Bhendval Prediction : देशाचा राजा कायम राहणार? बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळचं भाकित काय

भेंडवळच्या घट मांडणीने दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होईल, याचं भाकित केलं आहे. पाऊसपाणी आणि पैसा-अडका अशी सुबत्ता राहणार आहेच. पण सध्या लोकसभेची लगबग सुरु आहे. या धामधुमीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता देशाला लागली आहे. मग भेंडवळची भाकणूक तरी काय...

Bhendval Prediction : देशाचा राजा कायम राहणार? बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळचं भाकित काय
राजाचं काय होणार? भेंडवळची भविष्यवाणी काय
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 12:05 PM

माणसाला भविष्याची चिंताच असते असे नाही तर भविष्यातील घडामोडीची उत्सुकता पण असते. भविष्यातील घडामोडींचा अगोदरच अंदाज जाणून घ्यायचा असतो. बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळचे भाकित काय ते पाहण्यासाठी विदर्भासह खानदेश आणि जवळच्या मध्यप्रदेशातून पण बरीच मंडळी ठाण मांडून असतात. यंदा लोकसभा निवडणुकीचा बार उडालेला आहे. जनता मतपेटीतून त्यांचा उमेदवार निवडून देईल. पण देशाचा राजा कोण होणार याची उत्सुकता आहे. याविषयी भेंडवळची भविष्यवाणी आहे तरी काय?

राजा म्हणजे कोण?

भेंडवळच्या मांडणीत पाऊस पाण्याचं जसं भाकीत वर्तवलं जातं. तसं देशाच्या सत्तेवर कोण राहणार? कोण जाणार? यांचं भाकीतही वर्तवलं जातं. राजा म्हणजे पंतप्रधान. पंतप्रधानपदी कोण राहणार? याचं भाकीत वर्तवून या मांडणीतून देशाची राजकीय दिशा सांगितली जाते. भेंडवळची मांडणी बऱ्यापैकी खरी ठरते. त्यामुळेच भेंडवळच्या मांडणीकडे देशाचं लक्ष लागतं. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. केंद्राच्या सत्तेत कोण राहणार? मोदी राहणार की जाणार? याची जोरदार चर्चा आहे. अनेक अंदाज, पोल, सर्व्हे येत आहेत. अशातच भेंडवळच्या मांडणीचं भाकीत आल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

राजकीय भाकितावर संकट

घटमांडणी होण्यापूर्वीच वाद उफाळला होता. अखिल भारतीय संघटनेचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी ही घटमांडणी थोतांड आणि अवैज्ञानिक असल्याचा दावा केला होता. शेतकऱ्यांनी या मांडणीच्या भाकितांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. घटमांडणीत दरवर्षी राजकीय भाकीत केले जाते. यंदा लोकसभा निवडणुका होत असल्याने सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. राजकीय भाकीत केल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा मारोडे यांनी दिला होता. त्यामुळे यंदा राजा कायम राहिल इतकीच चर्चा झाली.

राजा असेल कायम

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. चौथ्या टप्प्याकडे निवडणुका वळल्या आहेत. तीन टप्प्यात कमी मतदानाने चिंता वाढलेली आहे. तर देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार, कोण पंतप्रधान होणार, जनता कुणाच्या पारड्यात मताचा कौल टाकणार याविषयीची कमालीची उत्सुकता आहे. भेंडवळच्या भाकितानुसार, देशातील राजा कायम असेल. तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल. शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.