Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात दिवसभरात तब्बल 676 रुग्णांचा मृत्यू, 67 हजार 160 नवे कोरोनाबाधित
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात 16 रुग्णांचा मृत्यू, 571 नवे कोरोनाबाधित
गडचिरोली : जिल्हयात आज 571 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 18004 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13375 वर पोहचली. तसेच सध्या 4318 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्हयात एकूण 311 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्क्यांवर पोहोचलं आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.98 टक्के तर मृत्यू दर 1.73 टक्के आहे.
-
उस्मानाबादेत कोरोनाचे दिवसभरात 810 नवे रुग्ण
उस्मानाबाद कोरोना अपडेट :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 810 रुग्ण व 20 मृत्यू तर 581 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुक 304, तुळजापूर 90,उमरगा 79, लोहारा 43, कळंब 123, वाशी 60, भूम 65 व परंडा 46 रुग्ण
01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613 15 एप्रिल – 764 16 एप्रिल – 580 17 एप्रिल – 653 18 एप्रिल – 477 19 एप्रिल – 662 20 एप्रिल – 645 21 एप्रिल – 667 22 एप्रिल – 719 23 एप्रिल – 719 24 एप्रिल – 810
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6404 अॅक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 03 हजार 407 नमुने तपासले त्यापैकी 33 हजार 776 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 25.68 टक्के
25 हजार 536 रुग्ण बरे 80.11 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 836 तर 2.28 टक्के मृत्यू दर
-
-
धक्कादायक ! यवतमाळच्या कोव्हिड सेंटरमधून 30 रुग्ण पळाले, अधिकाऱ्यांकडून शोध सुरु
यवतमाळ : यवतमाळच्या घाटंजी येथील कोव्हिड सेंटरमधून 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे पलायन, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घाटंजी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सूरु, आरोग्य यंत्रणेकडून पलायन केलेल्या रुग्णांचा शोध सुरू
-
वर्ध्यात दिवसभरात सर्वाधिक 932 नव्या रुग्णांची नोंद
वर्धा :
– वर्धेत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ
– मागील २४ तासात आढळले सर्वाधिक 932 रुग्ण
– रुग्णवाढीसोबत मृत्यूदरातही वाढ
– 31 कोरोनाबधितांचा आज मृत्यू
– जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 30677 रुग्ण तर 24468 रुग्ण कोरोनामुक्त
– आतापर्यंत 664 रुग्णांचा मृत्यू
– जिल्ह्यात 5545 ऍक्टिव्ह रुग्ण
– दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालये फुल्ल
– जिल्ह्याच्या रुग्णालयाचे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड फुल्ल
-
राज्यात दिवसभरात तब्बल 676 रुग्णांचा मृत्यू, 67 हजार 160 नवे कोरोनाबाधित
राज्यात दिवसभरात 67 हजार 160 नवे रुग्ण, दिवसभरात तब्बल 676 रुग्णांचा मृत्यू, तसेच दिवसभरात 63 हजार 818 रुग्ण बरे होऊन घरी गेले
67,160 new #COVID19 cases, 63,818 discharges and 676 deaths were reported in Maharashtra in the last 24 hours
Active cases: 6,94,480 Death toll: 63928 Total cases: 42,28,836 Total recoveries: 34,68,610 pic.twitter.com/8CRVohdcrM
— ANI (@ANI) April 24, 2021
-
-
सांगलीत महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयाचे जयंत पाटलांच्या हस्ते उद्घाटन
सांगली : महानगरपालिकेच्या कोविड सेंटरचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन.
-
पुण्यात दिवसभरात 74 रुग्णांचा मृत्यू, 3991 नवे कोरोनाबाधित
पुणे शहर कोरोना अपडेट : – दिवसभरात ३९९१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४७८९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७४ रुग्णांचा मृत्यू. १९ रूग्ण पुण्याबाहेरील. – १३६४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३९५४८६. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९४७२. – एकूण मृत्यू -६४४३. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३३९५७१. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२२७.
