कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणार, हॉटेल, लग्न समारंभांवर करडी नजर; ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये!

संपूर्ण राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका खडबडून जाग्या झाल्या असून कोरोना रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. (corona cases rise again in thane, municipal commissioner warns people)

कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणार, हॉटेल, लग्न समारंभांवर करडी नजर; ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये!
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 5:03 PM

ठाणे: संपूर्ण राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका खडबडून जाग्या झाल्या असून कोरोना रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्माही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच शर्मा यांनी दिला आहे. तसेच कोरोना नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून हॉटेल, क्लब आणि लग्न सोहळ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (corona cases rise again in thane, municipal commissioner warns people)

नागरी संशोधन केंद्रात पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. तसेच पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहितीही त्यांनी दिली. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोविड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन, रेड झोन, प्रतिबंधीत क्षेत्रात कडक निर्बंधासाठी गस्ती पथकांची नियुक्ती करण्याबरोबरच वेळप्रसंगी नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे आदी बाबींची यावेळी त्यांनी माहिती दिली.

गर्दीच्या ठिकाणी रिक्षातून जनजागृती

कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक करवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील रेड झोन, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, मार्केटस् घाऊक बाजारपेठा, भाजीपाला मार्केटस् या ठिकाणी अनावश्यक गर्दी होवू नये या करिता महापालिकेच्या प्रभाग समिती निहाय व्यापक जनजागृती, रिक्षांमधून नागरिकांना आवाहन करणे आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

वेळ पडल्यास खासगी रुग्णालये ताब्यात घेणार

कोरोना सदृष्य लक्षणे असलेल्या नारिकांची कोविड चाचणी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, रेल्वे स्टेशन्स, बस स्टॅाप, एसटी स्टॅन्ड आदी ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार असून चाचण्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेचे विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर्स पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये कोविड केअर सेंटर्स म्हणून अधिगृहित करण्यात येतील असे सांगून याबाबत शहरातील डॅाक्टर्स, त्यांच्या संघटना यांच्याशी समन्वय सुरू आहे. त्याचबरोबर कोविड १९ चाचण्यासाठी आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोग शाळा व्यवस्थापनांशीही चर्चा सुरू असून शहरात जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात याचे नियोजन करण्यात आले आहे, असं ते म्हणाले.

पालिकेचा वॉर रुम तयार

कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त आणि संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी गृह विलगीकरणाची सुविधा नसेल तेथील जोखीम गटातील व्यक्तींना महापालिका विलगीकरण कक्षात सक्तीने विलगीकरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महापालिकेचे वॅार रूम आणि मुख्य कोरोना नियंत्रण कक्ष आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला असून रुग्णवाहिका व्यस्थापन आणि बेड व्यवस्थापन प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे. यासाठी आवश्क ते मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गस्ती पथके, फिवर क्लिनिक कार्यान्वित

कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांतील हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्ती पथके नियुक्त करण्यात येणार असून या ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू करणे, घरोघरी जावून तपासणी करणे, वयोवृध्द तसेच विविध व्याधी असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेणे, त्यासाठी तपासणी आणि चाचणी शिबिरांचे आयोजन करणे, फिरती तपासणी केंद्र निर्माण करणे आदी कृतीशील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, बस स्थानक, एसटी स्थानक या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी आणि चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून या ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (corona cases rise again in thane, municipal commissioner warns people)

शौचालयांची दिवसातून चार वेळा सफाई

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शौचालयांची दिवसातून किमान तीन ते चार वेळा साफसफाई करण्यात येणार आहे. गर्दीची ठिकाणे, मुख्य रस्ते, चौक या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून नियमित साफसफाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त यांनी सर्व सहाय्यक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभाग यांना दिल्या आहेत. (corona cases rise again in thane, municipal commissioner warns people)

संबंधित बातम्या:

LIVE : अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी, नागपूर पालिका आयुक्तांकडून गाईडलाईन्स जारी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट, अधिवेशन चालवण्यासाठी पर्याय काय?

अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राणा दाम्पत्याची विना मास्क बुलेटवारी!

(corona cases rise again in thane, municipal commissioner warns people)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.