किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री; घराभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
सोमय्या यांच्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असा दावा सोमय्या यांनी केलाय.
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय. (kirit somaiya has been detained by maharashtra police banned entry in kolhapur district)
किती दिवस डांबून ठेवणार, घोटाळे बाहेर काढणारच
“हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
मला अडवलं तरी मी कोल्हापूरला जाणार
राज्य सरकारने माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. माला कोल्हापूरला जाऊ दिले जात नाहीये, असा दावा केलाय. तसेच मला कोणीही कितीही अडवले तरी कोल्हापूरला जाणारच असं ठामपणे सांगितलं आहे. हसन मुश्रीफ हादरले आहेत. मुश्रीफ यांनी भ्रष्टाचाराचे 98 कोटी रुपये आपल्या संस्थेत तसेच कारखान्यात गुंतवले आहेत. मी उद्याच कोल्हापुरात जाऊन कारखान्याची पाहणी करणार होतो. पण त्यांनी कोल्हापूरला 144 लावली. त्यानंतर ठाकरे यांनी माझा दौरा प्रतिबंधित केला आहे. तसेच वळसे पाटील यांनीही माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. पण हे घोटाळेबाज सरकार आहे. काही झाले तरी मी कोल्हापूरला जाणारच, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सोमय्या यांना स्थानबद्ध केलं, राज्य सरकारचा निषेध- फडणवीस
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकाऊन सांगितलंय.
We strongly condemn the illegal detention of Former MP @KiritSomaiya ji & we will continue to our fight against MVA. माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.#KiritSomaiya
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2021
इतर बातम्या :
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट, भाविकांविना साजरे होणार विधी
ठाण्यात बाप्पाला निरोप… विसर्जन स्थळांवर गर्दी; पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?https://t.co/UfgaCHvuSo #CaptAmarinderSingh | #PunjabCongress | #NavjotSinghSidhu | #SunilJakhar | #Congress | #AmbikaSoni | #sukhjindersinghrandhawa
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
(kirit somaiya has been detained by maharashtra police banned entry in kolhapur district)