Sanjay Raut: यापुढं महाराष्ट्रात 25 वर्ष भाजची सत्ता येणार नाही, भाजपने स्वत:चीच कबर खोदली; राऊतांचा इशारा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या (central investigation team) माध्यमातून हल्ले केले जात आहेत. ते काय करू शकतात? ते आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे. आमच्यावर खुनी हल्ला करा, आमची तयारी आहे.

Sanjay Raut: यापुढं महाराष्ट्रात 25 वर्ष भाजची सत्ता येणार नाही, भाजपने स्वत:चीच कबर खोदली; राऊतांचा इशारा
भाजपने स्वत:चीच कबर खोदली; राऊतांचा इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 5:53 PM

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांच्या (central investigation team) माध्यमातून हल्ले केले जात आहेत. ते काय करू शकतात? ते आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे. आमच्यावर खुनी हल्ला करा, आमची तयारी आहे. आम्हाला ठार केलं तरी आमची तयारी आहे. या पुढे 25 वर्ष तुमची सत्ता येणार नाही याची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्हीच तुमचती कबर तुम्हीच खोदली आहे. अशा प्रकारचं वर्तन सुरूच राहिलं तर ही कबर सुद्धा देशात खोदली जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला दिला. राजकीय विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून उद्ध्वस्त करत असाल तर तुम्हीही त्यात भरडले जाल. विक्रांत घोटाळ्याचा (ins vikrant) सोमय्याला जाब विचारतील असं वाटलं होतं. पण त्यांच्या बाजूने उभे आहात हा निर्लज्जपणा आहे. त्यांच्याकडे पुरावे असू शकत नाही. कारण मी पुरावे दिले आहे, असा घणाघाती हल्लाही संजय राऊत यांनी केला.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्तांवर ईडीने टाच आणली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून याबाबतची तक्रार केली. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं आज मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी हजारो शिवसैनिक जमले होते. शिवसैनिकांनी अत्यंत जल्लोषात राऊत यांचं स्वागत केलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना आयएनएस विक्रांतच्या निधीच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या आणि भाजपवर सडकून टीका केली. विक्रांतचा मुद्दा राज्यसभेतही गाजला. या मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाज बंद पडलं. राज्यसभेत त्यांचे खासदार बोलू शकले नाहीत. त्यांनाही माहीत आहे घोटाळा झाला आहे. देशभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा केले आणि निवडणुकीत वापरले. पीएमसी बँकेच्या माध्यमातून सोमय्यांनी मनी लॉन्ड्रिंग केली आहे, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.

आम्ही सर्व एकत्रं आहोत

मी कालच शरद पवारांचे आभार मानले. माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकांचा विषय त्यांनी पंतप्रधानांकडे नेला. ज्या प्रकारच्या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. माझ्या निमित्ताने पवारांनी माझ्यावतीने खंत व्यक्त केली आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. पवार काल माझ्यासाठी पंतप्रधानांना भेटले याचा अर्थ समजून घ्या. तिन्ही पक्ष सोबत तुम्ही त्याला संकट म्हणता ती आमच्यासाठी संधी आहे. आम्ही त्यांना परिस्थिती सांगितली आहे, असं ते म्हणाले.

ही नामर्दानगी आहे

हे समर्थन किंवा शक्तीप्रदर्शन नाही. ही शिवसेना आहे. ही लोचकांच्या मनातील चिड आणि संताप आहे. कालपासून विनायक राऊत माझ्यासोबत आहेत. अनेक विषयावर चर्चा करत आहोत. विक्रांत घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गावपातळीवर आंदोलन झालं. तिथेही गर्दी आहे. हा सुद्धा संताप चीड आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेवून शिवसेना किंवा इतर नेत्यांवर हल्ला केले जातात ही नामर्दानगी आहे. त्याविरोधातील हा उसळलेला आगडोंब आहे. ही सुरवात आहे. ही ठिणगी पडली आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut : संजय राऊत मुंबईत दाखल, शिवसेनेकडून राऊतांचं जंगी स्वागत, सोमय्यांविरोधात आक्रमक

संजय राऊतांचं जंगी स्वागत! भातखळकर म्हणतात, ओंगळवाणं प्रदर्शन, तर मुनगंटीवार म्हणतात, ‘गजा मारणेचंही स्वागत झालं होतं’

Maharashtra News Live Update : संजय राऊत मुंबईत दाखल, मुंबई विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.