कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण

संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्र, केरळासह देशातील सहा राज्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. (corona cases rises in maharashtra and kerala)

कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 10:38 AM

मुंबई: संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्र, केरळासह देशातील सहा राज्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. त्यामुळे या सहाही राज्यांतील आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. (corona cases rises in maharashtra and kerala)

महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचं दिसून आलं आहे. या राज्यांमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या सहाही राज्यांमध्ये 86.69 टक्के नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र आणि केरळात एकूण 75. 87 टक्के सक्रिय रुग्ण असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात कोरोनाचा दर 97.27 टक्के असून मृत्यू दर 1.42 टक्के आहे. देशात 1 लाख 43 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत 1300 इमारती सील

मुंबईत कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने झाडाझडती सुरू केली आहे. महापालिकेने आतापर्यंत 1305 इमारती सील केल्या आहेत. या इमारतीत 71 हजार 838 कुटुंब राहतात. मुंबईत 2749 केसेस आढळल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांपूर्वीच पालिकेने कोरोनाबाबतचे नियम जारी केले होते. त्यात एखाद्या इमारतीत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येणार असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं होतं.

आतापर्यंत किती लसीकरण?

भारतात आतापर्यंत 1 कोटी 8 लाखाहून अधिक लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. शनिवारी तर 1.86 लाख लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत एक कोटी 8 लाख 38 हजार 323 लसींपैकी 72 लाख 26 हजार 653 डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि 36 लाख 11 हजार 670 डोस फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. (corona cases rises in maharashtra and kerala)

संबंधित बातम्या:

बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागण

वेळेआधीच अजित पवार बैठकीला पोहोचले, अधिका-यांची पळापळ, आमदार-खासदारांचीही दमछाक

मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?

(corona cases rises in maharashtra and kerala)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.