Buldhana : आशा सेविकांना रबराचं लिंग का दिलं? तालुका वैद्यकिय अधिकारी म्हणतात, जनजागृतीसाठी!

कुटुंबनियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागाने दिलेल्या किट्समध्ये रबरी लिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Buldhana : आशा सेविकांना रबराचं लिंग का दिलं? तालुका वैद्यकिय अधिकारी म्हणतात, जनजागृतीसाठी!
आशा सेविकांना रबराचं लिंग का दिलं? तालुका वैद्यकिय अधिकारी म्हणतात, जनजागृतीसाठी!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 2:12 PM

बुलडाणा: कुटुंबनियोजनासाठी (family planning) समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागाने दिलेल्या किट्समध्ये रबरी लिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांसमोर (Asha Worker) मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकारावर सडकून टीका करत सरकारचं (Maharashtra Government) डोकं ठिकाण्यावर आहे का असा संताप व्यक्त केला आहे. तर, आरोग्य विभागाने मात्र या प्रकाराचं समर्थन केलं आहे. आशा सेविकांना दिलेली किट्स जनजागृतीसाठीच आहे, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. तसेच अशा प्रकारचं किट्स दिल्याने लैंगिक आजार सुद्धा कमी होतील, असा दावाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी या प्रकाराचं समर्थन केलं असलं तरी महिला वर्गातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने आरोग्य विभागाला रोषाला सामोरे जावं लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

राज्य सरकारकडून आशा सेविकांना दिलेल्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे प्रकरण समोर आलंय. सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असल्याचं चित्र ही पाहायला मिळत आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या या किट जनजागृतीसाठी दिल्या असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे. यामुळे लैंगिकते संबंधीत आजार सुद्धा कमी होतील अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी

महिलांच्या प्रश्नसंदर्भात नेहमीच एकजीव असणाऱ्या समाजसेविकांनी सुद्धा या किटवर आक्षेप घेतला आहे. आशा वर्करांना ही किट घेऊन गावागावात जाऊन जनजागृती करणे अवघड झालं आहे. कारण ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते. महिलांच्या घरी गेल्यावर लहान लहान मुले असतात. पुरूष मंडळी असतात. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी बोलणे अवघड असतं, असं समाजसेविका डॉ. तबस्सुम हुसैन यांनी सांगितलं.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

PHOTO: मालेगावच्या दहिदी परिसरातील डोंगराला भीषण आग; अग्निशमन विभागाचे 4 बंब घटनास्थळी दाखल

Harbour Line वरती आज मेगाब्लॉक, जाणून घ्या दिवसभरातलं रेल्वेचं वेळापत्रक

Nagpur ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र विशेष मोहीम

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.