हवं तर कांजूर कारशेडचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन

कांजूर मेट्रोच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (cm uddhav thackeray slams bjp over kanjurmarg carshed issue)

हवं तर कांजूर कारशेडचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 2:55 PM

मुंबई: कांजूर मेट्रोच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद राज्यातील जनतेच्या हिताचा नाही. हा विषय आपल्या प्रतिष्ठेचा करून खेचाखेची करू नका. हवं तर तुम्हाला कांजूर कारशेडचं श्रेय देतो. पण कद्रूपणा करू नका, हा कद्रूपणा सोडा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे. (cm uddhav thackeray slams bjp over kanjurmarg carshed issue)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना कांजूर मार्गमध्ये होणाऱ्या कारशेडची आणि आरेमधील कारशेडची तुलना करत कांजूरमार्गमध्ये मेट्रो होणं किती योग्य आहे, हे अधोरेखित केलं. कांजूर मार्गा येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडचा वाद हा जनतेच्या हिताचा नाही. त्याला आपल्या प्रतिष्ठेचा विषय करू नका. तुमची जागा आणि माझी जागा असं म्हणून खेचाखेची करू नका. पाच वर्षानंतर जेव्हा जनता आपल्याला विचारेल तेव्हा काय सांगणार? आडवाआडवी केली? खेचाखेची केली? हा कद्रूपणा आहे. तो सोडवायला हवा, असं सांगतानाच माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे, या बसून चर्चा करून प्रश्न सोडवू. तुम्ही हा प्रश्न सोडवा. तुम्हाला श्रेय देतो. इथे माझ्या इगोचा प्रश्न नाही. तुमच्याही इगोचा प्रश्न असता कामा नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आरेतलं पर्यावरण वाचवलं

मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून थयथयाट केला जात आहे. मला अहंकारी म्हटलं जात आहे. होय, मी अहंकारी आहे. माझ्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मी जरूर अहंकारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. आरेत मेट्रो तीनसाठी कारशेड करणार होतो. त्यासाठी 30 हेक्टर जागा घेतली जाणार होती. त्यातील पाच हेक्टर जागेवर झाडे असल्याने या जागेवरील झाडे कापणार नाही आणि ती वापरात घेणार नाही, असं आपण लिहून दिलं होतं. म्हणजे एकूण 25 हेक्टरवर कारशेड होणार होती. 2023मध्ये हे काम पूर्ण होणार होतं. त्यानंतर भविष्यात पुन्हा जागा कमी पडली असती तर झाडे कापणार होतो. झाडे कापून ती पाच हेक्टर जागा घेणार होतो. 2031 पर्यंत आणखी जागा कमी पडली असती तर आणखी घेणार होतो. एका लाईनसाठी जंगल मारत मारत जाणार होतो. त्यात एक मार्ग स्टब्लिंगसाठी करायचा होता. म्हणजे गाड्या पार्क करण्यासाठी जागा ठेवायची होती. पण या प्रस्तावात त्याचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे आमच्या सरकारने आरेच्या टोकावर जिथं कास्टिंग यार्ड आहे, तिथे स्टेब्लिंग लाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सांगतानाच आपण आरेचं पर्यावरण वाचवलं असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्ती वाढवून 800 एकर केली आहे. जगातलं हे शहरात असलेलं सर्वात मोठं जंगल आहे, असं त्यांनी सांगितलं.

शंभर वर्षांचा विचार

आरेत केवळ 25 हेक्टरवर कारशेड होणार होती. तर कांजूरमार्गमध्ये 40 हेक्टरवर कारशेड होणार आहे. कांजूरचा प्रदेश गवताळ आहे आणि ओसाड आहे. कांजूरमध्ये मेट्रोच्या 3, 4 आणि 6 या तीन लाईनसाठी कारशेड होणार आहे. तर आरेत केवळ मेट्रोच्या 3 लाईनसाठी कारशेड होणार होती. इतर दोन लाईनसाठी कारशेड कुठे करायची याचं काहीच नियोजन नव्हतं. कांजूरमध्ये डेपो झाल्यानंतर होणाऱ्या जंक्शनमधून ही मेटो थेट अंबरनाथ-बदलापूरला जाणार आहे. आरेत 25 एकर जागा घेऊन पुढच्या पाच वर्षात जागा कमी पडली असती. कांजूरमध्ये मात्र शंभर वर्षाचा विचार करून डेपो उभारला जात आहे, हा फरक आहे. आता तुम्हीच ठरवा काय योग्य आणि काय आयोग्य आहे ते, असं मुख्यमंत्री म्हणाले. (cm uddhav thackeray slams bjp over kanjurmarg carshed issue)

अति घाईने विकास होत नाही

घाईघाईने काही केलं म्हणजे विकास होतोच असं नाही. अतिघाई संकटात नेई. विकासकामे मार्गी लावताना अतिघाई करण्यात उपयोग नाही, असं सांगतानाच मला तात्कालीक विकास नकोय. तर दीर्घकालीन विकास हवा आहे, असं त्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray slams bjp over kanjurmarg carshed issue)

संबंधित बातम्या:

सरकार पडलं नाही, पण राजकीय हल्ले परतवत आघाडीने एक वर्षे पूर्ण केलं; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

सांगलीत शिवसेनेचा धक्का, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप नेत्यांना शिवबंधन

(cm uddhav thackeray slams bjp over kanjurmarg carshed issue)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.