-
सोलापुरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर जोरदार निदर्शने
रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्याच्या कामात प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप
पालकमंत्री म्हणून सुद्धा जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आंदोलनकर्त्यांनी केला आरोप
बार्शी येथे बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आल्यानंतरचा प्रकार
आप्पासाहेब पवार आणि बालाजी डोईफोडे या दोन आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
-
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 21 जणांचा मृत्यू, तर 1618 नवे कोरोनाबाधित
चंद्रपूर : गेल्या 24 तासात कोरोनाची आजवरची सर्वोच्च संख्या, 4036 नमुने तपासणीतून 1618 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 21 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 51112
एकूण कोरोनामुक्त : 35712
अॅक्टिव्ह रुग्ण : 14646
एकूण मृत्यू : 754
एकूण नमूने तपासणी : 353072
-
पालघर ग्रामीणमध्ये नवीन 962 रुग्ण तर 16 जणांचा मृत्यू
पालघर : पालघर ग्रामीणमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत असून मृतांच्या संख्येत ही मोठी भर पडत आहे. पालघर ग्रामीणमध्ये गेल्या 24 तासांत 962 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 16 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात 506 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या 6691 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 2473 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट
आज कोरोना रुग्ण -2473
आज कोरोनामुक्त -1417
आज मृत्यू -81
एकूण कोरोना रुग्ण -198402
एकूण कोरोनामुक्त -170652
एकूण मृत्यू -2610
-
जालन्यात आज 984 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले
जालन्यात आज 984 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले
988 रुग्ण कोरोनामुक्त झाले
आज 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
-
नागपुरात आज पुन्हा 82 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 7999 नव्या रुग्णांची नोंद
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज पुन्हा 82 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
7999 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
तर 6264 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्ण संख्या – 366417
एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 284566
एकूण मृत्यूसंख्या- 6849
-
नवी मुंबईत नाशिक, विरारसारखी घटना होऊ नये म्हणून पालिका सतर्क
नवी मुंबईत नाशिक, विरारसारखी घटना होऊ नये म्हणून पालिका सतर्क
कोविड केंद्रांसह सर्व खासगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश
चार दिवसांत महानगरपालिका फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश
त्या त्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींकडून हे ऑडीट करून घेतले जाणार
मनपाचे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच त्यांच्या सुरक्षिततेकडेही काटेकोर लक्ष
-
लसीकरणासाठी राज्याकडून ग्लोबल टेंडर- अजित पवार
सध्या देशात ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मोदीकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबतीत मागणी केली आहे. तसेच ऑक्सिजनची वाहतूक हावाईमार्गे करण्यासाठी परवानगी द्यावी असेसुद्धा ठाकरे यांनी मागणी केली मात्र, मात्र ही मागणी 50 टक्के मान्य करण्यात आली. रिकामे ऑक्सिजनचे टँकर हवाईमार्गे नेण्याची परवानगी केंद्राने दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आम्ही काही निर्णय लाँगटर्मचा विचार करुन घेत आहेत. विशेषत: 18 ते 44 वयोमानामध्ये लस देण्याची जबाबदारी राज्याने उचलावी असे मत केंद्राचे आहे. तस सर्व राज्य ही जबादारी केंद्राने उचलावी असे सर्व राज्य म्हणत आहेत. मात्र, टोलवाटोलवी करुन चालणार नाही. त्यासाठी आम्ही ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल टेंडरसाठी पाच जाणांची समिती नेमली आहे. यामध्ये राज्य सरकारचे मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. वित्त विभागाचे मुख्य सचिव, सार्वजिनक विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि उद्योग विभागाचे सचिव हे या समितीचे सदस्य असतील. यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक सर्व लसींचा या ग्लोबल टेंडरमध्ये उल्लेख करावा असंसुद्धा मुख्य सचिवांना सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी माहिती दिलीआहे. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो, ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख ग्लोबल टेंडरमध्ये असेल.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तसं आहे, अशी माहितीसुद्धा अजित पवार यांनी दिली आहे. जामनगरचा जो कोटा आहे तो वाढवला नसला तरी कमी करु नका अशी केंद्राला विनंती केलीय. इंजेक्शनचा तुटवडा आहे, मात्र दोन-तीन दिवसात औषध कंपन्या प्राधान्य देतील असं सांगितलं पण केंद्राने पुन्हा त्यांचा ताबा घेतला. आमची केंद्राला विनंती आहे. मी गडकरींशी बोललो, ते म्हणाले विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही.
