कदाचित पावले उचलावी लागतील… छगन भुजबळ बंडावर ठाम

राज्यातील सत्ता फक्त लाडकी बहिणीमुळे मिळाली नाही. ओबीसी तुमच्या सोबत होते. अजून काही निवडणुका संपल्या नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. ओबीसींनी तुम्हाला दिल्यावर सत्ता दिली आहे. मग त्यानंतर का ढावलले जात आहे? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

कदाचित पावले उचलावी लागतील... छगन भुजबळ बंडावर ठाम
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 3:03 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करण्याचे स्पष्ट संकेत समता परिषदेचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिले. बुधवारी नाशिकमध्ये बोलताना त्यांनी पक्षात कशा पद्धतीने पिळवणूक झाली, त्याबाबतची खदखद व्यक्त केली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते आपणास मंत्री करा, असे म्हणत होते, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ म्हणाले, ‘अनेकांनी सूचना केल्या आहेत. मी आता सर्वांशी चर्चा करणार आहेत. मी उद्या, परवा मुंबईत जाणार आहे. मुंबईत ओबीसीचे नेते, एल्गारचे नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. देशातील आणि राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर कदाचित पाऊल उचलावी लागेल. घाईत काही करायची गरज नाही. विचारपूर्वक पाऊल उचलणार आहे.’

समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये झाली. त्या बैठकीत भुजबळ यांनी भाजपकडून आपणास पाठिंबा मिळत होता. चंद्रशेखर बावनकुळे माझी बाजू घेत होते. पण प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे, समाजाचा आहे. आता समाजाच्या संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे? मंत्रिपदे येतात अन् जातात. किती वेळा मंत्रिपदे आली अन् गेली. मी विरोधी पक्षातही बसलो. विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केले आहे.

राज्यातील सत्ता फक्त लाडकी बहिणीमुळे मिळाली नाही. ओबीसी तुमच्या सोबत होते. अजून काही निवडणुका संपल्या नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. ओबीसींनी तुम्हाला दिल्यावर सत्ता दिली आहे. मग त्यानंतर का ढावलले जात आहे? या मागचा हेतू काय आहे? मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे. सभागृहातही मी लढणार अन् बोलणार आहे. पण पक्षात माझी अहवेलना करण्यात आली, त्याचे शल्य मनात डचणार आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

मैं मौसम नही हूँ जो पल में बदल जाऊँ, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊँ,

मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना, हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ

या शब्दांमध्ये भुजबळ यांनी पक्षातील श्रेष्ठींना आव्हान दिले. आता पुढील दोन दिवसांत छगन भुजबळ काय निर्णय घेतात? त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. परंतु या सर्व प्रकरणात अजित पवार किंवा राष्ट्रवादीतील इतर कोणत्याही नेत्यांची प्रतिक्रिया आली नाही.

दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.