AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासेही बर्ड फ्लूनं दगावतायत? लातूरात हजार मासे दगावले; तपास सुरू!

कोंबड्या, कावळे, पोपट आणि मधमाशांमध्ये बर्ड फ्लू आढळल्याने एकच खळबळ उडालेली असतानाच लातूरमध्ये एक अजबच प्रकार बघायला मिळाला आहे. (Bird flu scare: thousand fish found dead in latur)

मासेही बर्ड फ्लूनं दगावतायत? लातूरात हजार मासे दगावले; तपास सुरू!
| Updated on: Jan 31, 2021 | 5:52 PM
Share

लातूर: कोंबड्या, कावळे, पोपट आणि मधमाशांमध्ये बर्ड फ्लू आढळल्याने एकच खळबळ उडालेली असतानाच लातूरमध्ये एक अजबच प्रकार बघायला मिळाला आहे. लातूरमध्ये एका शेततळ्यात हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं आहे. अज्ञात रोगामुळे हे मासे मेले असल्याचं सांगण्यात येत असलं तरी स्थानिकांमध्ये मात्र बर्ड फ्लूमुळेच हे मासे दगावले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बर्ड फ्लूमुळे मासेही दगावत असल्याची अफवा किल्लारीवाडी येथे पसरली आहे. (Bird flu scare: thousand fish found dead in latur)

लातूर जिल्ह्यातील किल्लारीवाडी परिसरात ही घटना घडली आहे. निळकंठ बिराजदार या शेतकऱ्याने त्यांच्या शेततळ्यात मत्स्यपालन केले होते. त्यांनी कतला, सूपर, मिरगल, राहू, सिल्व्हर आदी प्रजातीचे सहा हजार मासे शेततळ्यात सोडले होते. पण काल अज्ञात आजाराने जवळपास एक हजार मासे दगावले आहेत. हे मासे कोणत्या आजाराने दगावले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र कोरोनामुळेच मासे दगावले असावेत अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तसेच हे मासे कशामुळे दगावले याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे.

पाच जिल्ह्यात बर्ड फ्लू

दरम्यान, राज्यात मुंबई, ठाणे, परभणी, दापोली आणि बीडसारख्या भागामध्ये गिधाड, बगळे, कावळे, पोपट, कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. परभणीतील मुरुंबा येथे 800 कोंबड्या मरण पावल्या होत्या. परभणी जिल्ह्यातील मरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे मरुंबा येथील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने या गावाला प्रतिबंधक क्षेत्र म्हणूनही जाहीर करण्यात आलं होतं. तसेच या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच कोंबड्यांची वाहतूक करण्यासही मनाई करण्यात आली होती. या शिवाय या गावात अंडी खरेदी करण्यासही मनाई करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यातील कुपटा या गावात सुद्धा 500 कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कुपटा येथेही कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीस मनाई करण्यात आली होती. (Bird flu scare: thousand fish found dead in latur)

संबंधित बातम्या:

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Bird Flu Alert |  ‘बर्ड फ्लू’पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा

(Bird flu scare: thousand fish found dead in latur)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.