मोफत लस
1 मे रोजी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका काय आहे, ते सांगतील. ग्लोबल टेंडर काढू. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही, आमची क्षमता आहे तेवढी देऊ, इतर कंपन्यांच्या लसी घेण्याबाबत त्यांनी सांगितलं.
ऑक्सिजन केंद्राकडून ऑक्सिजन येण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर केंद्राचं नियोजन आहे.
-
केडीएमसी उभारणार ऑक्सिजनचे प्लांट, आयुक्तांची माहिती
कल्याण : केडीमसी क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता रुग्णांना ऑक्सfजन बेड मिळणे कठीण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे दोन प्लांट उभारणार आहे. त्याची निविदा नुकतीच महापालिकेने काढली आहे. हे दोन्ही प्लांट मे महिन्यात कार्यान्वित होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
-
नितीन गडकरींनीघेतला कोरोना प्रतिंबधक लसीचा दुसरा डोस
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
नागपूरच्या एम्स रुग्णालयात जाऊन घेतली लस
त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाशी संवादसुद्धा साधला
रुग्णालयातली सर्व परिस्थिती घेतली जाणून
नागरिकांनासुद्धा केलं लस घेण्याचं आवाहन
-
9 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला, छगन भुजबळ यांचा आरोप
– नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा- छगन भुजबळ
– 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज 70 ते 80 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध- भुजबळ
– दररोज सकाळपासून ऑक्सिजनसाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात- भुजबळ
– नाशिकमधील डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातील घटना दुर्दैवी- भुजबळ
– परराज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले- भुजबळ
– ऑक्सिजनची कमतरतात सर्वच राज्यात- भुजबळ
– कोणी कुंभमेळात होते, तर कोणी पश्चिम बंगालमध्ये होत त्यामुळे कोरोनाचा मोठा स्फोट होईल- भुजबळ
– 9 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवल्याचा आरोप
– कच्चा माल देण्यासाठी अमेरिका आपल्या जनतेचे विचार करते आणि आपण परदेशात वाटतो-भुजबळ
-
अमित ठाकरेंना डिस्चार्ज, कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने दिला डिस्चार्ज
मुंबई : अमित ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
कोरोनाची लागण झाल्याने अमित ठाकरेंना लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते
20 एप्रिलपासून सुरु होता उपचार, लक्षणे कमी झाल्याने दिला डिस्चार्ज
मात्र अमित ठाकरेंना घरी विलगीकरणात राहावे लागणार
-
परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे कोरोनामुळे निधन
परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे आज कोरोनाने निधन झाले
१५ एप्रिल रोजी अत्यवस्थ वाटल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
त्यांच्यावर उपचार सुरू होते
मात्र उपचार सुरू असतांना आज त्यांची प्राणजोत मावळली.
मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले वायकर हे ९ जुलै २०१९ रोजी कोषागार अधिकारी परभणी या पदी रुजू झाले होते
त्यांच्या सुस्वभावी व प्रेमळ वागणुकीमुळे ते कोषागार कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी होते
त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी वृंद शोकाकुल झाला आहे.
