अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग, मनसे नेता ही उपस्थित

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर आला आहे. निवडणुकीच्या निकालाआधी जुळवाजुळव सुरु झाली आहे. बंडखोर आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळावा म्हणून संपर्क सुरु झाला आहे. जर कांटे की टक्कर झाली तर अपक्ष आणि बंडखोर किंग मेकर ठरु शकतात. त्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे.

अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग, मनसे नेता ही उपस्थित
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 3:40 PM

भाजप महायुतीची बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर असणार आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं जबाबदारी वाटून दिली आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रमुख नेत्यांकडून आढावा घेतला. बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड , प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि चित्रा वाघ उपस्थित होत्या. प्रत्येक नेत्याला एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय मंगलप्रभात लोढा, भूपेंद्र यादव आणि पराग शाह, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मिहिर कोटेचा हे नेते देखील उपस्थित होते. उद्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्र्यांचे गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते, पदाधिकारी आणि उमेदवार सागर बंगल्यावर उपस्थित होते. विशेष म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर देखील सागर बंगल्यावर दिसून आले.

एक्झिट पोलमध्ये महायुतीचं सरकार येणार असल्याचं संकेत आहेत. पण तरी देखील काहीज जागा कमी पडल्या तर आधीच जुळवाजुळव सुरु आहे. महाविकासआघाडीने देखील बैठका घेणं सुरु केले आहे. आता काही तासातच निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सत्ता नेमकी कुणाच्या हातात जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दुपारी दोन पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीची देखील नजर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.