Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 40 हजार 925 नव्या रुग्णांची नोंद

| Updated on: Jan 08, 2022 | 7:52 PM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. 

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 40 हजार 925 नव्या रुग्णांची नोंद
प्रातिनिधीक फोटो

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत आणखी 79 जणांची भर पडली. राज्यात आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 381 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 36265  वर गेला आहे.  बुधवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल36 हजार 265 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jan 2022 09:39 PM (IST)

    Maharashtra Corona Update: 40 हजार 925 नव्या रुग्णांची नोंद

    राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा स्फोट गेल्या 24 तासांमध्ये 40 हजार 925 नव्या रुग्णांची नोंद दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू 14 हजार 256 रुग्णांची कोरोनावर मात

  • 07 Jan 2022 08:57 PM (IST)

    वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मॉल आणि थिएटर्सवर पुन्हा निर्बंध येणार ?

    मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी गर्दी कमी करणे हा एकमेव उपाय असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध (Corona Restrictions) लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आणि राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कठोर निर्बंधांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मॉल आणि चित्रपटगृहांवर निर्बंध येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

  • 07 Jan 2022 08:11 PM (IST)

    धक्कादायक! इटलीवरून आलेल्या विमानातील 170 प्रवासी कोरोनाबाधित

    अमृतसर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. देशात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अमृतसरमधून आलेल्या बातमीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. पंजाबच्या अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सलग दुसऱ्या दिवशी इटलीमधून आलेल्या विमानातील अनेक प्रवासी हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या बातमीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानामध्ये एकूण 285 प्रवासी होते. यातील तब्बल 170 प्रवाशांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व प्रवाशांना आता क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

  • 07 Jan 2022 07:53 PM (IST)

    Mumbai Corona Update : आज दिवसभरात 20,971 नवे कोरोनाबाधित

    मुंबईमध्ये कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये आज दिवसभरात तब्बल 20,971 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 8,490 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या  24 तासांमध्ये सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 07 Jan 2022 07:14 PM (IST)

    भंडारा जिल्हा कोरोना अपडेट; आज दिवसभरात 19 रुग्णांना कोरोनाची लागण

    गेल्या 24 तासांमध्ये 19 नवे कोरोनाबाधित

    कोरोनावर मात करणारे रुग्ण : 00

    आज दिवसभरात मृत्यू  – 00

    कोरोनाबाधितांचा एकूण आकडा – 60184

    आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांची संख्या – 58975

    जिल्ह्यातील सक्रीय रुग्ण – 75

  • 07 Jan 2022 07:08 PM (IST)

    Pune Corona Update: दिवसभरात 2757 जणांना कोरोनाची लागण

    गेल्या 24 तासांमध्ये 2757 जणांना कोरोनाची लागण

    दिवसभरात 628  रुग्णांनी केली कोरोनावर मात

    आज दिवसभरामध्ये  कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू

    एकूण कोरोनाबाधितांची संख्या – 519535

    एकूण सक्रीय रुग्ण – 9792

    एकूण कोरोनाबाधितांचा मृत्यू – 9124

  • 07 Jan 2022 06:07 PM (IST)

    Thane Corona : विनामास्क फिरणाऱ्यांवर ठाण्यात कारवाई, 500 रुपयांचा दंड

    मुंबईप्रमाणेच ठाण्यातही कोरोना(Corona)ची रुग्णसंख्या वाढल्यानं महापालिका आणि पोलिसांच्या वतीनं मास्क (Mask) न घालणाऱ्या तसंच मास्क खाली असणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. मंडई, जांभळी नाका यासह विविध परिसरात ही कारवाई करण्यात येतेय. सातत्यानं वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. नागरिकांनी नियमांचं तंतोतंत पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.

  • 07 Jan 2022 05:29 PM (IST)

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयीची माहिती दिलीय. वाढत्या कोरोनामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईमध्ये तर वीस हजारांहून अधिकचा आकडा काल कोरोनारुग्णांनी गाठला होता. अशा परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय कोणताही पर्याय शासनासमोर राहणार नाही, असं परब म्हणाले.

  • 07 Jan 2022 03:51 PM (IST)

    मुंबई, पुणे, ठाणे वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा सुरूच राहणार – टोपे

    मुंबई : राज्यातील पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन प्रमुख शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. या शहरांत होत असलेला ओमिक्रॉन आणि कोरोनाचा प्रसार पहाता तेथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्यातील इतर भागांमध्ये आजून तशी परिस्थिती नाही. त्यामुळे इतर भागात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यास भविष्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

  • 07 Jan 2022 01:56 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा विळखा, 21 कर्मचाऱ्यांना कोरोना

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा विळखा

    २१ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह

    आणखी १५ जणांचे रिपोर्ट येणं बाकी

    वळसे-पाटील यांच्या खाजगी सचिवासह इतर कर्मचारी कोरोनाबाधीत

  • 07 Jan 2022 01:35 PM (IST)