-
आरोग्यदूत आमदार दाखवा दहा लाख मिळवा, राष्ट्रवादीचे जळगाव पालिका चौकात आंदोलन
जळगाव – जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार
मात्र आरोग्यदूत आमदार गिरीष महाजन आहेत कुठे
आरोग्य दूत आमदार दाखवा दहा लाख मिळवा असे फलक घेऊन राष्ट्रवादी चे पालिका चौकात अनोखे आंदोलन
-
मुंबईतील बीकेसी कोविड सेंटरला दुसरा डोस घेण्यासाठी लोकांची गर्दी
मुंबई : बीकेसी कोविड सेॅटरला दुसरा डोज घेण्यासाठी ४५ वयोगटावरील लोकांची तोबा गर्दी… – १ मे पासून १८ वयोगटातील लोकांचं व्हॅक्सिनेशन सुरू होणार आहे, त्यामुळे आत बाहेर प्रचंड गर्दी… – विकेंड असल्याने अनेक गाड्या बिकेसी केविड सेंटरच्या आस पास ऊभ्या… – सोशल डिस्टेंसिंगचा पुन्हा फज्जा… फिड हाॅटलाईनला
-
साताऱ्यात कोरोना लसीचा तुटवडा, दुसऱ्यांदा लसीकरण मोहिम बंद
सातारा जिल्हयातील लसीकरण तुटवडयामुळे दुसऱ्यांदा लसीकरण मोहिम बंद…
जिल्हयातील 447 केंद्रावरील तुटवड्यामुळे लसीकरण बंद….
जिल्हयात आतापर्यंत एकूण 4 लाख 62 हजार नागरिकांना दिला पहिला डोस
जिल्हयात आतापर्यंत एकूण 63 हजार 332 नागरिकांना दिला दुसरा डोस
सातारा जिल्हयात आतापर्यंत एकूण 5 लाख 25 हजार 363. नागरिकांना लसीकरण डोस
-
यवतमाळमध्ये दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले, 5 जणांचा मृत्यू
यवतमाळ : दारू न मिळाल्याने सॅनिटीझर पिल्याने मृत्यू प्रकरणात 5 व्यक्तीचा आतापर्यंत मृत्यू
लॉकडाऊन मध्ये दारू दुकान बंद आहेत त्यामुळे दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटीझर पिल्याने मृत्यू, अशी नातलगांची माहिती
दत्ता लांजेवार नूतन पाथरटकर गणेश नांदेकर संतोष मेहर सुनील ढेंगळे अशी पाच मृत व्यक्तीची नाव आहेत ज्याचा सॅनिटीझर पिल्याने मृत्यू झाला आहे
-
कोरोना लसीकरण आणि RTPCR चाचणी न केल्यास सांगलीच्या फळ मार्केटमध्ये प्रवेश नाही
सांगली : लसीकरण आणि RTPCR टेस्ट नसेल तर सांगलीच्या फळ मार्केटमध्ये प्रवेश नाही ,
मनपा प्रशासन अक्शन मोड मध्ये
महापालिकेच्या सुचनेनंतर बाजार समितीचा निर्णय , सोमवारपासून अंमलबजावणी
, आज 40 जणांची मनपाकडून केली अँटीजन चाचणी
-
नवी दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू
नवी दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू
-
अमरावतीत मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले, दोन गॅस दाहिनी, तर एक विद्युत दाहिनी खरेदी केली जाणार
अमरावती : कोरोनाने मृत्युसंख्या वाढत असल्याने मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले आहे . परिणामी अमरावती महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक निधीतून दोन गॅस दाहिनी , तर एक विद्युत दाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे . त्याकरिता जीईएम ( जेम ) पोर्टलवर आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे . कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूपश्चात मृतदेहावर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो . कोविड , नॉन कोविड रुग्णांची मृत्युसंख्याही वेगाने वाढत आहे
-
मुंबईतील वाशी टोल नाक्यावर कोणतीही तपासणी नाही, मात्र वैध ओळखपत्र असणे आवश्यक
मुंबईच्या एन्ट्री गेट वाशी टोल नाक्यावर पोलिसांची कुठलीही तपासणी नाही
सायन पनवेल महामार्ग सुद्धा सुरळीत
महामार्ग वरील वाहने थांबवून तपासणी करण्याचे आदेश नसल्याचे पोलिसांचे म्हणणे
शहरातील मुख्य रस्ते फक्त बंद
नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी पासची आवश्यकता नाही
अत्यावश्यक सेवेतील मंडळींसाठी अंतर्गत प्रवासाला मुभा
मात्र वैध ओळखपत्र सोबत असणे आवश्यक – नवी मुंबई पोलीस
-
सातारा जिल्हयातील 92 गाव कोरोनाचा हाॅटस्पाॅट
सातारा जिल्हयातील 92 गावात कोरोनाचा हाॅटस्पाॅट…
हाॅटस्पाॅट असणारया गावात 15 दिवसात 5 हजार 634 कोरोनाचे रुग्ण….
