CM Eknath Shinde: विचारांची सुंथा कुणी केली?, देशद्रोह्यांचे हस्तक कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका, महत्त्वाचे 12 मुद्दे
एकनाथ शिंदे गट लाचार असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. मोदी आणि शाहांचे हस्तक म्हणून काम करीत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. दाऊद आणि याकूब मेमनच्या कबरीला परवानगी देऊन देशद्रोह्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यासोबत हस्तक म्हणून राहायला काय वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
पैठण – बाळासाहेबांचा विचार बुडवले, हिंदुत्व बुडवले, सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ केलीत, ही विचारांची सुंथा कुणी केली, अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी पैठणच्या सभेत केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून रोखठोकमध्ये करण्यात आलेल्या टीकेचा शिंदे यांनी समाचार घेतला आहे. बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray)धोका कुणी दिला, त्यांचे विचार पायदळी कुणी तुडवले, हे तुम्ही महाराष्ट्राला सांगा, असं खुलं आव्हान शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.
एकनाथ शिंदे गट लाचार असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. मोदी आणि शाहांचे हस्तक म्हणून काम करीत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. दाऊद आणि याकूब मेमनच्या कबरीला परवानगी देऊन देशद्रोह्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यासोबत हस्तक म्हणून राहायला काय वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- विरोधकांच्या शब्दकोषात केवळे खोके आणि गद्दारी हे दोनच शब्द उरले आहेत. तुमच्या खोक्यांचा हिशोब आत्ता काढत नाही, असे सांगत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
- शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, सोन्याचा चमचा घेतलेलाच नेहमी का मुख्यमंत्री होतो. हे काय एग्रीमेंट केले आहे का, तुमचा पोटशूळ का उठतो. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
- शिंदे गटावर टीका करण्यासाठी सकाळ, दुपार, संध्याकाळी तीन डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ थांबत नाही, अशी टीका त्यांनी केली
- मुंबईत मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी.मुंबईतील मराठी माणूस विरार, बदलापूरपर्यंत का गेला, याचा विचार करायला हवा, रोखठोकमध्ये याचं विश्लेषण करायला हवं. निवडणुकीसाठी केवळ मराठीचा मुद्दा पुढे करायचा, निवडमुकीनंतर मात्र मराठी माणूस देशोधडीला का लागलाय, याचा विचार करायला हवा, असा टोला त्यांनी लगावला.
- आता जसं मुंबईत घराघरात जाताय, तसं आधी केलं असतं तर मुंबईतील टक्का कमी झाला नसता.
- केवळ मतांसाठी वापर करायचा, नंतर दुसऱ्यांवर खापर फोडायचं, ही जुनी पद्धत माहिती आहे.
- एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे, तर याच साबणाने तुमची चांगली धुलाई केली हे विसरु नका.
- शिवसेनेच्या सभेला, रोड शोला राष्ट्रवादीची माणसे पाठवली जातात, त्यामुळे अशा गर्दीची सवय शिवसेनेला नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
- कसं काय पाटील बरं आहे का, दिल्लीत जे झालं ते खरं आहे का. जयंतरावांनी अजित पावरांनी दिलं नाही. त्यामुळे अजित पवार निघून गेले. राज्यात थांबवता येत नाही, म्हणून दिल्लीत त्यांना थांबवलं.
- मुख्यमंत्री झालो तरी माझ्यातला कार्यकर्ता मरु देणार नाही. आधी दादा आणि आता ताई टीका करतायेत. टीका करणे हा विरोधकांचा धंदा, आम्ही कामाने उत्तर देऊन हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो. आणि हे करत राहणार, हा माझा शब्द आहे.
- खरी शिवसेना कोणती याचं उत्तर मिळालेलं आहे. ही गर्दी पैसे देऊन आणलेली गर्दी नाही. ही सच्च्या शिवसैनिकांची गर्दी आहे, संदीपान भुमरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे. बाळासाहेबांच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांची गर्दी आहे.
- पुढच्या निवडणुकीत 200 च्यावर आमदार शिवसेना आणि भाजपाचे निवडून येतील.