    Narendra Modi Live : आतापर्यंत लसीचे 150 कोटी डोस दिले, हे देशातील सर्वांचं यश: नरेंद्र मोदी

    आपण या वर्षाची सुरुवात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणानं केली. पहिल्या पाच दिवसात 1.5 कोटी मुलांचं लसीकरण करण्यात आलं. देशात आतापर्यंत 150 कोटी डोस देण्यात आलेले आहेत. हे यश आपल्या देशाचं आणि देशातील प्रत्येक सरकारचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 07 Jan 2022 12:45 PM (IST)

    पूर्ण लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे म्हणाले त्यावेळी ऑटोमेटिक लॉकडाऊन लागेल

    पूर्ण लॉकडाऊन लागणार का?

    राजेश टोपे :  आम्ही स्पष्टपणे ठरवलेलं आहे की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल किंवा 40 टक्के बेड वापरले जातील त्यावेळी लॉकडाऊन लागेल. मात्र, सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यातील रुग्णालयातील 10 ते 15 टक्के बेड व्यापलेले आहेत. राज्यातील मृत्यूदर वाढलेला नाही. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळं आपण नियम पाळले नाहीत तर अवघड आहे. रात्री फिरण्याची गरज नाही. मुंबई सारख्या शहरात रात्री 11 ते 5 या वेळेत काही निर्बंध लावता येते का हे पाहावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

    लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू वर मुख्यमंत्री कधी निर्णय घेणार?

    आरोग्य विभाग, टास्क फोर्स इतर यंत्रणा मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांमार्फत अहवाल देत असतात. मुंबईत  25 हजारांपर्यंत रुग्ण आढळून येत असतील तर मुंबईतील अनावश्यक सेवा, उशिरापर्यंतचं हॉटेलिंग हे सगळं थांबलं पाहिजे. रात्री फिरण्यावर निर्बंध लावता येईल. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. अनावश्यक सेवा  बंद करता येतात का यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

    लोकल सेवेवर निर्बंध येणार?

    लोकल सेवा बंद करण्यात येणार नाही. अनावश्यक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु असतात त्यांची वेळ कमी करता येते का हे पाहावं लागणार आहे. मॉल्स, रेस्टॉरंट याबाबत काही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, रात्रीच्या अनावश्यक सेवांबाबत निर्णय घेतला जाईल.

    मोठ्या मंडईमध्ये  नियमांचं पालन होत नाही त्यावर काय करणार?

    मंडईमध्ये मास्क न वापरण्यांवर कारवाई करण्यात येईल. निर्बंध पेपरवर केले आहेत पण ते प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यांना सूचना दिलेल्या आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.

    लग्न आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणीची गर्दी कशी कमी करणार?

    लग्न आणि अंत्यसंस्कार थाबवता येणार नाही. लग्न हे दोन्ही बाजूच्या  25-25 लोकांच्या उपस्थितीत पार पाडावीत. आपल्याला राजकीय कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रमातील गर्दी टाळावी लागेल. त्यासाठी शासनानं दिलेल्या आदेशांचं पालन करावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

    15 ते 18 वयोगटातील लसीकरण जलदगतीनं

    15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत.  15 ते  20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक  त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.

  • 07 Jan 2022 12:32 PM (IST)

    MCA Corona Update : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोना

    MCA Corona Update : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यालय पुढील तीन दिवस बंद राहणार आहे.

  • 07 Jan 2022 12:12 PM (IST)

    Omicron Cases : भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3007 वर, महाराष्ट्राची संख्या 876 वर

    Omicron Cases : भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3007 वर, महाराष्ट्राची संख्या 876 वर

  • 07 Jan 2022 12:06 PM (IST)

    Corona Cases : देशभरात 1 लाख 17 हजार 100 रुग्णांची नोंद, सात महिन्यांनी ओलांडला लाखांचा टप्पा

    देशभरात 1 लाख 17 हजार 100 रुग्णांची नोंद, सात महिन्यांनी ओलांडला लाखांचा टप्पा

  • 07 Jan 2022 11:52 AM (IST)

    Thane Corona Update : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं ठाण्यात प्रशासन सतर्क, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु

    काल ठाणे पालिका क्षेत्रात सर्वाधिक एक दिवसीय रुग्ण संख्या आढळल्या नंतर पालिका प्रशासन आणि पोलीस रस्त्यावर

    मास्क न लावलेल्या आणि गर्दी करणाऱ्या नागरिकांवर करत आहेत कारवाई,

    तसेच ज्या दुकानांत गर्दी आहे त्याच्यावर देखील होणार कारवाई,

    ठाणे पालिकेचे एक पथक आणि ठाणे नगर पोलिसांचे एक पथक अशी 2 पथके रस्त्यावर

    मास्क नसेल तर 500 रुपये दंड,गर्दी असेल तर दुकांदारावर दंड,

    ठाणे स्टेशन रोड बाजारपेठ मध्ये सुरू आहे कारवाई

  • 07 Jan 2022 10:22 AM (IST)

    संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, डॉक्टर, बेस्टचे कर्मचारी बाधित, ओमिक्रॉनला गंभीरपणे घ्या: किशोरी पेडणेकर

    मुंबईकरांनी घाबरू नये, दुसऱ्या लाटेप्रमाणं तिसरी लाट थोपवू

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे सूचना देत आहेत

    केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा, मुंबई महापालिका, इतर महापालिकांशी चर्चा करुन निर्णय घेत आहेत

    संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, मात्र, 10 ते 15 टक्के लोक काळजी घेत नाहीत त्यामुळं सर्वांना परिणाम भोगावं लागतं

    माझं कुटुंब माझी जबाबदारी प्रमाणं काळजी घ्यावी

    डॉक्टर, बेस्टचे कर्मचारी बाधित होत आहेत.

    बेड रिकामे आहेत त्यामुळं निर्णय नाही

    जागतिक आरोग्य संघटनेचा ओमिक्रॉन गंभीर असल्याचा इशारा

  • 07 Jan 2022 09:30 AM (IST)

    Pune Omicron : पुण्यात ओमिक्रॉनचे आतापर्यंत 83 रुग्ण

    पुण्यात ओमिक्रॉनचे आतापर्यंत 83  रुग्ण

    मात्र दिलासादायक बातमी म्हणजे एकाही रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज पडली नाही

    8 दिवसांत रुग्ण होतो ठणठणीत बरा ,महापालिकेनं नोंदवल निरीक्षण,

    आतापर्यंत 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय,

    लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमिक्रॉनचा संसर्ग होतोय

    आढळणाऱ्या बाधितांमध्ये ओमिक्रॉनचे 80 ते 85 टक्के रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जातीये

  • 07 Jan 2022 08:33 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता जम्बो रूग्णालय पुन्हा सुरू होणार

    पिंपरी चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता नेहरुनगरातील जम्बो रूग्णालय पुन्हा सुरू होणार

    -हे जम्बो रुग्णालय १५ जानेवारीपासून पुन्हा 800 बेडसह सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 609 बेड ऑक्सिजनयुक्त, 200 आयसीयू बेड उपलब्ध राहणार आहेत

    – दोन महिन्यांसाठी एकूण १० कोटी खर्च येणार आहे

  • 07 Jan 2022 08:23 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात गेल्या सहा दिवसात कोरोना संसर्गाचे प्रमाण सहापटीने वाढले

    -पिंपरी चिंचवड शहरात गेल्या सहा दिवसात कोरोना संसर्गाचे प्रमाण सहापटीने वाढले त्यामुळे पॉझिटिव्ह दर सहा टक्के पेक्षा अधिक झालाय
    -असं असलं तरी ह्यामध्ये गंभीर रुग्णाची संख्या नगण्य
    -घरीच उपचारघेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75 टक्केपेक्षा अधिक आहे
  • 07 Jan 2022 07:49 AM (IST)

    महाराष्ट्रातील 338 निवासी डॉक्टरांना कोरोना संसर्ग

    महाराष्ट्रातील 338 निवासी डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. हे डॉक्टर विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी दिली आहे.

  • 07 Jan 2022 07:24 AM (IST)

    नाशिकमध्ये सोमवारपासून 10 वी आणि 12 वी वगळता शाळा बंद

    नाशिक – सोमवार पासून 10 वी आणि 12 वी वगळता शाळा बंद

    पालकमंत्री भुजबळ यांच्या बैठकीत निर्णय

    परिस्थिती बघून बाजारपेठा बंद करण्या बाबत देखील घेणार निर्णय

    पुढच्या आठ दिवसात नागरिकांनी लस न घेतल्यास,’नो व्हेक्सीन-नो रेशन’

  • 07 Jan 2022 07:05 AM (IST)

    कोरोनाला थांबवण्यासाठी प्रशासन काय करत आहे? हायकोर्टाची विचारणा

    – कोरोनाला थांबवण्यासाठी प्रशासन काय करत आहे?

    – उच्च न्यायालयाची नागपूर मनपा आणि जिल्हा प्रशासनाला विचारणा

    – दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश

    – २०२० मध्ये न्यायालयाने स्वतःच दाखल केलेल्या याचिकेवर झाली सुनावणी

  • 07 Jan 2022 06:24 AM (IST)

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात कोरोनामुक्त, ट्विटद्वारे दिली माहिती

    राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

  • 07 Jan 2022 06:19 AM (IST)

    Maharashtra Omicron Cases : महाराष्ट्रात 79 नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

    महाराष्ट्रात गुरुवारी 79 नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दिवसभरात मुंबईत ओमिक्रॉनचे 57 रुग्ण आढळून आले आहेत.

Published On - Jan 07,2022 6:17 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.