Cyrus Mistry: अपघातात मृत्यमुखी पडलेले उद्योगपती सायरस मिस्त्री देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, जाणून घ्या त्यांची संपत्ती?

सायरस मिस्त्री यांचे वडील पालनजी मिस्त्री हेही मोठे उद्योगपती होते. बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, पालोनजी मिस्त्री यांची त्यांच्या मृत्यूवेळी 29 अब्जहून अधिक संपत्ती होती. त्यांची गणना भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असे.

Cyrus Mistry: अपघातात मृत्यमुखी पडलेले उद्योगपती सायरस मिस्त्री देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, जाणून घ्या त्यांची संपत्ती?
सायरस मिस्त्री यांची संपत्ती किती?Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 7:23 PM

मुंबई– पालघरजवळच्या रस्ते अपघातात प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)यांच्या निधनाच्या वृत्ताने सगळा देश हळहळला आहे. 1968  साली मुंबईत जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांना दोन दशकांहून अधिक काळाचा उद्योग चालवण्याचा अनुभव होता. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata)यांनी त्यांची निवड उत्तराधिकारी म्हणून केली होती. उद्योग जगतात सायरस मिस्त्री यांचे मोठे नाव होते. टाटा समुहात त्यंनी निवड होण्यापूर्वी ते शापूरजी पालनजी कंपनीशी संबंधित होते. शापूरजी पालनजी मिस्त्री कंपनीने मध्य आशिया आणि अफ्रिकेत बाँधकाम व्यवसायात मोठे नाव कमावलेले आहे. यासह पॉवर प्लंड आणि फॅक्टरी उभे करण्यातही त्यांचे मोठे नाव आहे. टाटा समुहात टाटा अडनाव नसणाऱ्या माणसाचीअध्यक्षपदी निवड त्यांच्या रुपाने झाली होती. असा मान मिळवणारे ते दुसरे व्यक्ती होते. बांधकामक्षेत्र, मनोरंजन, वीज, आर्थिक कारभार या क्षेत्रात त्यांचा मोठा हातखंडा होता. बिझनेसमध्ये त्यांना टायकून मानले जाई. त्यांच्याकडे किती संपत्ती (net worth)होती, हे जाणून घेऊयात.

70 हजार कोटींहून अधिक एकूण संपत्ती

सायरस मिस्त्री यांचे वडील पालनजी मिस्त्री हेही मोठे उद्योगपती होते. बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, पालोनजी मिस्त्री यांची त्यांच्या मृत्यूवेळी 29 अब्जहून अधिक संपत्ती होती. त्यांची गणना भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असे. तर माध्यमांच्या माहितीनुसार 2018 सालापर्यंत सायरस मिस्त्री यांची व्यक्तिगत संपत्ती 70,957 कोटी रुपये इतकी होती.

हे सुद्धा वाचा

अलिशान बंगल्यात राहत असत

सायरस मिस्त्री त्यांची पत्नी रोहिका छागला यांच्यासोबत मुंबईत एका अलिशान बंगल्यात वास्तव्याला होते. मुंबईव्यतिरिक्त दुबई, लंडन आणि आयर्लंडमध्येही त्यांची घरे आहेत. मिस्त्री यांच्याकडे आयर्लंडचीही नागरिकता होती. ते भारताचे स्थायी नागरिक होते. त्यांची आई आयर्लंडमध्ये जन्माला आलेली असल्याने त्यांना त्या देशाचे नागरिकत्वही मिळालेले होते. सायरस मिस्त्री हे टाटा कुटुंबाच्या जवळचे मानले जात. त्यांच्या एका बहिणीचा विवाह रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टटा यांच्याशी झाला होता.

महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.