Corona Cases and Lockdown News LIVE : गडचिरोलीत आता किराणाचे दुकान सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच सुरु राहणार

| Updated on: Apr 19, 2021 | 11:11 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : गडचिरोलीत आता किराणाचे दुकान सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच सुरु राहणार
corona virus news

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Apr 2021 11:11 PM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात 484 नवे कोरोनाबाधित

    मिरा भाईंदर कोरोना अपडेट :

    आजचे रुग्ण –484, एकूण रुग्ण- 38335, आज डिस्चार्ज- 416, एकूण डिस्चार्ज-33469

    आज मृत्यू 8, एकूण मृत्यू 914

  • 19 Apr 2021 11:10 PM (IST)

    जळगावात दिवसभरात तब्बल 1147 नवे रुग्ण, 24 जणांचा मृत्यू

    जळगाव कोरोना अपडेट :

    नवे  कोरोना रुग्ण -1147 कोरोनामुक्त -1209 सध्या रुग्ण–11107 मृत्यू – 24

    आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -110424 कोरोनामुक्त -97362 मृत्यू -1955

  • 19 Apr 2021 11:08 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 992 कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 992 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 18 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1950 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 7627 वर

    तर उपचार घेणारे 400 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 52510 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 62087 वर

  • 19 Apr 2021 10:29 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, किराणा मालापासून अनेक दुकानं सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत सुरु राहणार

    अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या खाद्यान्न बाबींना यात किराणामालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळविक्रेते, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, पशुखाद्य व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने इत्यादी आता सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सकाळी 8.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत या कालावधीत सुरु ठेवण्याची अनुमती असेल. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये बदल केला आहे. आरोग्य सेवा, संबंधीत रूग्णालये, मेडिकल, इत्यादींना मात्र सदर वेळेचे बंधन लागु राहणार नाही.

  • 19 Apr 2021 09:42 PM (IST)

    ठाणे शहरात दिवसभरात 1820 नवे कोरोनाबाधित

    ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट:

    # आज 1,820 रुग्ण कोरोनातून झाले बरे # आज 1,290 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,07,614 इतकी आहे # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 91,024 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 85% इतकं आहे ) # 15,089 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत # आज 7 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,501 जणांचा मृत्यू झाला # मागील 24 तासात एकूण 10,989 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 1,290 ( 11.74% ) कोरोना बाधित झाले आहेत

  • 19 Apr 2021 09:00 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 662 नवे कोरोनाबाधित, 10 रुग्णांचा मृत्यू

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 662 रुग्ण व 10 मृत्यू तर 508 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 354, तुळजापूर 30,उमरगा 68, लोहारा 34, कळंब 80, वाशी 38, भूम 30 व परंडा 28 रुग्ण

    01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613 15 एप्रिल – 764 16 एप्रिल – 580 17 एप्रिल – 653 18 एप्रिल – 477 19 एप्रिल – 662

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6008 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद – 1 लाख 91 हजार 107 नमुने तपासले त्यापैकी 30 हजार 216 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 23.02 टक्के

    23 हजार 373 रुग्ण बरे 79.04 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 735 तर 2.33 टक्के मृत्यू दर

  • 19 Apr 2021 08:58 PM (IST)

    अकोला जिल्ह्यात दिवसभरात 231 नवे रुग्ण

    अकोला कोरोना अपडेट :

    आज दिवसभरात 231 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…

    1087 अहवाला पैकी 856 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत…

    ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 34201 झाला आहे….

    आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला आहे….

    *कोरोनामुळे आतापर्यंत 567 जणांचा मृत्यू …

    आज दिवसभरात 274 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे…

    *तर 28961 जणांनी कोरोनावर मात केली आहे….

    *उपचार घेत असलेले रुग्ण 4673 आहेत……

    *शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती…..

  • 19 Apr 2021 08:53 PM (IST)

    कोविड रुग्ण असलेल्या महिलेची प्रसूती, बालकासह माता सुखरुप

    कल्याण पश्चिमेतील महापालिकेच्या आर्ट गॅरली कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. रुग्ण महिला व बाळ सुखरुप असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. ३७ वर्षाची ही महिला कोरानावर उपचार घेत आहे. ती सात महिन्याची गरोदर होती. तिने बाळाला जन्म दिला आहे. महिलेची प्रकृती गंभीर होती. तिचे सॅच्यूरेशन कमी असल्याने तिला आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आले. महिलेची प्रसूती नैसर्गिक रित्या झाली आहे. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला मुलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. अमित गर्ग, आलम मुन्शीर, संदीप इंगळे यांच्या देखरेखीखाली महिलेची प्रसूती करण्यात आली

  • 19 Apr 2021 08:22 PM (IST)

    आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची लस घेतली

    कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून आतापर्यंत सुमारे 1 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना लस देऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे, 18 ते 44 वर्षापर्यंतच्या नागरिकांचेही लसीकरण सुरू करावे, या मागणीचा पुनरुच्चार आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केला. फेब्रुवारीमध्ये टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याला हरवून ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी रुजूही झाले. मात्र लगेच त्यांना लस घेता येणे शक्य नसल्याने त्यांनी आता दोन महिन्यानंतर लस घेतली. यावेळी त्यांनी लस देणाऱ्या परिचारिका, जेजेचे डॉक्टर यांचे आभार मानले.

