CIDCO : घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खास बातमी, सिडकोच्या 6 हजार 508 घरांची सोडत, वाचा योजनेसह महत्वाच्या तारखा

नवीन वर्षात अनेकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण, येत्या 8 एप्रिलला 6 हजार 508 घरांची सोडत ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोने दिला आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेऊन नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे.

CIDCO : घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खास बातमी, सिडकोच्या 6 हजार 508 घरांची सोडत, वाचा योजनेसह महत्वाच्या तारखा
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी 5 हजार कोटींचा पतपुरवठा प्राप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 4:08 PM

मुंबई : नवीन वर्षात अनेकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण, येत्या 8 एप्रिलला 6 हजार 508 घरांची सोडत ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोने दिला आहे. सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी सिडकोतर्फे (Cidco) 5 हजार 730 घरांची महागृहनिर्माण योजना 2022 अंतर्गत नवी मुंबईतील (Navi Mumbai) विविध नोडमधील अतिरिक्त घरं (House) विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता या योजनेच्या माध्यमातून एकूण 6 हजार 508 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेऊन नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. सिडको महामंडळातर्फे 26 जानेवारी 2022 रोजी 5 हजार 730 घरांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये 5 हजार 730 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता याची सोडत 8 एप्रिलला होणार आहे.

6508 घरं विक्रीसाठी उपलब्ध होणार

5730 घरांव्यतिरिक्त नवी मुंबईच्या द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील काही अतिरिक्त घरं या योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे सदर योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता द्रोणागिरी येथे 181, घणसोली येथे 12, कळंबोली येथे 48, खारघर येथे 129 आणि तळोजा येथे 1535, अशा एकूण 1905 घरं उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता द्रोणागिरी येथील 241, कळंबोली येथील 22, खारघर येथील 88 आणि तळोजा येथील 4252, अशा एकूण 4,603 घरं उपलब्ध आहेत. याप्रमाणे, एकूण 6,508 घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ऑनलाईन प्रक्रिया

योजनेतील अर्ज नोंदणी ते सोडत या दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून याकरिता www.lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज नोंदणी, कागदपत्रे सादर करणे आणि अनामत रकमेचा भरणा करावयाचा आहे. तथापि, अर्जदारांना ठिकाण (नोड) निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही. संगणकीय सोडत काढून वरीलपैकी कोणत्याही ठिकाणची घरं अर्जदारांना सिडकोकडून वाटप करण्यात येईल. पहिली सोडत पार पडल्यानंतर अ.जा./अ.ज./भ.ज./वि.ज. या वैधानिक आरक्षित प्रवर्गातील घरं शिल्लक राहिल्यास त्वरित दुसरी सोडत काढण्यात येऊन या घरांचे वाटप वैधानिक प्रवर्गांतील उर्वरित पात्र अर्जदारांना करण्यात येईल.

पत्रकार, दिव्यांग, माजी सैनिक, राज्य शासन कर्मचारी, नवी मुंबई प्रकल्पबाधित, माथाडी कामगार, धार्मिक अल्पसंख्य या प्रवर्गांकरिता आरक्षित सदनिका पहिल्या सोडतीनंतर शिल्लक राहिल्यास, दुसरी सोडत काढण्यात येऊन या सदनिकांचे वाटप या प्रवर्गांतील तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित पात्र अर्जदारांना करण्यात येईल.

गृहनिर्माण योजनेतील अन्य अटी व शर्ती कायम असून योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील, असे सिडकोकडून कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अतिरिक्त घरांचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

मधमाश्यांचे पालन, अल्पभूधारकांचे वाढेल उत्पादन, कृषी विज्ञान केंद्राकडूनही मदतीचा हात

Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 27 March 2022

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.