Beed : बीडमध्ये महिलांंचं भाकरी थापून अनोखं आंदोलन, विलीनीकरणावर तोडगा नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार
बीडमध्ये संप सुरू ठेवत महिलांनी रत्यावर भाकरी थापत अनोखं आंदोलन केलंय. भाकरी थापत आंदोलन करुन त्यांनी सरकारचा निषेध नोंदवलाय. नगरमध्ये पैठण, श्रीरामपूर आणि नगरकडे जाणाऱ्या बसेसवर दगडफेक झाली आहे.
बीड : एसटीचा संप चिघळला असला तरी काही ठिकाणी अजूनही संप सुरूच आहे. बीडमध्ये संप सुरू ठेवत महिलांनी रत्यावर भाकरी थापत अनोखं आंदोलन केलंय. भाकरी थापत आंदोलन करुन त्यांनी सरकारचा निषेध नोंदवलाय. विलीनीकरणाच्या मागणीवर बीडमधील महिला वाहक कर्मचारी ठाम आहेत. सरकारनं आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. उद्या आमचा पगार नाही झाला तर आमच्या मुलांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सकारनं आम्हाल वाऱ्यावर न सोडता लवकर विलीनीकरणावर तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी इथल्या महिला कर्मचाऱ्यांनी केलीय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट पडली आहे. राज्य सरकारनं पगारवाढ करून संप मागे घेण्याचं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केलं होती. त्यावर तोडगा म्हणून सरकारडून 41 टक्क्यांची ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. त्यानंतर काही कर्मचारी संप मागे घेत कामावर रूज झाले आणि बऱ्याच दिवसांच्या संपानंतर लालपरी पुन्हा रस्त्यावर दिसू लागली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. मात्र काही कर्मचाऱ्यांनी विलीकरणावर ठाम राहत अजून संप सुरू ठेवला आहे. त्यामुळे संपात उभी फूट पडल्याचं दिसून आलं.
संपावरून जोरदार राजकारण तापलं
नगरमध्ये पैठण, श्रीरामपूर आणि नगरकडे जाणाऱ्या बसेसवर दगडफेक झाली आहे. यावरून जोरदार राजकारण तापलं आहे. कोणत्याही महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसतं. भाजप आंदोलकांना भडकवत आहे. अशी टीका राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तर भाजपकडूनही सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानं या दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.