मेहुणे म्हणाले मुख्यमंत्रिपदी पाहायचंय, प्रश्न विचारताच अशोक चव्हाण यांनी हात जोडले

सध्या अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी आम्ही सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांच्या याच वक्तव्याबद्दल खुद्द अशोक चव्हाण यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी उत्तर देणे टाळत थेट हात जोडले आहेत.

मेहुणे म्हणाले मुख्यमंत्रिपदी पाहायचंय, प्रश्न विचारताच अशोक चव्हाण यांनी हात जोडले
ASHOK CHAVAN
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 8:57 PM

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आपलाच मुख्यमंत्री असावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं. काही नेत्यांनादेखील मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असते. ही इच्छा काही नेते स्पष्टपणे बोलून दाखवतात तर काही नेतेमंडळी तिला मनात टेवून त्यासाठी डावपेच आखत असतात. सध्या अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी आम्ही सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांच्या याच वक्तव्याबद्दल खुद्द अशोक चव्हाण यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी उत्तर देणे टाळत हात जोडले आहेत.

भास्करराव पाटील खतगावकर नेमकं काय म्हणाले ?

काँग्रसने देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेसने जिंगली आहे. या विजयामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर भास्करराव पाटील खतगावकर यांनी मोठं विधान केलंय. “देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांचा विजय झाला. यातून अशोक चव्हाण यांचं कुशल नेतृत्व दिसून येतं. चव्हाण यांच्या नेतृत्वामुळेच हे यश मिळू शकलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना आम्हाला पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पाहायचं आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत,” असं खतगावकर यांनी म्हटलं आहे.

प्रश्न विचारताच अशोक चव्हाण यांनी हात जोडले

खतगावकर यांच्या याच वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. याविषयी नंतर खुद्द अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं. पण त्यांनी या प्रश्नाचे उत्तर न देता हात जोडले. तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधला. “पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे देशभरातील अनेक निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले आहेत. पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत,” असे चव्हाण म्हणाले.

विजयाचे शिल्पकार अशोक चव्हाण

दरम्यान, देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. या निवडणुकीत भाजला धक्का देऊन काँग्रेसने मुसंडी मारली. या विजयाचे शिल्पकार म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पहिले जात आहे. अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघात मुक्काम ठोकला होता. तसेच त्यांनी या मतदारसंघात अनेक सभा घेतल्या होत्या.

इतर बातम्या :

Degloor Biloli Bypoll Election 2021 | काँग्रेसने करुन दाखवलं, विजयानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लो

(congress leader ashok chavan comment on to become chief minister)congress leader ashok chavan comment on to become chief minister

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.