जिल्हयात सध्या 15094 रुग्णांवर उपचार सुरु आहेत..
-
बीडच्या शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये अज्ञातांकडून ऑक्सिजन पुरवठा बंद, दोन रुग्णांचा तडफडून मृत्यू
बीड : शासकीय कोव्हीड सेंटरमध्ये विकृतीचा कळस
अज्ञातांनी ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने दोन रुग्णांचा तडफडून मृत्यू
बीडच्या कोव्हीड सेंटर मधील दुर्दैवी घटना
अर्धा तास बंद होता ऑक्सिजन
ऑक्सिजन विना मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
-
ऑक्सिजन एक्सप्रेस लासलगाव रेल्वे स्थानकातून नाशिककडे रवाना
लासलगाव
– ऑक्सिजन एक्स्प्रेस लासलगाव रेल्वे स्थानकातून नाशिककडे रवाना
– ऑक्सिजन घेऊन आलेली एक्सप्रेस पोहचणार एक तासात नाशिकच्या देवळाली रेल्वे स्थानकात
– विशाखापट्टणम वरून निघाली होती ऑक्सिजन एक्स्प्रेस
– एक्स्प्रेसवर ऑक्सिजनने भरलेले चार ट्रँकर
– नाशिक आणि अहमदनगर येथे प्रत्येकी दोन-दोन ऑक्सिजन टँकर मिळणार
– दोन टँकर मधून ऑक्सिजन मिळाल्याने नाशिक आणि अहमदनगरला मिळणार काही प्रमाणात दिलासा
– मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा राहणार कायम
-
पुण्यात चालती फिरती प्रयोग शाळा, अवघ्या चार तासांत आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट मिळणार
– पुण्यात आता अवघ्या चार तासांमध्ये आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट मिळणार,
– यासाठी एक अनोखी चालती फिरती प्रयोग शाळा सुरु होणार,
– या चालत्या फिरत्या प्रयोग शाळेचं आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे,
– रुग्णसंख्या, चाचण्यांची संख्या वाढल्याने सामान्यपणे ४८ तासांमध्ये मिळणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट मिळण्यासाठी ७२ तासांहून अधिक अवधी लागत आहे.
