AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Bandh today : ‘7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा’

सोशल मीडियावर अशी घोषवाक्य शेअर करून बंदमध्ये सामील होण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे.

Bharat Bandh today : '7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा'
| Edited By: | Updated on: Dec 08, 2020 | 8:27 AM
Share

सोलापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची (Bharat Bandh today) हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रातूनही (Maharashtra) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. राजकीय पक्षांसह सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी कडकडीत बंद पाळत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी सोलापूरमध्ये या बंदसाठी काही भन्नाट घोषवाक्य वापरण्यात आली आहेत. (Bharat Bandh today amid farmer protests maharashtra update mumbai pune news)

भारत बंदमध्ये सामील होण्यासाठी समाज माध्यमांमध्ये भन्नाट घोषवाक्य व्हायरल झाली आहेत. ‘7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा’ हे घोषवाक्य आज बंदच्या निमित्ताने व्हायरल होताना दिसत आहे. इतकंच नाही तर ‘वावर हाय तर पावर हाय’ अशाही घोषणा आंदोलक देत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अशी घोषवाक्य शेअर करून बंदमध्ये सामील होण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. आज संपूर्ण देशभरात कडकडीत बंद पुकारण्यात आला. शेतकरी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण नेमक्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत? कोणते कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. आपण समजून घेऊयात नेमका सरकारने पारित केलेला कृषी कायदा काय आहे?, शेतकऱ्यांचा या कृषी कायद्याला विरोध का आहे?

कोणते कृषी कायदे वादग्रस्त?

1) कृषी उत्पादने, व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 2) हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020 3) जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020

शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?

1) तिन्ही कृषी कायदे मागे घ्या 2) हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा 3) किमान हमी भावाचा कायदा करा 4) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा 5) सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा 6) कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा 7) राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा

शेतकऱ्यांना कशाची चिंता?

1) हमी भाव राहील असे सरकार तोंडी म्हणतंय, त्याची खात्री नाही 2) सरकार हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंद करेल 3) खाजगी कंपन्या हमी भावाने शेतमाल घेतील याची खात्री नाही 4) कृषी कायद्यांमुळे खाजगी कंपन्यांची खरेदी दरात मनमानी होईल 5) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी यंदापासून राज्यांना बंद 6) शक्तीशाली कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करतील, फसवतील (Bharat Bandh today slogan viral on social media for bharat bandh and farmers protest maharashtra news)

इतर बातम्या – 

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

(Bharat Bandh today slogan viral on social media for bharat bandh and farmers protest maharashtra news)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.