  • 19 Apr 2021 08:21 PM (IST)

    18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

    मुंबई  : काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  • 19 Apr 2021 08:20 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 76 रुग्णांचा मृत्यू, 4587 नवे कोरोनाबाधित

    पुणे कोरोना अपडेट : – दिवसभरात ४५८७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ६४७३ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७६ रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील. – १२६७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३७१८२४. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४६९६. – एकूण मृत्यू -६१६३. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३१०९६५. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०८९

  • 19 Apr 2021 08:19 PM (IST)

    वसई-विरारमध्ये दिवसभरात 442 नवे रुग्ण, आठ जणांचा मृत्यू

    वसई-विरार कोरोना अपडेट :

    गेल्या 24 तासात 704 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, तर आज दिवसभरात 08 जणांचा मृत्य, 442 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 44,830

    कोरोनामुक्त झालेली रुग्णसंख्या – 35,232

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या – 977

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्णसंख्या – 8621

  • 19 Apr 2021 07:42 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 351 रुग्णांचा मृत्यू, 57,924 नवे कोरोनाबाधित

    राज्यात दिवसभरात 57,924 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 351 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, दिवसभरात 52,412 रुग्ण बरे होऊन घरी गेले, बरे होण्याचे प्रमाण 81.04 टक्के, तर मृत्यूदर 1.56 टक्के

  • 19 Apr 2021 07:33 PM (IST)

    ऋतुराजचा पहिल्याच चेंडूवर चौकार

    सामन्यातील पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दणक्यात सुरुवाती केली आहे.

  • 19 Apr 2021 07:22 PM (IST)

    देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार

    नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.

    सविस्तर बातमी वाचा :

  • 19 Apr 2021 07:10 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरातील डॉक्टरांसोबत बैठक सुरु

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व डॉक्टरांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. या बैठकीत देशभरातील डॉक्टर आणि फार्मा कंपनीते मालकही उपस्थित असल्याची माहिती आहे. या बैठकीत ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 19 Apr 2021 07:01 PM (IST)

    मुंबईत दिवसभरात 57 रुग्णांचा मृत्यू, तर 7381 नवे कोरोनाबाधित

    मुंबईत आज 7381 रुग्णांना कोरोनाची लागण आज 8583 जणांना डिस्चार्ज आज 57 जणांचा मृत्यू

  • 19 Apr 2021 06:50 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 593 नवे रुग्ण, 16 जणांचा दुर्देवी मृत्यू

    अमरावती : अमरावती जिल्हात आज 593 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.. आज 16 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू… 425 रुग्णांनी केली आज कोरोनावर मात… जिल्हात आतापर्यंत 57165 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण… आतापर्यंत 50830 रुग्णांनी केली कोरोनावर मात… -जिल्हात 793रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू… अमरावतीत 5542 रुग्णांवर उपचार सुरू…

  • 19 Apr 2021 06:31 PM (IST)

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग, दिल्लीतील एम्समध्ये दाखल

    देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.

  • 19 Apr 2021 06:28 PM (IST)

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग, दिल्लीतील एम्समध्ये दाखल

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग झाला आहे. दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी ते दाखल झाले आहेत. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गावरुन कालच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं.

  • 19 Apr 2021 06:11 PM (IST)

    नागपूरमध्ये भयानक परिस्थिती ! दिवसभरात तब्बल 113 रुग्णांचा मृत्यू

    नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 113 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    – कोरोनाच्या संकटात आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यूने हादरलं नागपूर

    – जिल्ह्यात दोन दिवसांपासून रेमडेसिवीर आणि ॲाक्सिजनचा तुटवडा

    – यामुळे जिल्ह्यात मृत्यू वाढल्याची शक्यता

    – जिल्ह्यात २४ तासांत ७३७४ नव्या रुग्णांची नोंद

    – ५०९७ रुग्ण झाले कोरोना मुक्त

    – जिल्ह्यात २४ तासांत १७९७८ चाचण्या

  • 19 Apr 2021 06:10 PM (IST)

    चंद्रपुरात 22 रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात 1213 नवे रुग्ण

