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला असला तरीही घटनेतील मारेकरी अद्याप फरार आहे. शुक्रवारी मिरवट येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचाराची घटना घडली. आधीही अनेक महिन्यांपासून खून, मारामाऱ्या, महिला अत्याचार, धमकावण्यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. शहरात अशा घटनांचा उद्रेक जास्त आहे. त्यामुळे कायदा व पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक गुन्हेगारांना राहिला नाही, असंच चित्र असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. अशा घटनांमुळे सर्व सामान्य नागरिक दहशतीखाली वावरत असून ही गंभीर बाब आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माजलगावात युवकावर हल्ला

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अन्य एका घटनेत युवकावर हल्ला झाला. सोमठाणा गावातील एका मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एका तरुणावर गावगुंडांनी हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात तिघांना मार लागला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात दहा जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सोमठाणा येथे 29 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. रात्री गावात मिरवणूक निघाली असता नाचण्यावरून वाद झाला. या हल्ल्यात राजरतन किसन भालेराव, मदन भालेराव आणि सोहम माणिक भालेराव यांना गंभीर मार लागला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.