AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हमालाची मुलगी बनली अधिकारी; MPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

परळीच्या आरती बोकरेनं तिच्या मेहनतीच्या जोरावर इतकं मोठं यश प्राप्त केलं आहे. आरतीचे वडील हमाल असून आई कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या आरतीने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हमालाची मुलगी बनली अधिकारी; MPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
आरती बोकरे बनली अन्न व औषध अधिकारीImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 28, 2025 | 2:04 PM
Share

जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर कोणतंही लक्ष्य साधता येतं. राज्यातील परळी शहरातल्या एका अत्यंत सामान्य कुटुंबातल्या आरती बोकरेनं हे सिद्ध करून दाखवलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत आरतीला कमालीचं यश मिळालं असून ती आता अन्न व औषध अधिक अधिकारी बनली आहे. आरतीने 2023 मध्ये ही परीक्षा दिली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. हा निकाल पाहून केवळ आरती आणि तिचे कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण परळी शहरवासी आनंदी झाले आहेत. आरती बोकरे ही परळी शहरातील भीमनगरमधील सर्वसामान्य कुटुंबातील असून तिचे वडील एका खाजगी दुकानात हमाल म्हणून काम करतात. तर तिची आई महापारेषण वीज पुरवठा केंद्रात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते. कोणत्याही क्लास आणि कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आरतीने स्वत:च्या बळावर हे यश संपादित केलं आहे.

आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटावा असं काहीतरी करण्याची इच्छा आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द मनाशी बाळगून आरतीने 2023 मध्ये स्पर्धा परीक्षा दिली होती. विविध क्लासेस आणि अनुभवी शिक्षकांची मदत मिळूनही भल्याभल्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नाही. मात्र आरतीने फक्त मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिचं स्वप्न पूर्ण केलं. लोकसेवा आयोगामार्फत तिला अन्न आणि औषध विभागाची जवाबदारी मिळणार असून परळी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा आरतीने रोवला आहे.

आरतीच्या या यशाचा परळीकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना अभिमान आहे. भीमनगरमधील अनेक विद्यार्थी आणि मुलींना तिचा आदर्श मिळणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन तिने ही गरुड झेप घेतली आहे. जिद्दीच्या जोरावर आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करू तिने स्वतःचं आणि समाजासाठी काम करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या वाटचालीत तिच्या कुटुंबाने तिची पूर्ण साथ दिली. आरतीला कशाचीही कमी पडू न देता तिच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे राहिले. या यशाबद्दल आरतीचं सर्वच स्तरांततून कौतुक होत आहे.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.