    चंद्रपूर:  गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहा:कार, 7466 नमुने तपासणीतून 1213 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 22 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 43444

    एकूण कोरोनामुक्त : 31281

    ऍक्टिव्ह रुग्ण : 11541

    एकूण मृत्यू : 622

    एकूण नमूने तपासणी : 332411

  • 19 Apr 2021 06:09 PM (IST)

    यवतमाळमध्ये भयानक परिस्थितीत, तब्बल 37 रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात 810 नवे रुग्ण

    यवतमाळ-

    यवतमाळमध्ये आज 810 नवे रुग्ण आज मृत्यूचा आकडा वाढला, आज तब्बल 37 मृत्यू सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या – 5720

    एकूण रुग्ण संख्या – 41457 एकूण मृत्यू – 923

  • 19 Apr 2021 06:07 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचे 520 नवे रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण – 520 आज झालेले मृत्यू – 21 आज बरे झालेले – 663

    तालुका नुसार रुग्ण संख्या

    गोंदिया—————317 तिरोडा—————83 गोरेगाव—————03 आमगाव————–27 सालेकसा————-09 देवरी——————03 सडक अर्जुनी ———–07 अर्जुनी मोरगाव——–69 इतर राज्य————–02

    एकूण रुग्ण – 26160 एकूण मृत्यू – 366 एकूण बरे झालेले – 19299 एकूण उपचार घेत असलेले – 6495

  • 19 Apr 2021 06:05 PM (IST)

    शरद पवार-संजय राऊत यांची भेट, बैठकीत नेमकी चर्चा काय?

    शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. तसेच तब्येतीची विचारपूस केली, असं राऊत यांनी सांगितलं.

    संजय राऊत यांची प्रतिक्रिया 

    सहज भेटलो, ते इस्पितळातून आले. त्यांची ख्याती खुशाली विचारायला आलो. त्यांची तब्येत त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घ्यायचा होत्या.

    राजकीय विषयांवर चर्चा का होणार नाही ? का करू नये ? इतके मोठे राजकीय नेते आहेत ! राजकीय चर्चा तर होतेच ! कोरोनावरही चर्चा झाली.

    पवार साहेब वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर फार चिंताग्रस्त आहेत. एकंदरीतच देशातील कोरोना परिस्थिती बाबत ते माहिती घेत आहेत. त्यांच्या बोलण्यातून ती चिंता जाणवली.

    राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात, होत राहतील. पण सरकारला कोणताही धोका नाही. सरकार मजबुतीने उभे आहे.

    देशभरातील सर्व नेत्यांचे मत आहे की संसदेचं विशेष अधिवेशन कोरोना स्थिती जाणून घेण्यासाठी बोलवण्यात यावं. सविस्तर चर्चा व्हायला हवी तरच संपूर्ण परिस्थितीचे आकलन होऊ शकेल.

    पवार साहेबानी मला विचारलं की बाहेर गर्दी आहे का ? मी म्हटलं गर्दी अजून दिसते आहे. लोकांनी अजून थोडी शिस्त पाळणे गरजेचे आहे. पवार साहेबांना चिंता आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद सुरू आहे.

    राष्ट्रीय राजकारणावरची चित्र तुम्हाला हळूहळू स्पष्ट होतील. आधी पवार साहेबांची प्रकृती महत्वाची आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यातून ते पूर्ण बरे होऊन कामाला लागतील.

  • 19 Apr 2021 06:02 PM (IST)

    यवतमाळमध्ये कोरोनाची भीषण परिस्थिती, बेड अभावी रुग्णाचा मृत्यू

    यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयाच्या फिवर ओपीडी बाहेर रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू, गेल्या दीड तासापासून ऑक्सिजन लावून रुग्ण होता रुग्णवाहिकेतच, बेड नसल्याने वेटिंगवर होता रुग्ण, बबन गुल्हाने रा दारव्हा असे मृत व्यक्तीचे नाव

  • 19 Apr 2021 06:01 PM (IST)

    माझ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना नट-नट्या कशा सुचतात? : हसन मुश्रीफ

    कोल्हापूर :

    हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    माझ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना नट-नट्या कशा सुचतात

    माधुरी दीक्षित यांच्यासोबय माझी तुलना कशी करता येईल

    ट्रम्प यांच्यासोबत नाव जोडल्याबद्दल आभारी आहे, पण महिलेशी तुलना कशी करता

    ट्रम्प यांच्याबरोबर आणखी लोकप्रिय नेत्यांचे नाव जोडले असते तर चालले असते

    हसन मुश्रीफ यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक

    कोरोना संकटात फडणवीस विनाकारण राजकारण करत आहेत

    कोरोना संपल्यानंतर सरकार अस्थिर करण्याचं प्लॅन असतील ते करा मुश्रीफ यांचा खोचक टोला

