Shiv Jayanti 2023 live updates : अमित शाह यांच्या हस्ते पुण्यातील शिवसृष्टीचं उद्घाटन
Shiv Jayanti 2023 live : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर...
मुंबई : राज्यातील सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा. राज्यासह संपूर्ण देशात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. राज्यभरात शिवजयंती निमित्ताने मिरवणुका निघणार आहेत. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले आहेत. तर उत्तर प्रदेशातील आग्र्यातही पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्र्यात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
देश आजच्या ज्या उंच स्तरावर गेलाय तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच: अमित शाह
कोल्हापूर
देश आजच्या ज्या उंच स्तरावर गेलाय तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच
एखादी स्वप्न शंभर वर्षे चालते याचा अर्थ संस्थाचालकांनी त्यात आपला जीव ओतलाय
एखादी शिक्षण संस्था जर शंभर वर्ष पूर्ण करत असेल तर यातून लाखो विद्यार्थी घडले आहेत
माझी पत्नी या शाळेत शिकली याचा मला अभिमान
मुलांनो..आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहोत
आज देश कुठून कोठे पोहचलाय
मुलांनो जीवनात एखादा संकल्प करा आणि तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
-
शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास अमित शाह लिहिणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘शिवसृष्टी’चा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन
बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून शिवसृष्टी पुण्यात साकारण्यात येत आहे.
शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास अमित शाह लिहिणार- एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
शिवसृष्टीतून शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत जाणार -शाह
-
-
छत्रपती शिवाजी महाराज एक विचार : अमित शाह
शिवसृष्टी पूर्ण होतेय, बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकारतंय
शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचतील
शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल
शिवसृष्टी साकारणं हे ईश्वरीय काम, शिवसृष्टीतून इतिहासाला उजाळा मिळेल
-
शिवजयंती निमित्ताने सात फुटी उंच आणि 150 फूट उंच वाघनखांची प्रतिकृती
शिवजयंती निमित्ताने सात फुटी उंच आणि 150 फूट उंच वाघनखांची प्रतिकृती
शिवजयंती उत्सव निमित्त कळंबोलीमध्ये शिवप्रेमी साठी देखाव्याचे आयोजन केले आहे
यामध्ये वाघ नखे याची प्रतिकृती दर्शवण्यात आली आहे यामध्ये दीडशे किलोची ही वाघ नखे आहेत
शिवजयंती उत्सव असल्याने नवी मुंबईतील नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला आहे.
-
अमित शाह यांच्या हस्ते पुण्यातील शिवसृष्टीचं उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारतेय शिवसृष्टी
अमित शाह यांनी केली शिवसृष्टीच्या कामाची पाहणी
राज्य सरकारने शिवसृष्टीला 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला
-
-
राजधानी नवी दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह
महाराष्ट्र सदनात होणार शिवजयंती साजरी
कोल्हापूर संस्थांनमधील शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार
शिवजयंती निमित्त महाराष्ट्र सदनला आकर्षक सजावट
राजधानी दिल्लीतील मराठी शिवप्रेमी उपस्थित राहणार
-
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
सत्ता गेली की खुर्ची वर प्रेम करणारे अशाच प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतात
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
हा फक्त संवैधानिक संस्थांचा अपमान नसून लोकशाहीचा आणि स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे
लोकशाहीचा अपमान करणाऱ्या अशा लोकांचं मतदार निवडणुकीत डोकं ठिकाणावर आणतील
-
घोडबंदर किल्ला पुन्हा एकदा राहणार दिमाखात उभा..
घोडबंदर किल्ला पुन्हा एकदा राहणार दिमाखात उभा..
आज शिवजयंती निमित्ताने घोडबंदर किल्ल्यावर सगळ्यात पहिला 105 फुटाचा भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे..
आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून गडकिल्ले संवर्धनच्या माध्यमातून करण्यात आली डागडुजी..
शिवजयंती च्या निमित्ताने घोडबंदर किल्ला येथे ग्रामस्थांकडून कार्यक्रमाचे आयोजन..
-
कोल्हापूर छत्रपती घराण्याची शिवजयंती
कोल्हापूर छत्रपती घराण्याची शिवजयंती
शिवजयंतीसाठी नर्सरी बागेत पारंपारिक लवाजमा दाखल
बँड घोडे तोफेसह लवाजमा नर्सरी बागेत आला
थोड्याच वेळात छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत होणार शिवजयंती कार्यक्रमाला सुरुवात
-
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवभक्तांचा जल्लोष
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या नाशिक रोड येथे जल्लोषाला सुरुवात झाली. नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भव्य असा तुळजाभवानी मातेचा देखावा उभारण्यात आला असून परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल पथकाचे वादन यावेळी करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देऊन शिवभक्तांनी जल्लोष केला.
-
शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारला, माजी खासदार संभाजीराजे नाराज
जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, संभाजीराजे यांची मागणी
शिवनेरीवरील नियोजनाच्या अभावामुळे संभाजीराजे नाराज
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
पण संभाजीराजे तरुणांच्या गराड्यात, नाराजी कायम
-
छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवनेरीवर शासकीय मानवंदना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
राष्ट्रगीत आणि राज्यगीताने शिवजयंती सोहळ्याला सुरुवात
महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पाळणा म्हटला
सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांना सहभागी करून न घेतल्याने स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप
-
सकल मराठा समाजाकडून ठाण्यात मोठ्या उत्सहात शिवजयंती उत्सव साजरा
ठाण्यातील तालावपाळी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन
मशाल रॅलीचे आयोजन, शिवजयंतीच्या निमित्ताने बाईक रॅलीचे देखील आयोजन
मोठ्या प्रमाणात ठाण्यात शिवप्रेमीची तलावपाळी येथे उपस्थिती
-
आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार
हा योग कित्येक दशकांनंतर महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आल्यानं राज्यभरात आनंदाचं वातावरण
शिवाजी चौक परिसरात फुलांची सजावट करण्यात आली, छत्रपती शिवरायांचे होर्डिंग्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत
आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय
शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण याठीकाणी दिमाखात फडकत आहे
शिवजन्मोत्सव, पोवाडे सादरीकरण, नाटक सादरीकरण, सँड आर्ट, आतषबाजी केली जाणार
आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे मानले आभार
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल
एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने शिवनेरी किल्ल्यावर दाखल
संभाजीराजे छत्रपतीही मुख्यमंत्र्यांसोबत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजन्मस्थळी जाणार
थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात येणार
-
राजधानी नवी दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह
महाराष्ट्र सदनात होणार शिवजयंती साजरी
कोल्हापूर संस्थांनमधील शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार
शिवजयंती निमित्त महाराष्ट्र सदनला आकर्षक सजावट
राजधानी दिल्लीतील मराठी शिवप्रेमी उपस्थित राहणार
Published On - Feb 19,2023 8:56 AM