निवडणुकीत फोटो वापरण्यावरुन वाद विकोपा…प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाणार

lok sabha election 2024 | जनार्दन स्वामी यांचे फोटो वापरण्यावरून दोनही गटात वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. तसेच शंतिगीरी महाराज यांनी जनार्दन स्वामी यांचे फोटो प्रचारादरम्यान वापरल्यास निवडणूक आयोगातील तक्रार करण्यात येईल, असा इशारा विश्वस्तांनी दिला आहे.

निवडणुकीत फोटो वापरण्यावरुन वाद विकोपा...प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाणार
loksabha electionImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 10:04 AM

नाशिक | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक इच्छूत उतरत आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. काही जण अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. साधू, संतही निवडणुकीत उतरत आहेत. नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्याकडून निवडणुकीत जनार्दन स्वामी यांचे फोटो वापरले जात आहे. त्याला जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्ट चे विश्वस्तांनी विरोध केला आहे. परंतु आम्ही जनार्दन स्वामी यांचा फोटो वापरणाराच अशी भूमिका शंतिगिरी महाराज अन् त्यांच्या भक्त परिवाराने घेतली आहे. यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार

शंतिगिरी महाराज यांनी निवडणुकीत जनार्दन स्वामी यांचे फोटो वापरू नये, अशी मागणी जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टच्या विश्वस्तांनी केली होती. परंतु जनार्दन स्वामी यांनी नेमलेल्या उत्तराधिकारी पैकी शंतिगिरी महाराज देखील आहेत. त्यामुळे आम्ही फोटो वापरल्यास यात गैर काय? असा प्रश्न उपस्थित करत शंतिगिरी महाराज अन् त्यांच्या भक्त परिवाराने फोटो वापरण्याची भूमिका घेतली आहे.

जनार्दन स्वामी यांचे फोटो वापरण्यावरून दोनही गटात वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. तसेच शंतिगीरी महाराज यांनी जनार्दन स्वामी यांचे फोटो प्रचारादरम्यान वापरल्यास निवडणूक आयोगातील तक्रार करण्यात येईल, असा इशारा विश्वस्तांनी दिला आहे. नाशिकमध्ये शंतिगिरी महाराज यांनी लावलेल्या होर्डींगवर जनार्दन स्वामी यांचे फोटो लावल्याने हा वाद सुरू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

महंत सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज रिंगणात उतरणार

महंत सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज देखील नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत आहेत. यासंदर्भात घोषणा करण्यासाठी आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे शांतिगिरी महाराजानंतर महंत सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज देखील नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात येत आहे. साधू, महंत नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरल्याने निवडणूक चुरशीची ठरण्याचा अंदाज आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.