  • 19 Apr 2021 05:59 PM (IST)

    कोरोनाचा सामना करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिले एक दिवसाचं वेतन

    पुणे :

    कोरोनाचा सामना करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिले एक दिवसाचं वेतन

    एक दिवसाच्या वेतनामधून 1.97 कोटी रूपयांचा उभारला निधी

    या निधीतून ग्रामीण भागात कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स नियुक्त करण्यासाठी करण्यात येणार

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

  • 19 Apr 2021 05:56 PM (IST)

    शिवसेनेच्या कार्यकर्त्याने डॉ. संजय कुटे यांच्या गाडीला लाथ मारली, बुलडाण्याती वातावरण गरम

    बुलडाणा : आज पुन्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्याने डॉ. संजय कुटे यांच्या गाडीला लाथ मारली, शहरात वातावरण गरम, आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, तर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याने गायकवाड यांच्या कार्यालयाकडे निघाले

  • 19 Apr 2021 05:17 PM (IST)

    मुक्ताईनगरमध्ये महसूल विभागाच्या 2 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू

    मुक्ताईनगर :

    महसूल विभागाच्या 2 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू महसूल यंत्रणेसह तालुक्याभरात हळहळ व्यक्त होत आहे

    मुक्ताईनगर तालुक्यात रविवारी दोन कोतवालांचा कोरोनामुळे मृत्यू, मुक्ताईनगरचे कोतवाल भागवत भोलाणे आणि बाळू चिखलकर दोन्ही कोतवाल खाजगी हॉस्पिटलमध्ये येथे उपचार घेत होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली

  • 19 Apr 2021 04:38 PM (IST)

    किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार, आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

    राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

    येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली.

    दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, असा निर्णय झाला.

    ऑक्सिजन हा महत्त्वाचा विषय आहे. आपण स्वत:चं साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन वापरत आहोत. पण त्याचबरोबर 300 मेट्रिक टन आपण बाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून आणतोय. त्यामुळे 1550 टन ऑक्सिजन दररोज महाराष्ट्रात आहे. येत्या 20 तारखेपर्यंत ऑक्सिजन कोट्यापर्यंत सांगितलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर आणखी ऑक्सिजनची गरज लागेल. पुढे आपण ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कलेक्टरने त्वरित निर्णय घ्यावा.

  • 19 Apr 2021 04:27 PM (IST)

    सोलापूरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी

    सोलापूर जिल्हा बेड/ ऑक्सिजन साठा/रेमडिसिव्हर माहिती

    शासकीय हॉस्पिटलसह खाजगी हॉस्पिटलमध्ये 1990 जनरल बेड, कोरोनाबाधित रुग्णांसाठी 1490 बेड फुल,  247 बेड संशयित रुग्णासाठी वापर,  270 जनरल बेड रिकामे

    ऑक्सिजनचे 791 पैकी 707 बेड फुल्ल 84 बेड रिक्त

    व्हेंटिलेटरचे 135 पैकी 130 बेड फुल्ल

    रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सुरू ( रोज हजार ते बाराशे इंजेक्शनची मागणी पुरवठा मात्र तीनशे ते साडेतीनशे )

    अस्वस्थ रुग्णांसाठी 56 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता, मात्र 36 मेट्रिक टन ऑक्सिजनचा होत आहे पुरवठा, अतिगंभीर रुग्णावर इलाज करण्यात दवाखाने हतबल, सिव्हीलचे कोव्हीड सेंटर हाऊसफुल्ल

  • 19 Apr 2021 04:26 PM (IST)

    जळगावात 11193 सक्रीय कोरोना रुग्ण, सध्या 1000 ऑक्सिजन बेड्स शिल्लक

    जळगाव कोरोना अपडेट

    एकुण सक्रिय रुग्ण – 11193

    एकूण बेड – 12000 शिल्लक बेड – 6798

    ऑक्सिजन बेड – 3200 शिल्लक बेड – 1000

    आयसीयु बेड – 1100 एकुण – शिल्लक – नाही

  • 19 Apr 2021 04:01 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली तातडीची बैठक

    देशात कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. वाढत्या कोरोनाबाधितांसह कोरोनामुळे मृतकांची संख्यादेखील वाढत आहे. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व फार्मा कंपन्यांसोबत संध्याकाळी सहा वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.