-
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा होणार ऑनलाईन, कुलगुरुंची माहिती
औरंगाबाद :
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा होणार ऑनलाईन
पदवीचे पेपर 3 मे पासून तर पदव्युत्तर च्या परीक्षा ५ मे पासून होणार सुरू
बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा मे महिन्यात होणार
ऑनलाइन त्रुटी येऊ नयेत यासाठी आयटी कॉर्डिनेटरची संख्या दुपटीने वाढवणार
विद्यार्थ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे नुकसान होणार नाही याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी – कुलगुरू
-
कोल्हापुरात कोरोना नियम धाब्यावर बसवत धार्मिक कार्यक्रम, दक्षता समितीसह 20 जणांवर गुन्हे दाखल
कोल्हापूर : येवती येथील धार्मिक कार्यक्रम प्रकरणी दक्षता समितीसह 20 जणांवर गुन्हे दाखल
कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत काल गावात पार पडला होता धार्मिक कार्यक्रम
धार्मिक कार्यक्रमात झाली होती मोठ्या प्रमाणात गर्दी
आपत्ती निवारण कायद्याचे उल्लंघन केल्याने इस्पुरली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं आल उघडकीला
-
पुणे शहरात एकूण 96 नाकाबंदी पॉईंट, ठिकठिकाणी कडक कारवाई
पुणे –
– लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात पुणे पोलिसांकडून कडक कारवाई,
– चौका चौकात नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई,
– शहरात एकूण 96 नाकाबंदी पॉईंट,
– येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची चौकशी करून सोडण्यात येत आहे
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात महत्त्वाची बैठक, कोरोना परिस्थितीचा आढावा
पुणे
– उपमुख्यमंत्री अजित पवार आज घेणार पुण्यात कोरोना आढावा बैठक,
– बैठकीत जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला जाणार,
– दुपारी तीन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन,
– बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आणि दोन्ही महापालिकांचे आयुक्त उपस्थित राहणार
-
सोलापूर शहरातील लसीचा साठा समाप्त, 35 लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा
सोलापूर शहरातील लसीचा साठा समाप्त
35 लसीकरण केंद्रावर लसीचा कालपासून तुटवडा सुरू
लसीकरण केंद्राबाहेर पालिकेने लस साठा संपल्याचे लावले फलक
लस कधी मिळेल याची कल्पना नसल्याचं फलकावर केला उल्लेख
लसींचा साठा संपल्याने नागरिकांना परतावे लागले घरी.
-
औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या पार, दिवसभरात 1496 रुग्णांची वाढ
औरंगाबाद :-
औरंगाबाद जिल्ह्यात काल पुन्हा 1496 कोरोना रुग्णांची वाढ
आकडा पोचला 1 लाख 15 हजार 991 वर
तर काल दिवसभरात 27 कोरोनाबधितांचा झाला मृत्यू
मृतांचा आकडा पोचला 2302 वर
सध्या रुग्णालयात 15179 रुग्णांवर उपचार सुरू
-
वाशिम जिल्ह्यात बंद पडलेले लसीकरण पुन्हा सुरु होणार, कोविशिल्डचे 10 हजार डोस
वाशिम :
वाशिम जिल्ह्यातील बंद पडलेले लसीकरण पुनः होणार सुरू…
आज मिळाले कोविशिल्डचे 10 हजार डोस….
लस संपल्यानं गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण मोहीम होती बंद….
जिल्ह्यात आतापर्यन्त एकूण 1 लाख 36 हजार जणांचं झालं लसीकरण….
तर जिल्ह्यात आतापर्यन्त मिळाले होते 1 लाख 46 हजार डोस…
-
नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या भल्या मोठ्या रांगच रांगा, ओळखपत्र पाहूनच लोकलमध्ये प्रवेश
नालासोपारा:- नालासोपारा रेल्वेस्थानाकात प्रवाशांच्या भल्या मोठ्या रांगच रांगा
अत्यावश्यक सेवेतील प्रवाशाना आय कार्ड पाहूनच सोडल्या जात आहे लोकल मध्ये..
आरपीएफ, तुलिंज पोलिसांकडून कसून आयकार्डची तपासणी सुरू आहे..
किरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यासासनाने लावलेल्या निर्बंध नागरिकांनी ही काटेकोर पणे पाळावेत, सर्वसामान्य नागरिकांनच लोकल मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे
नागरिकांनी विनाकारण रेल्वेस्थानका बाहेर जमू नये असे अहवान ही पोलिसांनी केले आहे..
-
औरंगाबाद शहरातील लसीचा साठा समाप्त, 80 लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट
औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील लसीचा साठा समाप्त
143 पैकी 80 लसीकरण केंद्रांवरील कोरोना लस समाप्त
शहरातील 80 लसीकरण केंद्रावरील लस संपल्याने केंद्रांवर शुकशुकाट..
