शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे उघड आव्हान, चार पक्षांचे निमंत्रण मिळाल्याचा दावा

Lok Sabha Election Maharashtra Politics: एकनाथ खडसे यांना ज्या प्रकारे भाजपने सुद्धा दारापुढे उभा करून ठेवला आहे. त्याच प्रकारे शरद पवार यांनीही त्यांना दारापुढे उभं करावे. शरद पवार यांना धोका देणाऱ्या एकनाथ खडसे यांचा आधी राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी संतोष चौधरी यांनी केली.

शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे उघड आव्हान,  चार पक्षांचे निमंत्रण मिळाल्याचा दावा
sharad pawarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 8:39 AM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राजकीय पक्षांना आयाराम गयारामचा सामना करावा लागत आहे. तिकीट न मिळणारे उमेदवार दुसऱ्या पक्षाची साथ घेत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या पक्षातून दोन दिवसांपूर्वी आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रकरणाचा फटका बसणार आहे. शरद पवार यांचे निष्ठावंत राहिलेले माजी आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आपणास चार पक्षांची ऑफर असल्याचे सांगत त्यांनी शरद पवार यांना उघड आव्हान दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर करताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

चार पक्षांकडून ऑफर असल्याचा दावा

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी न मिळालेले नाराज आहेत. रावेर लोकसभेचे तिकीट काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आलेले श्रीराम पाटील यांनी तिकीट मिळाले. संतोष चौधरी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडणार असल्याचे सांगितले. आता ते प्रहारचे नेते बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे. चार, चार पक्षाचे निमंत्रण मला आहेत. तेही चार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचे निमंत्रण आहेत. मी मुंबईवरून दिल्ली जाणार आहे. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी शरद पवार साहेबांना भेटून पुढचा निर्णय घेईल, असे संतोष चौधरी यांनी म्हटले आहे.

खडसे यांच्यावर घाणाघाती आरोप

रावेर लोकसभेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून निश्चित झाला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनचं श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाली, असा दावा संतोष चौधरी यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ खडसे यांच्या पायगुणामुळे गेले. खडसे राष्ट्रवादीत आले नसते तर हे सरकार गेले नसते. बारा आमदारांची यादी देखील थांबली ते देखील खडसे यांच्या नावामुळे थांबली आहे. खडसे माणूसच कुरापती करणारा आहे, असा आरोप संतोष चौधरी यांनी केला.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांनी खडसे यांचा राजीनामा घ्यावा

एकनाथ खडसे यांना ज्या प्रकारे भाजपने सुद्धा दारापुढे उभा करून ठेवला आहे. त्याच प्रकारे शरद पवार यांनीही त्यांना दारापुढे उभं करावे. शरद पवार यांना धोका देणाऱ्या एकनाथ खडसे यांचा आधी राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी संतोष चौधरी यांनी केली.

एकनाथ खडसे यांच्या 137 कोटी रुपयांच्या प्रकरणाला स्टे का? असा प्रश्न करत ते म्हणाले, एकनाथ खडसे यांना मी जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. खडसे यांनी किती जणांना जेलमध्ये टाकले आहे, ते विसरले का? असा सवाल संतोष चौधरी यांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.