  • 19 Apr 2021 03:53 PM (IST)

    खासदार मनोज कोटक यांची शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊतांवर टीका

    खासदार मनोज कोटक यांची शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊतांवर टीका – राऊत साहेबांना दोन दिवसांचं संसदीय सत्र बोलावण्याचा अधिकार. पण त्याआधी मविआच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी रस्त्यावर ऊतरून काम करायला हवं, लोकांना बेड्स मिळत नाही, ऑक्सिजन नाही, इंजेक्शन नाही, आणि राज्याचे मंत्री, मविआचे नेते केंद्रावर जे बिनबूडाचे आरोप करत आहेत, राऊत यांनी त्यांना ताकिद द्यावी, असं मनोज कोटक म्हणाले.

  • 19 Apr 2021 03:52 PM (IST)

    कोरोनावर विधानसभेचे विशेष सत्र आयोजित करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

    कोरोनावर विधानसभेचे विशेष सत्र आयोजित करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी,

    – राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा विशेष सत्राची मागणी

    – चंद्रकांत पाटील यांचे ट्विट – कोरोनामुळे देशातील महाराष्ट्राची परिस्थिती सर्वात बिकट

    – विधानसभेच्या विशेष सत्रात कोरोनाची परिस्थिती सरकारने स्पष्ट करावी

  • 19 Apr 2021 03:48 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रद्रोह केला, भाई जगताप यांचा घणाघात

    भाई जगताप यांची फडणवीस यांच्यावर टीका

    नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र द्वेष आहेच, कारण अनेक प्रकल्प – कार्यालये महाराष्ट्रबाहेर नेले. आता फडणवीस यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे. गुजरात मॉडेलचे भलामण करणाऱ्या या व्यक्तीने महाराष्ट्र कसा मागे राहील असंच पाहिलं.

    फडणवीस सत्तेसाठी किती लाचार आहांत, त्यांच्या परवाच्या कर्तृत्ववाने राज्याचे नाव धुळीस मिळवले. रेमदेसीवीर इंजेक्शनचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस जातात ?

    प्लाझ्मा दान करण्याबाबत अभियान मुंबई काँग्रेसतर्फे राबवले जाणार आहे,

    परवा रात्री सरकारी कामांत ढवळाढवळ केल्याबद्दल फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे

    लॉकडाऊन उठल्यावर फडणवीस, भाजप यांना सळो की पळो करून राहिल्या शिवाय रहाणार नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, फडणवीस यांची 100 पापे भरली आहेत

    पावणे पाच कोटी रुपयांचे रेमडेसिवीर औषध खरेदी केल्याचं ते म्हणतात. पण असं करता यईल का ?

    असं खरेदी करता येत असतं, तर अडाणी -बांनीने ते आधीच खरेदी केले असते

  • 19 Apr 2021 03:40 PM (IST)

    जालना शहरात घराबाहेर मोकाट फिरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

    जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी लॉकडाऊन असताना बाहेर फिरणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी अंबड चौफुली येथे कोरोना चाचणी सुरु केली. यामध्ये पहिलाच पकडलेला व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला. पोलीस आणि महसूल विभागाने ही कारवाई चालू केल्याने जालना शहरात मोकाट विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांना लगाम बसणार आहे

  • 19 Apr 2021 03:37 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती घातक : नितीन राऊत

    नितीन राऊत पत्रकार परिषद मुद्दे :

    – नागपूर जिल्ह्याची कोरोनाची स्थिती घातक झालीय

    – नागपूरात कम्यूनीटी स्प्रेडर झालाय कोरोना

    – विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन नागपूरात काही बाबी करतोय

    – ॲाक्सीजनचा तुटवडा झाल्याने काल हाहाःकार माजला

    – लॅायड स्टील कडे मोठ्याप्रमाणात ॲाक्सीजन आहे

    – वर्धा लॅायड स्टील प्लान्टच्या बाजूला १००० बेडचं रुग्णालय उभारु

    – लॅायड स्टीलमधून ॲाक्सीजन आणू शकत नाही, त्यामुळे हा निर्णय

    – महानिर्मितीचे कोरोडी आणि खापरखेडा प्रकल्पात ॲाक्सीजनचं उत्पादन होतंय, त्याला कॅाम्प्रेसरची गरज

