Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूरच्या उत्तरच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचं पारडं जड, जयश्री जाधव यांची दोन हजार मतांची आघाडी

Kolhapur by Election Result 2022: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दोन हजार मतांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत जयश्री जाधव यांना पहिल्या फेरीत 4856 मते मिळाली आहेत.

Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूरच्या उत्तरच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचं पारडं जड, जयश्री जाधव यांची दोन हजार मतांची आघाडी
कोल्हापूरच्या उत्तरच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचं पारडं जड, जयश्री जाधव यांची दोन हजार मतांची आघाडीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 9:01 AM

कोल्हापूर: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची (Kolhapur by Election Result ) मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव (jayshree jadhav) यांनी दोन हजार मतांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत जयश्री जाधव यांना पहिल्या फेरीत 4856 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम (satyajit kadam) यांना अवघे 2712 मते मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेससह महाआघाडीत उत्साहाचं वातावरण आहे. पहिल्या फेरीत कसबा बावडा येथील मतांची मोजणी सुरू आहे. या ठिकाणी राज्याचे मंत्री सतेज पाटील यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे कसबा बावडाच्या मतदारांनी जयश्री पाटील यांच्या पारड्यात मतांचा टक्का टाकल्याचं दिसत आहे. सुरुवातीचे तिन्ही राऊंड हे सतेज पाटील यांच्या मतदारसंघातीलच आहेत. न्यू पॅलेस, कदमवाडी, बावडावाडी या भागातील मतांची मोजणी पहिल्या फेरीनंतर होणार आहे. त्यामुळे या तिन्ही राऊंडमध्ये जयश्री पाटील यांना किती मते मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

12 एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्याच फेरीत दोन हजाराचा लीड घेऊन जयश्री पाटील यांनी आघाडी घेतली आहे. राजाराम तलाव, शासकीय गोदामात ही मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी एकूण टेबल लावण्यात आले आहेत. एकूण 26 फेऱ्यांमध्ये मतदान होणार आहे. मात्र पहिल्या तीन राऊंडमध्येच निकालाचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सत्यजित कदम कम बॅक करतात की जयश्री जाधव आघाडी कायम ठेवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसऱ्या फेरीतही आघाडी

जयश्री पाटील यांनी दुसऱ्या फेरीतही आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 मते मिळाली आहेत. तर सत्यजित कदम यांना 2513 मते मिळाली आहे. जयश्री जाधव यांनी दुसऱ्या फेरीत 3002 मतांची आघाडी घेतली आहे. पहिली आणि दुसरी फेरी मिळून जयश्री जाधव यांनी एकूण 5139 मतांची आघाडी घेतली आहे.

जिंकण्याचा विश्वास

दरम्यान, जयश्री पाटील यांनी पहिल्या फेरीनंतर मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेतले आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय होईल असा विश्वास आहे. मतदारांनीही मला चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याने पुढील फेऱ्यांमध्येही हीच आघाडी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

Kolhapur Election Result 2022 LIVE : दुसऱ्या फेरीतही काँग्रेसने पंजा कसला, कोल्हापूर उत्तर पुन्हा काँग्रेसचं?

Maharashtra News Live Update : नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Shivsena on MNS: मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातलंय, शिवसेनेची मनसेसह संघावरही टीका

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.