Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : कोरोना निर्बंधांवरून राजेश टोपेंचे चंद्रकांत पाटलांना सणसणीत उत्तर, मोदींचे शब्द आठवा…

| Updated on: Jan 11, 2022 | 12:10 AM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : कोरोना निर्बंधांवरून राजेश टोपेंचे चंद्रकांत पाटलांना सणसणीत उत्तर, मोदींचे शब्द आठवा...
corona test

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात रविवारी दिवसभरात 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे .शनिवारच्या तुलनेत रविवारी 20 हजार रुग्णांची वाढ झालीय. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 79 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 146 जणांचा मृत्यू झालाय. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 33 वर पोहोचली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jan 2022 10:00 PM (IST)

    संरक्षण मंत्र्यांपाठोपाठ भाजपाध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह! संपर्कातील लोकांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन

    फक्त महाराष्ट्रातच नाही, तर दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रात जवळपास 50 पेक्षा जास्त नेते कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता दिल्लीतल्या नेत्यांनाही कोरोनाचा विळखा वाढतोय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डाही कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

  • 10 Jan 2022 08:47 PM (IST)

    आज राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

    आज राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

    सर्वाधिक रुग्ण पुण्यात 28 रुग्णांची नोंद,

    पुणे ग्रामीण 2 पिंपरी चिंचवड 1

    आतापर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद,

    467 जणांना आतापर्यंत मिळाला डिस्चार्ज !

  • 10 Jan 2022 07:11 PM (IST)

    पुण्यात आजही तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण

    दिवसभरात 3067 नवे कोरोना रुग्ण – दिवसभरात 857 रुग्णांना  डिस्चार्ज.

  • 10 Jan 2022 07:09 PM (IST)

    अकोल्यात आजच्या अहवालात 57 रुग्ण पॉझिटिव्ह

    अकोल्यात आजच्या अहवालात 57 रुग्ण पॉझिटिव्ह

    आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवाल 58320….

    आज शहरातल्या बैदपुरा भागातील 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे…

    तर आतापर्यंत 1143 जणांचा मृत्यू झाला आहे….तर…

    56764 जणांना डिस्चार्ज मिळाला असून….

    सध्या 413 रुग्ण ऍक्टिव आहेत…

  • 10 Jan 2022 05:30 PM (IST)

    नागपुरात आज पुन्हा वाढली कोरोना रुग्णांची संख्या

    नागपुरात आज पुन्हा वाढली कोरोना रुग्णांची संख्या

    नागपूर मध्ये गेल्या 24 तासात 971 कोरोना बाधित नव्या रुग्णांची नोंद..

    ग्रामीण मधील 117, शहरातील 792 तर जिल्ह्याबाहेरील 62 रुग्णांचा समावेश..

    मृत्यू शून्य , तर 158 जणांनी केली कोरोना वर मात

    9852 तपासणी करण्यात आल्या..

    ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 4158

  • 10 Jan 2022 04:16 PM (IST)

    जुन्नर तालुक्यात 24 तासात 104 कोरोना रूग्णांची भर

    जुन्नर तालुक्यात 24 तासात 104 कोरोना रूग्णांची भर पडली असून तालुक्यातील एकूण रूग्णाची संख्या 322 इतकी झाली आहे. त्यामुळे जुन्नर आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे..  जुन्नर तालुक्यातील एकूण 28 गावे कोरोनाची हाॅटस्पाट बनतायत का ? असा प्रश्न पडला आहे.
  • 10 Jan 2022 03:45 PM (IST)

    मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने बाजारपेठेत महिलांची गर्दी

    नांदेडमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत चाललीय तरीही नागरिकांची बेफिकिर वृत्ती दिसून येतेय.सोशल डिस्टनससह अनेकांना मास्कचा विसर पडल्याचे चित्र नांदेडमध्ये आहे. खाजगी क्लासेस सुरू असल्याने त्या समोर होणारी विद्यार्थ्यांची गर्दी आमंत्रण देणारी ठरतेय. त्यातच मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने बाजारपेठेत महिलांची गर्दी देखील वाढलीय. या गर्दीमुळे नांदेडच्या आरोग्य विभागाची चिंता वाढू शकते.

  • 10 Jan 2022 01:28 PM (IST)

    Rajesh Tope : मोलनुपिरावीर औषध मुबलक आणि किफायतशीर दरात मिळावी : राजेश टोपे

    Rajesh Tope  Live

    ईसीआरपीच्या निधी खर्चासंर्भात चर्चा करणार

    मोलनुपिरावीर औषधांसदर्भात मागणी करणार

    कोरोनासंदर्भात नव्या नियमावलींचं पालन करावं

    बुस्टर डोसला सुरुवात, ज्येष्ठ नागरिकांनी आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी यासंदर्भात नोंद घ्यावी

    कोविशील्ड आणि कोवॅक्सिन संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा केली

  • 10 Jan 2022 12:42 PM (IST)

    जळगावचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह

    जळगावचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह

    लक्षणे नसल्यानं घरीच क्वारंटाईन

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका सहायक प्राध्यापकालाही कोरोनाची लागण

  • 10 Jan 2022 12:40 PM (IST)

    नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला बुस्टर डोस

    नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला बुस्टर डोस..