    – कॅाम्प्रेसर लावल्यास रोज १ हजार सिलिंडर रोज उत्पादन

    – आज चार टॅंकरमध्ये ८२ मेट्रिक टन ॲाक्सीजन आलंय

    – विदर्भात या ॲाक्सीजनचं वाटप झालंय

    – हिंगणा परिसरात ॲाक्सीजन प्लांट उभारतोय

    – मानकापूर क्रीडा संकुलात जंबो कोवीड सेंटर सुरु करणार

    – RTPCR चा वेग वाढवण्यासाठी मशीन घेणार, त्याद्वारे ३० मिनीटांत रिपोर्ट

    – १७ आणि १८ ला नागपूरात एकंही रेमडेसवीर वायल आली नाही

    – आज ३००० हजार रेमडेसवीर च्या वायल आल्याय

    – आज आलेल्या रेमडेसवीरचं वितरण सुरु आहे

    – २३ हॅाटेल्सला कोवीड केअर सेंटरची परवानगी देण्यात आलीय

    – लसीकरण हा एकमेव इलाज आहे

    – ६४ पेक्षा जास्त लोकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला

    – मेडीकल मध्ये ५० आणि मेयो मध्ये २० प्रेत आहे, काल अत्यंसस्कार थांबले होते

    – कोरोना बाधीत मृतकावर निःशुल्क अत्यंसंस्कार करण्याचे आदेश

    – नागपूरात अत्यावश्यक सेवेतील दुकानं एक वाजेपर्यंत ठेवा

    – पालकमंत्री नितीन राऊत यांच्या मनपा आयुक्तांना सुचना

    – रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसू नये, अशा पोलीस आयुक्तांना पालकमंत्र्यांच्या सुचना

    – बेड नाही, नागपूरकरांनी घरातंच थांबाल, प्रशासनासा सहकार्य करावं

    – नागपूरात निर्बंध आणखी कडक होणार

  • 19 Apr 2021 02:24 PM (IST)

    मुंबईच्या एस वार्डात मनपाने जारी केली नवी नियमावली, जिवनावश्यक सेवा देणारी दुकानेही 12 वाजेनंतर बंद

    मुंबई –

    – मुंबईच्या एस वार्डात मनपाने जारी केली नवी नियमावली

    – अत्यावश्यक सेवेत असेलली जिवनावश्यक सेवा देणारी दुकानेही 12 वाजेनंतर बंद

    – केवळ मेडीकल, क्लिनिक यांनाच परवानगी

    – किराणामालाची दुकाने सकाळी 8 ते 12 वा. पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश, यानंतर पाळावा लागेल कडकडीत बंद, अन्यथा होणार कारवाई, मनपा एस वार्ड भांडूपकडून परिपत्रक जारी

    – कोरोना रुग्ण संख्या जास्त असल्याने परिपत्रक जारी

    – नगरसेवकांना परिसरात फिरून नागरीकांना फवारणी जनजागृती करण्याचे आदेश

    – सेना नगरसेविका सुवर्णा कारंजे स्वत: उतरल्या रस्त्यावर दुकाने केली बंद

  • 19 Apr 2021 12:40 PM (IST)

    कल्याणमध्ये एकाच वेळी 30 कैद्यांना कोरोनाची लागण

    कल्याण :

    कल्याण आधारवाडी कारागृहात धक्कादायक प्रकार

    एकाच वेळेला 30 कैद्यांना झाली कोरोनाची लागण

    कोरोना झालेल्या कैद्याना उपचारासाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटला पाठवणार

    जेलच्या बाहेर रुग्णवाहिका पोहोचल्या

    सर्व रुग्णांची तब्येत स्थिर असल्याची जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांची माहिती

  • 19 Apr 2021 12:27 PM (IST)

    नागपुरात कोरोना रुग्णांसाठी ॲाक्सिजनचा मोठा तुटवडा

    – नागपुरात कोरोना रुग्णांसाठी ॲाक्सिजनचा मोठा तुटवडा

    – खाली ॲाक्सीजन सिलेंडर घेऊन नातेवाईक पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात

    – डॅा. कैलास सहारे खाली ॲाक्सीजन सिलेंडरसह जिल्हाधिकारी कार्यालयात

    – ॲाक्सीजन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त

  • 19 Apr 2021 12:10 PM (IST)

    कोल्हापुरात भाजी मंडई मधील गर्दी काही मोठ्या प्रमाणात ओसरली

    कोल्हापूर

    भाजी मंडई मधील गर्दी काही मोठ्या प्रमाणात ओसरली

    काल रॅपिड एंटीजन टेस्ट मधे भाजी विक्रते आणि ग्राहक पॉझिटिव्ह आढळल्याचा परिणाम

    भाजी मंडईत ही सम विषम पद्धतीने साहित्य विक्रीला सुरवात

    शहरातील भाजी मंडई हॉटस्पॉट ठरत असल्यानं प्रशासनाची ही प्रमुख मांडयांवर करडी नजर

  • 19 Apr 2021 10:02 AM (IST)

    औरंगाबादेत 30 एप्रिलनंतर लस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांवर होणार दंडात्मक कारवाई

    औरंगाबाद –

    30 एप्रिलनंतर लस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांवर होणार दंडात्मक कारवाई

    व्यापाऱ्यांनी लस न घेता दुकाने उघडण्याची परवानगी नाही

    30 एप्रिल नंतर डोस न घेता फिरणाऱ्यांना होणार दंड

    विना लस व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यास असणार मनाई

    विनाकारण फिरणारे युवक कोरोनाचा फैलाव करत असल्याने त्यांची चौका चौकात होणार कोरोना तपासणी

    विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी 12 पथके तैनात

  • 19 Apr 2021 09:38 AM (IST)

    वर्ध्याच्या आर्वी येथे कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या

    वर्धा

    # आर्वी येथे कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या

    # उपजिल्हा रुग्णालयात तीन दिवसांपासून उपचारासाठी भरती होता

    # काल पळून गेल्यानंतर शोध घेतला असता त्याचा विहिरीत मृतदेह आढळला

    # त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट

    # त्याचा मृतदेह आज बाहेर काढण्यात येणार आहे

    # आष्टी तालुक्यातील हा रुग्ण आहे

    # मृतदेह बाहेर काढल्यानंतर होईल ओळख स्पष्ट

  • 19 Apr 2021 08:35 AM (IST)

    नाशकात रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे चक्क इंजेक्शनची चोरी

    नाशिक –

    रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे चक्क इंजेक्शनची चोरी

    नाशिकच्या गुरुजी रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्ड बॉय ने दोन रेमडेसिवर इंजेक्शन ची केली चोरी

    म्हणजे PPE किट घालून केली चोरी

    गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    चोरी का केली याबाबत तपास सुरू

  • 19 Apr 2021 08:32 AM (IST)

    नाशकात कोरोनाची दाहक वाढ कायम, 5749 रुग्णांची वाढ

    नाशिक –

    – कोरोनाची दाहक वाढ कायम

    – जिल्ह्यात दिवसभरात, कोरोना बाधितांच्या संख्येत 5749 रुग्णांनी झाली वाढ

    – 4913 रुग्ण कोरोना मुक्त

    – दिवसभरात 40 जणांचा मृत्यू

    – अवघ्या 5 दिवसात बळींच द्विशतक

    – बळींची संख्या झाली 2935

    – नाशिक शहर हॉटस्पॉट कायम

    – दिवसभरात 3365 नवे बाधीत, 17 बळी

    – शहरात 1444 प्रतिबंधीत क्षेत्र

  • 19 Apr 2021 08:30 AM (IST)

    मुंबईच्या एलटीटी परिसरात सतत दहाव्या दिवशी गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांची आजही गर्दी

    – मुंबईच्या एलटीटी परिसरात सतत दहाव्या दिवशी लाॅकडाऊनच्या भीतीपोटी गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांची आजही गर्दी

    – पवन आणि गोदान एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी मजूरांची गर्दी

    – गर्दी आणि रांगांमुळे सोशल डिस्टोंसिंगचा पुर्णपणे फज्जा

    – हाताला काम नसल्याने गावी जातोय अशी या प्रवाश्यांची भावना

    – गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पलिसांकडून बॅरिकेटींग आणि ऊद्धोषणा

  • 19 Apr 2021 08:17 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात आज 1429 कोरोना रुग्णांची वाढ

    औरंगाबाद –

    औरंगाबाद जिल्ह्यात आज 1429 कोरोना रुग्णांची वाढ

    कोरोनाबधितांचा आकडा पोचला 1 लाख 9 हजार वर

    तर काल एका दिवसात 22 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला

    मृतांचा आकडा पोचला 2156 वर

    सध्या औरंगाबादेत 15739 रुग्णांवर उपचार सुरू

  • 19 Apr 2021 08:00 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 6 हजार 434 नव्या बाधितांची नोंद

    पुणे –

    – गेल्या तीन चार दिवसांपूर्वी पाच हजारांपर्यंत आलेली बाधितांची संख्या आता पुन्हा एकदा सहा हजारांच्या आसपास पोहोचलीय,

    – गेल्या 24 तासांत 6 हजार 434 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे,

    – तसेच 73 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 20 बाधित पुण्याबाहेरील आहेत,

    – बाधितांची संख्या पुन्हा वाढण्याला सुरूवात झाली असून त्या तुलनेत डिस्चार्जची संख्याही वाढत आहे,

    – दिवसभरात 4 हजार 712 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

    – आता एकूण बाधितांची संख्या 3 लाख 67 हजार 237 झाली आहे,

    – तर बरे झालेल्यांची संख्या 3 लाख 4 हजार 492 झाली असून बाधितांमधील 56 हजार 636 सक्रीय आहे.