लसींचा साठा संपल्याने नागरिकांना परतावे लागले घरी..
दोन दिवस लसीकरण बंद,दोन दिवसानंतर लसी मिळणार असल्याची शक्यता..
-
समृद्धी महामार्गाचा ऑक्सिजन रुग्णालयाकडे वळवला, कामकाज ठप्प
औरंगाबाद :-
कोरोना महामारीचा समृद्धी महमार्गाला जबरदस्त फटका
ऑक्सिजनअभावी समृद्धी महामार्गाचे काम पडले ठप्प
समृद्धी महामार्गाचा ऑक्सिजन वळवला रुग्णालयाकडे
महामार्गावर वेल्डिंग आणि पुलंच्या कामासाठी वापरला जातो ऑक्सिजन
ऑक्सिजन वळवल्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम ठप्प
कोरोनामुळे मजूर उपलब्ध नसल्यामुळेही महामार्गाचे काम ठप्प
शिर्डी ते नागपूर महामार्गाचा 31 मे चा मुहूर्त हुकणार
-
नागपुरात कोरोना आवाक्याबाहेर, जिल्ह्यात एकही ICU आणि व्हेंटिलेटर बेड नाही
– नागपूर जिल्ह्यात एकही ICU आणि व्हेंटिलेटर बेड नाही
– कोरोनाचे गंभीर रुग्ण भटकून गमावत आहेत प्राण
– नागपूरात १४० खाजगी आणि १२ मनपा, शासनाचे रुग्णालय आहेत
– मेडीकल आणि मेयो रुग्णालयावर रुग्णांचा भार
– नागपूरात कोरोना आवाक्याबाहेर, आरोग्य यंत्रणा अपुरी
-
पुण्यात ऑक्सिजन प्लांटसाठी 13 कोटींचा निधी, 8 ते 10 ठिकाणी उभारणार प्लांट
पुणे –
– पुण्यात ऑक्सिजन प्लान्टसाठी 13 कोटींचा निधी,
– शहरातील काही उद्योग आणि रुग्णालये एकत्र येऊन अवघ्या ४८ तासांत त्यांनी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीची तजवीज
– ऑक्सिजनचे १४ प्लॅंट खरेदी करण्याचा घेतला निर्णय,
– पुणे शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्लांट उभारण्यात येणार,
– ऑक्सिजनचे हे प्लॅंट पुढील सहा दिवसांत शहरात ८-१० ठिकाणी उभारण्यात येणार,
– महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्येही प्लांट उभारण्यात येणार
-
ॲाक्सिजन भरण्यासाठी उद्योगातील सिलिंडर ताब्यात घ्या, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
– ॲाक्सिजन भरण्यासाठी नागपुरात सिलिंडरचा तुटवडा
– ॲाक्सिजन भरण्यासाठी उद्योगातील सिलिंडर ताब्यात घ्या
– स्टील, फॅब्रीकेशन उद्योग, वेल्डिंगची दुकाने यांच्याकडून सिलिंडर ताब्यात घेण्याचे आदेश
– उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
– आवश्यक तिथे पोलीसांची मदत घेण्याचेही दिले आदेश
-
ऑक्सिजनची कृत्रिम टंचाई भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलला कोल्हापूर महानगरपालिकेचा दणका
कोल्हापूर
ऑक्सिजनची कृत्रिम टंचाई भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलला महानगरपालिकेचा दणका
रंकाळा परिसरातील दत्तकृपा हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस
10 टाक्या शिल्लक असतानाही कृत्रिम टंचाई भासवण्याचा हॉस्पिटलकडून प्रयत्न
ऑक्सिजन पुरवठा कंपनीकडे आयुक्तांनी शहानिशा केल्यानंतर आणि हॉस्पिटलमध्ये केलेल्या तपासणीत गंभीर बाब उघड
महापालिकेचे उपायुक्त आणि अग्निशमन विभागाने हॉस्पिटल ची झाडाझडती करत फोडलं बिंग
-
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 49 लसीकरण केंद्रावर आजपासून लसीकरण सुरू
नवी मुंबई
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बंद असलेल्या 49 लसीकरण केंद्रावर आजपासून लसीकरण सुरू
-महापलीककेची रुग्णालय,नागरी आरोग्य केंद्र/जम्बो सेंटर असे 28 ठिकाणी
तर 21 खाजगी रुग्णालयात लसीकरण होणार
केंद्रावर जाऊन लसीकरण करावे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरिकांना आव्हान
-
राज्यातील ऑक्सिजननिर्मिती वाढविण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार, आजपासून 10 ते 15 टन ऑक्सिजन मिळणार
