ठरलं! देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार? भाजप आमदार पाहा काय म्हणाले?

"भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हा मोठा आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्रातील जनतेला देखील हा आनंदाचा क्षण असणार आहे. राजकीय संस्कृतीच्या माध्यमातून भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे आले आणि अडीच वर्षांपूर्वी ज्या खिलाडू वृत्तीने जो निर्णय वरिष्ठांनी घेतला तो स्वीकारला", असं भाजप आमदार संजय केळकर म्हणाले.

ठरलं! देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार? भाजप आमदार पाहा काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस, भाजप नेतेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 5:02 PM

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा सस्पेन्स अजून संपलेला नाही. याबाबत ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हा मोठा आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्रातील जनतेला देखील हा आनंदाचा क्षण असणार आहे. राजकीय संस्कृतीच्या माध्यमातून भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे आले आणि अडीच वर्षांपूर्वी ज्या खिलाडू वृत्तीने जो निर्णय वरिष्ठांनी घेतला तो स्वीकारला. कुठेही चेहऱ्यावर भाव न ठेवता एकीच्या भावनेने आणि संघटना शरण या भावनेने तेवढ्याच जोमाने काम केलं. त्याचाच हा सर्व परिपाक आहे. जनतेने विकासाला मत दिले. महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी मत दिले”, असं संजय केळकर म्हणाले.

यावेळी संजय केळकर यांना मंत्रिमंडळ स्थापन कधी होणार? याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हा विषय काही माझा नाही. हा विषय भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांचा आणि महायुतीतील नेत्यांचा आहे. निश्चितपणे खात्री आहे की, सर्वसमावेशक मंत्रिमंडळाची वाटचाल असेल. जनहिताचे निर्णय घेणार असं भरभक्कम आणि कार्यक्षम अशाप्रकरचे सरकार आणि मंत्रिमंडळ येईल”, अशी प्रतिक्रिया दिली संजय केळकर यांनी दिली. यावेळी त्यांना शिंदे गटाला गृहमंत्रीपद हवं असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्हाला प्रत्यक्षात खर-खोटं काही माहीत नाही. यावर काही भाष्य करणे योग्य नाही. कोणत्याही मंत्रिपदाची मागणी ही होतच असते”, अशी प्रतिक्रिया दिली.

ठाण्याचे पालकमंत्री कोण होणार?

यावेळी संजय केळकर यांना ठाण्याचे पालकमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणत्याही जिल्ह्यात जनतेला वाटत असतं, कार्यकर्त्याला वाटत असतं, इथलाच पालकमंत्री असावा जो आपल्याला उपलब्ध असतो. यात काही चूक नाही”, असं मत संजय केळकर यांनी मांडलं. संजय केळकर यांना सांस्कृतिक मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, “कार्यकर्त्यांची निरनिराळी इच्छा आहे, जी जबाबदारी मला दिली जाईल ती मी समर्थपणे पेलण्याचं काम करेन”, असं केळकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संजय केळकर यांचा विरोधकांवर निशाणा

विरोधकांकडून मतदान टक्केवारीवरुन आरोप केला जातोय. यावर संजय केळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर ही मंडळी अजून त्याच्यामध्ये आहेत. मतमोजणी आणि यामध्ये, त्यांना दुसरा काही विषय नाही. खरं म्हणजे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. खोटे नरेटिव्ह सारखे वापरले तर काय फटका बसतो ते त्यांनी पाहिलं. त्यांनी बोलत राहावं, तेवढाच जनतेचा रोष त्यांना पुढच्या काळात पण पाहायला मिळेल”, असं संजय केळकर म्हणाले.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.