  • 19 Apr 2021 07:35 AM (IST)

    नागपुरात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला

    – नागपुरात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला

    – शहरात व्हायचं १५ ते १६ हजार लोकांचं लसीकरण

    – लस नसल्याने आता केवळ १०१२४ जणांचं लसीकरण

    – लसीकरण केंद्रावरुन लोक जात आहेत परत

    – ना लसीकरण, ना औषध, ना रुग्णालयात बेड नाही व्हेंटिलेट

    – नागपूरात कोरोनामुळे हाहाःकार

  • 19 Apr 2021 07:31 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात रेमडेसवीरचा काळाबाजार

    – नागपूर जिल्ह्यात रेमडेसवीरचा काळाबाजार

    – रेमडेसवीरचा काळाबाजार करणाऱ्या आणखी चौघांना बेड्या

    – जिल्ह्यात आतापर्यंत १२ जणांना पोलिसांनी केली अटक

    – शुअरटेक हॅास्पीटलच्या वॅार्डबॅायच्या म्होरक्यांचा शोध सुरु

    – क्रीडा चौकातील ओजस कोवीड सेंटरमधील वॅार्डबॅायकडून रेमडेसवीरची चोरी

    – काळाबाजार करुन २६ हजारांपर्यंत रेमडेसवीरची विक्री

    – नागपूरात रेमडेसवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या पोलीसांच्या रडारवर

  • 19 Apr 2021 07:30 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कोव्हिड 19 लसीकरणाचा तीन लाखांचा टप्पा पूर्ण

    पिंपरी चिंचवड

    – पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या 62 आणि खासगी 29 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.

    – नोंदणीकृत आरोग्य सेवा देणारे, फ्रंट लाईन वर्कर आणि 45 वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे.

  • 19 Apr 2021 07:17 AM (IST)

    नागपूर महरपालिकेची यंत्रणा सपसेल फेल, ना बेड मिळत ना व्हेंटिलेटर

    – नागपूर महरपालिकेची यंत्रणा सपसेल फेल, ना बेड मिळत ना व्हेंटिलेटर

    – फक्त वैठका आणि पाहणी दौरे, वर्षभरात आर्थिक तरतूद नाही

    – नागपूरात बेड फुल्ल झाल्याने रस्त्यावर दगावत आहेत कोरोना रुग्ण

    – मनपाच्या रुग्णालयात ४२२ बेड, पण सरकारी अनास्थेमुळे ॲाक्सीजन बेड नाही

    – वर्षभरात मनपाने डॅाक्टरांची नियुक्ती केली नाही

  • 19 Apr 2021 07:11 AM (IST)

    चंद्रपुरात गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहाकार, 1,584 नव्या रुग्णांची नोंद

    चंद्रपुरात गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहाकार, 4901 नमुने तपासणीतून 1584 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 25 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 42231

    एकूण कोरोनामुक्त : 30650

    ऍक्टिव्ह रुग्ण : 10981

    एकूण मृत्यू : 600

    एकूण नमूने तपासणी : 329846

  • 19 Apr 2021 07:05 AM (IST)

    अहमदनगरमध्ये कोरोनाचं थैमान, जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये मोठे बदल

    अहमदनगरमध्ये कोरोनाचं थैमान

    त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये मोठे बदल केले आहेत

    कोरोना नियंत्रणासाठी अहमदनगरमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत

    हे बदललेले नियम 18 एप्रिलपासून तर 1 मे 2021 पर्यंत लागू असणार

  • 19 Apr 2021 06:56 AM (IST)

    जालन्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली, बेडची कमी

    जालन्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता बेड कमी पडत आहेत. यावर उपाय म्हणून आता जालना शहरातील अग्रसेन भवन येथे १६० खाटांचे वातानुकूलित कोव्हिड सेंटर उभारण्यात येत आहे. या अग्रसेन भवन मध्ये २५० खाटा पर्यंत बेड वाढवता येतील एव्हडी जागा असल्याने, आरोग्य खात्याचा बेड कमी असल्याचा ताण कमी होणार आहे. या अग्रसेन भवन मध्ये उभारण्यात येणाऱ्या कोव्हिड सेंटरची आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली. या वेळी या कोव्हिड सेंटरसाठी डॉक्टरसह सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले

  • 19 Apr 2021 06:54 AM (IST)

    येत्या दोन दिवसात रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होईल; नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करा – धनंजय मुंडे

    बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दुसऱ्या लाटेत अधिक धोका वाढला असून जिल्हा वासियांनी प्रशासनास सहकार्य करावं असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. रेमडीसिव्हर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे कोरोना ग्रस्त नातेवाईकांची धावपळ उडतेय. आज जिल्हा प्रशिक्षण केंद्राबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. मात्र रेमडीसिव्हर इंजेक्शनची कमतरता असली तरी येत्या दोन दिवसात हे इंजेक्शन उपलब्ध होईल, यासह इतर अडचणी दूर होतील असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं आहे. तर बीड मध्ये 350 बेड वाढवले जाणार असून लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू आहे. या बरोबरच अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 150 बेड वाढवणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Published On - Apr 19,2021 11:11 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.