भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना

ऐन महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना नाशिकमध्ये भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून, विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील संघर्षाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 11:26 AM

मनोज कुलर्णी, नाशिकः ऐन महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना नाशिकमध्ये भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून, विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील संघर्षाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (BJP against BJP in Nashik, match before municipal elections, peace among the opposition)

नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपने उठवत महापालिकेत सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने जिंकल्या. शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आकडा अवघ्या 5 जागांवर आला. आता आगामी निवडणुकीमध्ये विरोधक चवताळून उठतील आणि एकेक मुद्दे हाती घेतील, अशी शक्यता होती. मात्र, तूर्तास तरी नाशिकमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरुद्ध पक्षातील भाजप आमदार, सभागृह नेते, नगरसेवक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

आमदारांनी डागली तोफ

एकंदर सध्या नाशिक महापालिकेमध्ये भाजप सशक्त पक्ष आहे, पण गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना पक्षातील आमदार आणि स्थानिक नेत्यांकडून घरचा आहेर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या मुद्द्यावरून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडले होते. ही कुजबुज शमते न शमते तोच आमदार फरांदे पुन्हा आक्रमक झाल्या. त्यांनी शहरातील खड्डे भरण्यावरून पुन्हा एकदा महापालिकेतील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. इतकेच नाही, तर या खड्डे भरण्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणीच त्यांनी थेट महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली. त्यांनी आयुक्तांना एक खरमरीत पत्र लिहिले. या पत्राची चर्चा अजूनही सुरू आहे. पत्रात आमदार फरांदे यांनी म्हटले आहे की, ‘नाशिक शहरामध्ये पावसामुळे पडलेले खड्डे भरण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. दोन दिवसांत खड्डे भरलेल्या जागी पुन्हा खड्डे पडत आहेत. खड्ड्यातील कच बाहेर आल्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. या कामात केवळ कंत्राटदाराचा फायदा हाच उद्देश असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाची आपण स्वतः पाहणी करावी व चौकशी करावी. काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादी टाकावे. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या खड्डे भरण्याच्या कामाची जोपर्यंत आयुक्त स्वतः पाहणी करून याबाबत अहवाल देत नाहीत, तोपर्यंत कंत्राटदाराची बिले देण्यात येऊ नयेत.’ या पत्राने पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे.

सभागृह नेते, नगरसेवक आक्रमक

आमदारांच्या पत्राने पक्षांतर्गत उठलेले वादळ शमते न शमते तोच महापालिकेतील सभागृह नेते कमलेश बोडखे यांनी आपल्याच सत्ताधाऱ्यांवर रस्त्यांच्या प्रश्नांवरून टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे बोडखे स्वतःही महापलिकेतील महत्त्वाच्या पदावर आहेत. सध्या नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्ते बुजविण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते फक्त मुरूम टाकून बुजविण्यात येत आहेत. यात कंत्राटदार चलाखी करत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी त्रयस्थांमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे विद्युत विभागावरून भाजपचेच नगरसेवक मुकेश शहाणे आणि महिला व बालकल्याण योजना रखडल्यामुळे स्वाती भामरे आक्रमक झाल्या. त्यानंतर जगदीश पाटील यांनी टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली.

विरोधक नेमके काय करत आहेत?

ऐन महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. शिवसेनेचे बऱ्यापैकी नगरसेवक आहेत. मात्र, दुबार मतदार नोंदणीशिवाय त्यांनी अजून तरी स्थानिक प्रश्नांना हात घातलेला दिसत नाही. काँग्रेसच्या गोटात सामसूम आहे. मनसेमध्ये राज ठाकरे यांनी दौरा करून वातावरण तापवले. मात्र, त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यर्त्यांना आक्रमक व्हा, लढा असा संदेश द्यायच्या ऐवजी सारी जबाबदारी लोकांच्या गळ्यात मारली. आता रहाता राहिला राष्ट्रवादी काँग्रेस. या पक्षाची मुख्य फळी तूर्तास तरी शांत दिसते आहे. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. रस्तेप्रश्न त्यांनी सातत्याने लावून धरला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी त्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यातच श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले.

भाजपची तिरकी चाल ?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधक शांत आहेत. याचाच फायदा भाजप घेण्याचा प्रयत्न करत नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. सत्ताधारी तर भाजपचेच आहेत. मात्र, विरोधकांची जागाही भरून काढायची. महत्त्वाच्या प्रश्नांवर विरोधकांपूर्वी आपणच आंदोलन करायचे आणि विरोधकांच्या हातचे मुद्दे पळवायचे, असा एक कलमी कार्यक्रम असू शकतो. काहीही असो, येणाऱ्या काळात हा राजकीय धुरळा रंगणार यात शंकाच नाही. (BJP against BJP in Nashik, match before municipal elections, peace among the opposition)

इतर बातम्याः

आनंदवार्ताः नाशिकमध्ये नोकरीच्या 227 संधी; 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिकमध्ये वाढत्या रुग्णांची चिंता, लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भुजबळांच्या प्रशासनाला सूचना

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.