Omicron Update | राज्याला दिलासा! डोंबिवली ओमिक्रॉनाबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह, तरीही सावधान!

ओमिक्रॉन झालेल्या तरुणाच्या संपर्कातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं नाही. संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

Omicron Update | राज्याला दिलासा! डोंबिवली ओमिक्रॉनाबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह, तरीही सावधान!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 10:03 PM

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याला जी धाकधूक लागली होती अखेर तेच झालं आहे. राज्यात कल्याण-डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तरुणाला ओमिक्रॉन असल्याचं कळाल्यापासून भीतीचं वातावरण आहे. मात्र अशावेळी एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आली. घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. मुंबईच्या महापौरांनीही पत्रकार परिषद घेऊन काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

संपर्कातील एकालाही कोरोना नाही

अशा वेळी एक मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे ओमिक्रॉन झालेल्या तरुणाच्या संपर्कातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं नाही. संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जास्त घाबरून जाण्याचं काही कारण नाही, मात्र राज्य शासनाने सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणे, आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

ओमिक्रॉनबाधित तरुणाबद्दल सविस्तर

ओमिक्रॉनबाधित तरुण मरीन इंजिनिअर आहे. त्याने लसीचा कोणताही डोस घेतलेला नव्हता, दक्षिण आफ्रिकेत होणारा वेगानं प्रसार लक्षात घेता तो पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागानं सतर्क होऊन, नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. जिनोमिक सिक्वेंसिगसाठी पाठवलेल्या नमुन्यांमध्येसुद्धा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे.

सध्या तरुणाला सौम्य लक्षणं

सध्या रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळे त्याच्यावर कोणतेही विशेष उपचार सुरू नाहीत. आम्ही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी करतोय, ओमिक्रॉनबाधित रुग्ण जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर आरटीपीसीआर सुविधा नव्हती, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्या.

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड

Nanded : ‘मुजरा राजं किंग ऑफ मिलियन हार्ट !’ उदयन राजेंना तरुणाने लिहिलं रक्ताने पत्र, व्यक्त केली अनोखी इच्छा

गावठी कट्टा आणायला लावला, नंतर गोळ्या झाडून हत्या, अनैतिक संबंध उघड झाल्याने केली पतीची हत्या

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....