Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

मुंबईसह राज्यात सकाळपासून काय सुरू आहे आणि काय बंद याचे संपूर्ण अपडेट

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 8:00 AM

मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशभराच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही राजकीय पक्षांसह सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बंदसाठी महाराष्ट्रातील 5 महत्त्वाच्या बाजारपेठा बंद असणार आहेत. पण असं असलं तरी नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. (bharat bandh farmers protest this milk and vegetables market are open in mumbai nagpur maharashtra update)

भारत बंदमुळे मुंबईत दूध पुरवठ्यावर काही परिणाम होणार आहे का ? याचा आढावा घेण्यासाठी टिव्ही 9 ची टीम अनेक ठिकाणी पोहोचली. यामध्ये मुंबईसह सर्व उपनगरांमध्ये दूध पुरवठा सुरळीत आहे. आरे, महानंद, अमूलसारख्या दुधाचा पुरवठा आणि विक्री नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर मुंबईत बाहेरुन येणारे दुधाचे टँकरसुद्धा पोहोचत आहेत. त्यामुळे मुंबईत दुधाच्या पुरवठ्यावर विशेष काही फरक पडलेला दिसत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दादरमध्ये भाजी मार्केट आणि वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. फूल मार्केटही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर नवी मुंबईत मात्र एपीएमसी मार्केट बंद आहे. नागपूरमध्येही धान्य मार्केट बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र, भाजी मार्केट सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर रस्त्यावर टॅक्सी, बसेस सुरू आहेत. पण बंदच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा सकाळपासूनच कडक बंदोबस्त मुंबईत पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईत पाचही बाजार समित्या बंद

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले असून, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या असून नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकाऱ्यांसोबत माथाडी कामगारांचा देखील रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

पुण्यातही कडकडीत बंद

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे. एरवी दररोज किमान 900 मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. हमालही सहभागी झाले असल्याने मार्केटमध्ये शांतता दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आज बंद

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.  भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सर्व व्यवहारही ठप्प आहेत.  लासलगाव, पिंपळगाव, नाशिक, मनमाड, देवाळा यासह इतर बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प आहेत.

रत्नागिरी- कृषी कायद्याविरोधात भारत बंदची हाक

रत्नागिरीतील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यरात्रीपासून बंदत सहभागी झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मख्य प्रवेश द्वाराला कुलूप लावण्यात आलं आहे. दरोरोज शेकडो टनाचे होणारे लिलाव आज पुर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत.  पहाटेपासून कुठलेच लिलाव झाले नसून पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला घेवून येणाऱ्या गाड्यादेखील आल्या नाहीत.

बुलढाण्यात नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली

दरम्यान, शेतकऱ्यांच्या भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे. ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळपासून रस्त्यावर उतरली आहे. सकाळी 6.40 वा. चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकर सह कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली त्यामुळे ‘स्वाभिमानी’ आणि पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. (bharat bandh farmers protest this milk and vegetables market are open in mumbai nagpur maharashtra update)

इतर बातम्या – 

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

कृषी कायद्यावरुन भाजप Vs पवार, पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत फडणवीसांकडून घेरण्याचा प्रयत्न

(bharat bandh farmers protest this milk and vegetables market are open in mumbai nagpur maharashtra update)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.