राज्यातील ऑक्सिजननिर्मिती वाढविण्यासाठी, ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचा पुढाकार
ऑक्सिजनसाठी ‘सोना अलॉयज्’ला २४ तासात मंजूर केला अतिरिक्त वीजजोडभार
उद्यापासून मिळणार १० ते १५ टन प्राणवायू
-
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडून महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्सची मदत
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडून महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्सची मदत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मानले आभार
-
मुंबईत गाड्यांवर लावण्यात येणारी कलरकोड स्टिकर सिस्टिम बंद, मुंबई पोलिसांचा निर्णय
मुंबईत गाड्यांवर लावण्यात येणारी कलरकोड स्टिकर सिस्टिम बंद करण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय…
कलरकोड सिस्टीम बंद करण्याचे आदेश..
आता गाड्यांवर लाल, पिवळा, हिरवा कलरचे स्टिकर लावणे बंधनकारक नाही
पोलीस उपायुक्त अभियान यांच्याकडून आदेश जारी..
18 एप्रिलला पोलीस आयुक्तांनी कलरकोड स्टिकरची घोषणा केली होती.
-
पुण्यातील कोरोना स्थिती
पुणे महापालिका हद्दीत सलग पाचव्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. काल पुण्यात 5 हजार 634 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 हजार 465 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुण्यातील मृतांची संख्या चिंताजनक बनली आहे. पुण्यात काल दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 50 हजार 325 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कालच्या आकडेवारीनुसार पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 91 हजार 495 वर पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 34 जार 782 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 388 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-
मुंबईतील कोरोना स्थिती
मुंबई महापालिकेच्या ट्वीटनुसार, २३ एप्रिल, संध्या. ६:०० वाजेपर्यंत
मुंबईत २४ तासात बाधित रुग्ण -७२२१
२४ तासात बरे झालेले रुग्ण-९५४१ बरे झालेले एकूण रुग्ण- ५,२०,६८४ बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८४%
एकूण सक्रिय रुग्ण-८१,५३८
दुप्पटीचा दर- ५२ दिवस कोविड वाढीचा दर (१६ एप्रिल-२२ एप्रिल)- १.३१%
#CoronavirusUpdates २३ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण -७२२१
२४ तासात बरे झालेले रुग्ण-९५४१ बरे झालेले एकूण रुग्ण- ५,२०,६८४ बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८४%
एकूण सक्रिय रुग्ण-८१,५३८
दुप्पटीचा दर- ५२ दिवस कोविड वाढीचा दर (१६ एप्रिल-२२ एप्रिल)- १.३१%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 23, 2021
-
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 66 हजार कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात गेल्या 24 तासांत 66 हजार 836 नवीन रुग्णांची नोंद
काल एकाच दिवसात 74 हजार 45 इतक्या रुग्णांची कोरोनावर मात
तर काल 773 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
Maharashtra reports 66,836 new COVID19 cases, 74,045 recoveries and 773 deaths in the last 24 hours
Active cases: 6,91,851 Total cases: 41,61,676 Total recoveries: 34,04,792 Death toll: 63,252 pic.twitter.com/t5noSSf8J2
— ANI (@ANI) April 23, 2021
Published On - Apr 24,2021 10:44 PM