AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या या खासदाराचे तिकीट बदलणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक वक्तव्य

bjp candidate list 2024: रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. एकनाथ खडसे भाजपच्या राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात दाखल झाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत आमदार केले होते. परंतु त्यावेळी त्यांच्या सून रक्षा खडसे भाजपातच राहिल्या.

भाजपच्या या खासदाराचे तिकीट बदलणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक वक्तव्य
bjp
| Updated on: Mar 30, 2024 | 8:30 AM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात भाजपने आपल्या २३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्याच्या वक्तव्यामुळे भाजपच्या विद्यमान खासदारसमोर संकट निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे. रक्षा खडसे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले आहे. त्याचवेळी संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे आणखी धक्का बसणार आहे.

काय म्हणाले संजय पवार

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द होण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहे. गेल्या वेळेस प्रचार सुरू असताना स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करण्यात आलं होते. यावेळी मात्र स्मिता वाघ यांना वगळण्यात येणार नाही. मात्र रावेर मतदार संघात काहीही होऊ शकते. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी म्हटले आहे.

रावेरच्या जागेसंदर्भात सस्पेन्स वाढला

काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी रावेरच्या जागेबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. भाजप पदाधिकारी रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराजी आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतभेद उघड झाले होते. भाजपच्या गाडीत तुतारीचे कार्यकर्ते फिरत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले होते.

रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. एकनाथ खडसे भाजपच्या राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात दाखल झाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत आमदार केले होते. परंतु त्यावेळी त्यांच्या सून रक्षा खडसे भाजपातच राहिल्या. यामुळे आता रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवार देणार? यासंदर्भातही चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनाही नाराज

खासदार रक्षा खडसेंच्या विरोधात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी कायम आहे. 2014 मध्ये आम्ही शिवसैनिकांनी खासदार रक्षा खडसे यांचं काम केले. घाम गाळला. मात्र या खासदारांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यावर शुभेच्छाचे स्टेटस ठेवतो. लोकसभेत सर्व शिवसैनिकांना वाटतं मोदी साहेबांनाचं मतदान केलं पाहिजे. मात्र रावेर मतदारसंघात खडसे नावाचा अडथळा आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, असे वक्तव्य मुक्ताईनगर शिंदे गट शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटानंतर शिवसेना नाराज असल्याचे दिसून येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.