AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडले, शिवसैनिक भावूक, महिला-पुरुष ढसाढसा रडले, वरुणराजाही गहिवरला..

वर्षावरुन निघताना त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना वर्षा निवासस्थानातून निघताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. वर्षातून निघण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार त्यांना भेटण्यासाठी पोहचले होते.

Uddhav Thackeray:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडले, शिवसैनिक भावूक, महिला-पुरुष ढसाढसा रडले, वरुणराजाही गहिवरला..
Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 22, 2022 | 10:45 PM
Share

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी भावनिक भाषण केले. सत्तेचा मोह नाही, आजच वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडण्याची घोषणा त्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केली, आणि रात्री साडे नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षा निवासस्थान सोडले. ते वर्षावरुन निघताना त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना वर्षा निवासस्थानातून निघताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. वर्षातून निघण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार त्यांना भेटण्यासाठी पोहचले होते.

वर्षा निवासस्थानातून सामान बाहेर काढताना

वर्षातून निघण्यासाठी लागली १५ ते २० मिनिटे

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानातून साडे सात-आठ वाजल्यापासूनच शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाहेर येऊन त्यांना अभिवादन केले आणि वर्षा निवासस्थान सोडण्याची घोषणा केली, त्यानंतर त्यांचे सामान बहेर येण्यास सुरुवात झाली. साडे नऊच्या सुमारास ते निघाले तेव्हा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच शंखनादही करण्यात आला. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे जावे लागत असल्याने अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आपल्याच माणसांमुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आल्याचे दुख त्यांना अतिशय त्रास देत होते. असे व्हायला नको होते, अशी इच्छा अनेक जण व्यक्त करीत होते.

वर्षा निवासस्थानाबाहेर गर्दी

वरुणराजाच्या डोळ्यातही अश्रू दाटले

वर्षा निवासस्थान सोडताना वरळी सी लिंकमार्गे जाताना वाटेत ठिकठिकाणी शिवसैनिक गर्दी करुन उभे होते. शिवसेना झिंदाबाद, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उद्धव ठाकरे हेही खिडकीतून हात काढून या शिवसैनिकांचे प्रेमाला अभिवादन करत होते. उद्धवजी, शइवसैनिक तुमच्यासोबत आहेत, असे पोस्टर्सही ठिकठिकाणी लावण्यात आले होते. वाटेत शिवसैनिकांचे हे प्रेम पाहून वरुणराजाही गहिवरला आणि पावसाचा शिडकावा पडला होता.

शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी

वर्षा ते मातोश्री शिवसैनिकांची गर्दीच गर्दी

वर्षा ते बांद्राचे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाच्या ९ किलोमीटरच्या प्रवासाला सुमारे तासाभराहून अधिक काळ लागला. ठिकठिकाणी शिवसैनिक हे हातात झेंडे हातात घेूऊन आणि घोषणाबाजी करताना पाहायला मिळत होते. या सगळ्या रस्त्यातून मुख्यमंत्र्यांचा कॉन्व्हॉय जात असताना, त्यांना परतावे लागल्याचे दुख, चुटपूट प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात जाणवत होती. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी होत होती.

वर्षा ते मातोश्री गर्दीच गर्दी

उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती लाट

उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना केलेल्या आवाहाननानंतर आणि सत्तेचा मोह नसल्याचे सांगत शिवसैनिकांना भावनिक साद घातली होती. ती सहानभूतीची लाट मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली. अडीच वर्षांच्या काळातच आपल्या नेत्याला असे घरी परतावे लागल्याचे दुख अनेकांच्या घोषणांतून आणि प्रतिक्रियांतून जाणवत होते. महिला शिवसैनिकांचीही या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळत होती. मुख्यमंत्रीही वाटेत ठिकठिकाणी उतरुन शिवसैनिकांचे हे प्रेम आवर्जून स्वीकारत होते, असे पाहायला मिळत होते.

ठिकठिकाणी गर्दी आणि घोषणाबाजी

मातोश्रीबाहेर तर शिवसैनिकांची मोठी रीघ

मातोश्रीबाहेर तर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. या निमित्ताने शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शनच केलेले पाहायला मिळाले. राज्यातील ११ जिल्ह्यांतील आमदार फुटलेले असतना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळालेले हे प्रेम जनतेच्या मनात त्यांच्याबाबतची असलेली प्रतिमा दाखवणारी ठरले. कोणत्याही मुख्यमंत्र्याला वर्षा निवासस्थान सोडताना एवढं प्रेम मिळालं नसेल अशीच भावना व्यक्त होत होती.

ठाकरे कुटुंबही भारावले

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.