दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय, पंकजांकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन
अंबाजोगाी येथील दीनदयाळ नागरी बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बँकेवर माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. पंकजा मुंडे यांची एकहाती सत्ता आली आहे.
बीड: अंबाजोगाी येथील दीनदयाळ नागरी बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बँकेवर माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. पंकजा मुंडे यांची एकहाती सत्ता आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होती. यापैकी चार जागा या बिनविरोध निवडूण आल्या, तर उर्वरित जागांसाठी आटीतटीचा सामाना झाला. या लढीमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा गट विजयी झाला आहे.
दहा जागांवर पंकजा मुंडे समर्थक विजयी
या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना मोठे यश मिळाले आहे. 15 जागांसाठी ही निवडणूक होती. मात्र यातील चार जागांवरील उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले. बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे, शरयू हेबाळकर, किशन पवार, जयकरण कांबळे यांचा समावेश आहे. दहा जागांवर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी विजयी मिळवला आहे. विजयानंतर उमेदवारांनी एकच जल्लोष केलेल्याच पहायला मिळाले. दरम्यान विजयानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
विजयी संचालकांना मिळालेली मते
मकरंद कुलकर्णी (2497), राजाराम धाट ( 2494), बाळासाहेब देशपांडे (2453), विवेक दंडे (2453), मकरंद पत्की (2441), चैनसुख जाजू (2403), राजेश्वर देशमुख (2385), बिपिन क्षीरसागर (2374), अशोक लोमटे (2334), विजयकुमार कोपले (2314), राजाभाऊ दहिवाळ (2375)
दीनदयाळ नागरी बँकेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये “दीनदयाळ पॅनलचे” सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे आणि संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 3, 2022
संबंधित बातम्या
Video : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरूणीकडून मारहाण, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर
Ravi Pujari: छोटा राजनचा हस्तक सुरेश पुजारी विरोधात मुंबई एटीएसकडून नवीन गुन्हा दाखल
पोलिसांना शिवीगाळ करणं भोवलं, भंडाऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक