‘होय धुतले मी पाय, आणखी धुणार, पटोले माझे दैवत’, अखेर ‘तो’ कार्यकर्ता समोर

नाना पटोले यांचे पाय धुणारा कार्यकर्ता आता समोर आला आहे. या कार्यकर्त्याचं नाव विजय गुरव असं आहे. आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून या विषयाला घेऊन होणारे राजकारण थांबविण्याचे विजय गुरव यांनी आवाहन केले आहे.

'होय धुतले मी पाय, आणखी धुणार, पटोले माझे दैवत', अखेर 'तो' कार्यकर्ता समोर
नाना पटोले यांचे पाय धुणारा कार्यकर्ता आता समोर आलाय
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 6:48 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अकोल्यात कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे प्रकरण कालपासून चांगलेच गाजत आहे. नाना पटोले हे रात्री अकोला जिल्ह्यातील वाडेगावात पोहोचले असता त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यांनतर चिखलातून जात असताना नाना पटोले यांचे चिखलाने पाय भरले. यामुळे नाना पटोले यांचे समर्थक विजय गुरव नावाच्या कार्यकर्त्याने त्यांच्या पायावर पाकी टाकत पाय धुतले. नाना पटोले यांचा पाय धुतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. तसेच त्या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं. यावरून विरोधकांकडून पाटोलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, कथित पाय धुणारा कार्यकर्ता हा आता समोर आला आहे. या कार्यकर्त्याचं नाव विजय गुरव असं आहे. आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून या विषयाला घेऊन होणारे राजकारण थांबविण्याचे विजय गुरव यांनी आवाहन केले आहे.

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा सोमवारी अकोला बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथे नियोजित कार्यक्रम होता. त्याच वेळेस शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी ही वाडेगावात मुक्कामी होती. दरम्यान पालखीचे दर्शन घेण्यासाठी पटोले हे चिखलातून त्या ठिकाणी पोहोचले. पालखीचं दर्शन घेतल्यानंतर ते परतत असताना त्यांचे पाय चिखलाने भरले. त्यामुळे मी पाणी आणून पाय धुण्यासाठी त्यांच्या पायावर पाणी टाकले. यात काय गैर आहे?”, असा सवाल विजय गुरव यांनी केलाय.

विजय गुरव नेमकं काय म्हणाला?

“नाना पटोले हे माझ्या वडिलांसमान आहेत. ते माझे दैवत आहेत,. मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेल. त्यामुळे या विषयाला घेऊन आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून नानाभाऊ पटोले यांच्यावर केले जाणारे आरोप थांबवावे. माझे कुटुंबीय आणि माझ्या नावाने आपल्या राजकारणाची पोळी शिकू नये”, असे आवाहन देखील विजय गुरव यांनी केले आहे.

नाना पटोलेंचे कथीत पाय धुणारा कार्यकर्ता हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड गावाचा विजय गुरव आहे. तो पटोलेंचा पक्का कार्यकर्ता आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा या भागात पटोले आले की, हा कार्यकर्ता आवर्जून त्यांच्या सेवेत असतो, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.