Anil Deshmukh | जेलमध्ये जाण्यापूर्वी काय घडलं होतं? अनिल देशमुख यांनी आतली बातमी सांगितली, नेमका दावा काय?

अनिल देशमुख यांनी बीडमधील कार्यक्रमात भाजपवर सडकून टीका केली. आपल्याला खोट्या गुन्ह्याखाली अडकवून 14 महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं. पण नंतर आपल्यावर आरोप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने कोर्टात जबाब दिला. आपल्याला अटक करण्याआधी नेमकं काय विचारण्यात आलं होतं, याबाबतची माहिती अनिल देशमुख यांनी आजच्या भाषणात दिली.

Anil Deshmukh | जेलमध्ये जाण्यापूर्वी काय घडलं होतं? अनिल देशमुख यांनी आतली बातमी सांगितली, नेमका दावा काय?
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 6:39 PM

बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार यांच्या भाषणाआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाषण केलं. अनिल देशमुख यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असताना शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी याबाबतचे आरोप केले होते. या आरोपांप्रकरणी अनिल देशमुख तब्बल 14 महिने जेलमध्ये होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्यांची जेलमधून सुटका झाली. त्यानंतर आज बीडमध्ये जाहीर सभेत त्यांनी त्यावेळी घडलेल्या घडामोडींची आठवण सांगितली.

‘मला खोट्या प्रकरणात फसवलं’

“मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो. मला खोट्या प्रकरणात फसवण्यात आलं. केस कोर्टात गेली. माझ्यावर ज्या परमवीस सिंहने शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता, मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनीच जस्टीस चांदिवालच्या कोर्टात सांगितलं की, अनिल देशमुखांवर मी जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत. मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केले, असं त्यांनी कोर्टात सांगितलं. त्यावर हायकोर्टाने निर्णय दिला आणि मी तब्बल 14 महिन्यांनी जेलमधून बाहेर पडलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

जेलमध्ये जाण्यापूर्वी तडजोडीचा प्रस्ताव

“मी तुम्हाला सांगू इच्छितो 14 महिने मी आर्थर रोड जेलमध्ये होतो. एक चुकीच्या केसमध्ये, चुकीचा आरोप करुन मला फसवण्यात आलं होतं. मला तडजोड करण्याचा सल्ला देण्यात आलेला. मी तडजोड करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला जेलमध्ये टाकण्यात आलं. मी 14 महिने जेलमध्ये होतो. पण शरद पवार यांच्या आशीर्वादाने बाहेर आलोय. 14 महिने जेलचा भत्ता खावून बाहेर आलोय. कुणी माय का लाल अनिल देशमुखला मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही”, असंही ते म्हणाले.

‘पाच महिन्यात महाराष्ट्रात जवळपास 19553 महिला आणि मुली बेपत्ता’

“हे सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही. हे सरकार शेतकऱ्यांचं नुकसान करणारं आहे. या सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात, पण गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्रात जवळपास 19553 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तुम्ही विश्वास ठेवाल? ही शासकीय आकडेवारी आहे. अशाप्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे”, असं देशमुख म्हणाले.

“संविधानिक संस्था ईडी, सीबीआय यांचा दुरुपयोग करणं सुरु आहे. राजकीय पक्ष कशाप्रकारे अडचणीत येतील, सरकार विरोधात बोलणाऱ्याचा आवाज कशाप्रकारे दाबता येईल, या पद्धतीचा प्रयत्नसुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरु आहे”, अशी टीका अनिल देशमुखांनी केली.

‘मविआचं शंभर टक्के सरकार येईल’

“आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं शंभर टक्के सरकार येईल. तीनही पक्षांनी एकमेकांना सहकार्य केलं तर मविआचं सरकार येईल. तसेच लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येतील. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याबाबत लोकांच्या मनात सहानुभूती आहे. हे तीनही लोकं जेव्हा महाराष्ट्रात फिरतील तेव्हा इंडिया आघाडीला देशात यश आल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.