AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Accident | कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक; काकू-पुतण्या ठार, सून जखमी

ओवरटेकच्या नादात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव येणाऱ्या ट्रेलरने चिरडले. कारधा पुलावर हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय. कारधा पूल अपघाताचे ठिकाण ठरत आहे.

Bhandara Accident | कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक; काकू-पुतण्या ठार, सून जखमी
याच ट्रेलरच्या धडकेत दोघांचा जीव गेला. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 11:45 AM
Share

तेजस मोहतुरे

भंडारा : ओव्हरटेकच्या नादात दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तींना भरधाव येणाऱ्या टिप्परने चिरडले (Tipper crushed). ही घटना भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावर घडली. झालेल्या अपघातात एका महिलेचा व चालक तिच्या पुतण्याचा मृत्यू झाला. सुशीला कागदे (वय 60 ) व विष्णू कागदे (वय 45) हे ठार झालेत. सुनिता कागदे या जखमी आहेत. त्यांना भंडारा सामान्य रुग्णालयात (Bhandara General Hospital) दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. मृतक व जखमी हे मालीपार चांदोरी येथील रहिवासी आहेत. तिघेही चांदोरी मालीपार (all three at Chandori Malipar) येथील दुचाकीने कोरंभी येथे हरभरा कापणीसाठी जात होते. कामानिमित्त दुचाकीवरील तिघेही भंडाऱ्याच्या दिशेने जात होते. दुचाकीने ट्रकला ओव्हरटेक केले. मात्र विरुद्ध दिशेकडून गाडी येत असताना अचानक दुचाकी चालकाने ब्रेक लावला. त्यामुळं मागून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली.

अपघातानंतर वाहतूक खोळंबली

धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील एक महिला जागीच ठार झाली. चालक नागपूरला रुग्णालयात दाखल करताना गेला. सुनिता कागदे या गंभीर जखमीवर भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही नागपूरला उपचारासाठी आणण्यात येत होते. अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती. वैनगंगा नदीवरील पुलावर अपघात नेहमीच होत असतात. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारात हा अपघात झाला.

ओव्हरटेक करणे जीवावर बेतले

ट्रेलरच्या धडकेत तिघेही चाकाखाली आले. सुशिला यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय चालकही गतप्राण झाला. विष्णूचा नागपूरला रुग्णालयात आणत असताना मृत्यू झाला. दुचाकीचालकानं घाई केली नसती तर कदाचित हा अपघात टाळता आला असता. त्यामुळं वाहन चालविताना सांभाळून चालवावे लागते. ओव्हरटेकचा मोह दोघांच्या जीवावर बेतला. तिसरीहीची प्रकृती गंभीर आहे.

Lady Conductor Murder | नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक

वीज कर्मचाऱ्यांचं पुण्यात आंदोलन, मेस्माविरोधात एकजूट; संप नको चर्चेतून तोडगा काढू : नितीन राऊत

Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.