    फ्रंटलाईन वर्कर आणि जेष्ठ नागरिकांच्या बूस्टर डोस ला आज पासून नागपुरात प्रारंभ झाला

    पालकमंत्री यांनी स्वतः डोज घेत मोहिमेला सुरुवात केली

    यावेळी महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा अधिकारी उपस्थित होते.

  • 10 Jan 2022 12:20 PM (IST)

    पुण्यात गेल्या 8 दिवसात 232 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित

    पुण्यात गेल्या 8 दिवसात 232 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित

    पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली.

    यात 202 कर्मचारी आणि 30 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

  • 10 Jan 2022 11:17 AM (IST)

    Nagpur : नागपूर जिल्ह्यात 291 केंद्रांवर कोव्हीशिल्डचा बुस्टर डोज

    – नागपूर जिल्ह्यात  बुस्टर डोसच्या लसीकरणाला सुरुवात होणार

    – बुस्टर डोजसाठी ज्येष्ठ नागरीक लसीकरण केंद्रात आलेय

    – फ्रंटलाईन, हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरीकांना बुस्टर डोज

    – जिल्ह्यात 291 केंद्रांवर कोव्हीशिल्डचा बुस्टर डोज

  • 10 Jan 2022 10:48 AM (IST)

    नाशिकमध्ये बूस्टर डोस लसीकरणाला सुरुवात

    नाशिकमध्ये बूस्टर डोस लसीकरणाला सुरुवात

    विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतला पहिला बूस्टर डोस

    डोस घेण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी

  • 10 Jan 2022 10:28 AM (IST)

    नाशिकमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून बूस्टर डोस

    नाशिक – फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून बूस्टर डोस

    नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे घेणार बूस्टर डोस

    नाशिक जिल्हा रुग्णालयात थोड्याच वेळात सुरू होणार बूस्टर डोस लसीकरण

    बूस्टर डोस साठी नागरिकांची मोठी गर्दी

  • 10 Jan 2022 09:57 AM (IST)

    देशात कोरोनाच्या 1 लाख 79 हजार नव्या रुग्णांची नोंद

    देशात कोरोनाच्या 1 लाख 79 हजार नव्या रुग्णांची नोंद

    दिवसभरात 146 जणांचा मृत्यू

    7 लाख 23 हजार 619 नवे रुग्ण

    ओमिक्रॉनची संख्या 4033 वर

    पॉझिटीव्हीटी  दर 13.29 टक्के

  • 10 Jan 2022 09:17 AM (IST)

    पुण्यात पॉझिटीव्ही रेट तब्बल 22 टक्क्यांवर

    पुण्यात पॉझिटीव्ही रेट तब्बल 22 टक्क्यांवर,

    अँक्टीव्ह रुग्णसंख्या 15 हजारावर,

    काल 24 तासात झाली 4 हजार 29 रुग्णांची नोंद,

    शहरात 134 रुग्ण अजूनही ऑक्सिजनवर आहेत तर 26 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत

    मात्र 14 हजार 890 पैकी एकुण 94.52 टक्के रुग्णसंख्या ही होम क्वारंटाईन

  • 10 Jan 2022 08:16 AM (IST)

    Kolhapur Corona : कोल्हापूरमध्ये नवे 223 कोरोना रुग्ण

    कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात  नवे 223 कोरोना रुग्ण आढळले

    शहरात सर्वाधिक 142 रुग्ण

    जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या पोहोचली 791 वर

    तर आठ जणांना ओमीक्रोनची ही लागण

  • 10 Jan 2022 08:10 AM (IST)

    Nashik Corona Rules : नाशिक जिल्ह्यात आजपासून कोरोना निर्बंध लागू

    नाशिक जिल्ह्यात आजपासून कोरोना निर्बंध लागू

    प्रशासन सज्ज, नियम पाळण्याच्या सूचना

    दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी असेल लागू

    खाजगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्केच उपस्थिती असणार

    मंगल कार्यलय, बाजारपेठा, मॉल्स, दुकानांमध्ये गर्दी केल्यास थेट कारवाई

  • 10 Jan 2022 06:47 AM (IST)

    Nagpur : नागपूर जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीचा बुस्टर डोज

    – नागपूर जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीचा बुस्टर डोज

    – फ्रंटलाईन, हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरीकांना बुस्टर डोज

    – जिल्ह्यात 291केंद्रांवर कोव्हीशिल्डचा बुस्टर डोज

    – जिल्ह्यात 54 केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोजची सोय

    – बुस्टर डोजसाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन नोंदणीची सोय

  • 10 Jan 2022 06:27 AM (IST)

    Pune Corona Update : पुण्यात आठ दिवसांमध्ये 14 हजार 864 रुग्णांची नोंद

    पुण्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

    आठवडाभरात शहरात तब्बल 14 हजार 864 बाधित रुग्णांची नोंद

    सध्या शहरात एकूण 14 हजार 890 ऍक्टिव्ह रुग्ण

Published On - Jan 10,2022 6:12 AM

Follow us
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.