Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणाचा गुंता वाढला, आरोपीला भेटला संतोष देशमुखांचा भाऊ?आणखी एक CCTV फुटेज समोर

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख एकत्र चर्चा करताना दिसत आहेत. पहिल्या फुटेज आणि या नवीन फुटेजमध्ये फक्त ४ मिनिटांचे अंतर आहे. यामुळे हत्या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणाचा गुंता वाढला, आरोपीला भेटला संतोष देशमुखांचा भाऊ?आणखी एक CCTV फुटेज समोर
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणाचा गुंता वाढला, आरोपीला भेटला संतोष देशमुखांचा भाऊ?आणखी एक CCTV फुटेज समोर
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 5:36 PM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दुसरा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे एकत्र एकाच टेबलवर समोरासमोर बसले असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या व्हिडिओत आणि दुसऱ्या व्हिडिओत केवळ 4 मिनिटांचा अंतर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पण नेमकं काय घडलं आहे? पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख नेमके का भेटले? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांचा केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेलमधला सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता दुसरा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्या दोघांसोबत चर्चा करत आहे.

पहिल्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये अवघ्या 4 मिनिटांचा अंतर आहे. दरम्यान आता हा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे चर्चा करताना दिसत असल्याने या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत.

हे सुद्धा वाचा

रोहित पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मस्साजोग गावात जावून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली. “अतिशय भीतीदायक आणि अमानवीय घटना संतोष देशमुख यांच्यासोबत 9 तारखेला घडली. या घटनेत मोठ्या लोकांचा हात आहे. हे सामान्य लोकांना देखील पटलेले आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात पवनचक्की प्रकल्पावर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.