‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात’

'एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी मी आलो आहे. माझ्या भविष्यात मला त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लागणार आहे' असंही अमोर मिटकरींनी म्हटलं आहे.

'भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात'
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 10:51 PM

जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगावला जाताच आज एकनाथ खडसे यांनी अमोल मिटकरी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात झाली आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपसाठी काऊनडाऊन सुरू झाला’ अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अशात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर घणाघात केला आहे. (BJP free Maharashtra start after Eknath Khadse joins NCP said by amol mitkari )

‘एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी मी आलो आहे. माझ्या भविष्यात मला त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लागणार आहे’ असंही अमोर मिटकरींनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने महाराष्ट्र भाजप मुक्त होण्यासाठी सुरुवात झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.

IND vs AUS: केएल राहुलचं प्रमोशन, भारतीय क्रिकेट संघाचा बनला उपकर्णधार

अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार असून आज त्यांनी एकनाथ खडसे, रोहिणी खेवलकर यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर प्रथमचं मुक्ताईनगरच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. अमोल मिटकरी यांनी खडसे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.

खरंतर, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आज (26 ऑक्टोबर) एकनाथ खडसे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पाडवी यांच्यासोबत होते. यावेळी पाडवी आणि खडसे यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

एकाच गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला मिळवा 19 हजार, आयुष्यभर होईल कमाई!

(BJP free Maharashtra start after Eknath Khadse joins NCP said by amol mitkari )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.