Congress: काँग्रेसच्या असंतुष्टांची नाना पटोलेंवरच भडास?; डिनर डिप्लोमसीत ‘खाना’खराबा?
congress: काँग्रेसच्या असंतुष्टाची नागपुरात डिनर डिप्लोमसी (dinner diplomacy) पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्याविरोधात सर्वच असंतुष्टांनी भडास काढल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नागपूर: काँग्रेसच्या (congress) असंतुष्टाची नागपुरात डिनर डिप्लोमसी (dinner diplomacy) पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्याविरोधात सर्वच असंतुष्टांनी भडास काढल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसला निधी मिळण्यात होत असलेला दुजाभाव आणि पटोले यांची कार्यपद्धती यावर या असंतृष्टांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसच्या नाराजांच्या या बैठकीला माजी आमदार आशिष देशमुख, सरचिटणीस संजय दुबे, तानाजी वनवे, अमर काळेंसह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. दिल्लीत नाना समर्थक काँग्रेस मंत्र्यांची तक्रार करत आहेत. तर इकडे काँग्रेस असंतुष्ट नानांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. तर काँग्रेसमधील नाराजांनी अचानक बैठक घेतल्याने त्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या नाराजांना नाना पटोले कसे शांत करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, पटोले यांच्याकडून या नाराजांच्या बैठकीबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काँग्रेसच्या नाराजांची चार दिवसांपूर्वी नागपुरात बैठक पार पडली. हे सर्व नाराज नेते डिनरसाठी एकत्र जमले होते. त्यात काही माजी आमदारांचाही समावेश होता. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे पूर्व विदर्भातील नेते अधिक प्रमाणात उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काम करण्याची शैली, रेंगाळलेल्या समित्यांवरील नियुक्त्या, गटबाजी यावर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस नाराजांच्या या डिनर डिप्लोमसीत काँग्रेस संघटन बळकटीकरणावरही चर्चा झाली
सोनिया गांधींकडे भेटीची वेळ मागितली
दरम्यान, काँग्रेसचे आमदार राजधानी दिल्लीत प्रशिक्षणासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. या आमदारांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. आम्ही पत्रातून फक्त वेळ मागितली नाराजीचा प्रश्नच नाही, असं आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितलं.
थोपटे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार?
येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा तिढा सुटेल. संग्राम थोपटे यांच्या नावाला कुणाचाही विरोध नाही, असं आमदार अमित झनक यांनी सांगितलं. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं सांगितलं जात आहे.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : औरंगाबादेत गर्भपाताच्या किटची बेकायदेशीर विक्री
Video: Urvashi Rautela झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार! लाइव्ह इव्हेंटमध्ये घडला हा प्रकार