Corona, Omicron Cases Maharashtra LIVE :Pune Corona Update: दिवसभरात 3459 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

| Updated on: Jan 12, 2022 | 6:39 AM

 महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE :Pune Corona Update: दिवसभरात 3459 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Corona

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात सोमवारी दिवसभरात 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 हजार 671 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 28 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. पुणे ग्रामीण 2 पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण सापडलाय. आतापर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.467 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Jan 2022 09:29 PM (IST)

    रत्नागिरी कोरोना अपडेट : गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 203 नवे कोरोनाबाधित 

    गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 203 नवे कोरोनाबाधित

    दिवसभरात 65 जणांची कोरोनावर मात

    दिवसभरात एकही मृत्यू नाही

  • 11 Jan 2022 08:21 PM (IST)

    Pune Corona Update: दिवसभरात 3459 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    पुण्यात गेल्या 24 तासांमध्ये 3459 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    दिवसभरात 1104 रुग्णांची कोरोनावर मात

    दिवसभरात 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या – 19452

  • 11 Jan 2022 07:03 PM (IST)

    जळगाव कोरोना अपडेट : दिवसभरात तब्बल 221 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    जळगावात कोरोनाचा उद्रेक

    एकाच दिवशी 221 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

    भुसावळमध्ये 107 रुग्णांना कोरोनाची लागण

    जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 767 वर

  • 11 Jan 2022 06:10 PM (IST)

    Chandrapur Corona Update : दिवसभरात 98 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    चंद्रपूर कोरोना अपडेट

    आजचे कोरोनाबाधित – 98

    कालचे कोरोनाबाधित – 95

    आजचे कोरोनामुक्त – 25

    सक्रिय रुग्ण  – 507

    आजचे बाधित मृत्यू – 00

  • 11 Jan 2022 05:43 PM (IST)

    Pune Corona | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पर्यटकस्थळी जाण्यास मज्जाव!

    ऐन गुलाबी थंडी रंगात आलेली असताना पुण्यात पर्यटन स्थळांवर (Pune Tourist Point) जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना हिरमोड होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह सर्व पर्यटन जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध (Strict Restrictions) लागू केले आहेत. पुण्यातील कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली होती. त्यामुळे आता निर्बंध अधिक कठोर करत पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय. गर्दी रोखण्यासाठी आणि संसर्ग वाढू न देण्यासाठी हे नवे निर्णय जाहीर करण्यात आले आहे.

  • 11 Jan 2022 12:57 PM (IST)

    ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी राज्यात लॉकडाऊन होईल : मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

    राज्यात ज्या वेळेस  700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल,  त्यादिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी  बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यावर पत्रकारांना दिलीय…
  • 11 Jan 2022 12:38 PM (IST)

    Kishori Pednekar : कोरोना लसीकरण पूर्ण करावं, किशोरी पेडणेकर यांचं आवाहन

    Kishori Pednekar : कोरोना लसीकरण पूर्ण करावं, किशोरी पेडणेकर यांचं आवाहन

    नागरिकांनी कोरोना लसीकरण करुन घ्यावं

    फ्रंटलाईन वर्करनी बुस्टर डोस घ्यावा

    अनेक तज्ज्ञ आपला अंदाज व्यक्त करत आहेत

    तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन महापालिका आणि राज्य सरकारशी चर्चा केली जाते

  • 11 Jan 2022 12:15 PM (IST)

    Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

    Lata Mangeshkar : भारताच् लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

  • 11 Jan 2022 11:56 AM (IST)

    नागपूर पोलीस दलातील 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

    नागपूर पोलीस दलातील 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण,

    या मध्ये पाच अधिकाऱ्यांचा देखील समावेश

    गेल्या चार दिवसात 25 कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत

    शहर पोलीस दलातील 97 टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस झालेला आहे.

  • 11 Jan 2022 11:19 AM (IST)

    राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ

    राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ,

    एन 95 मास्कची तब्बल 95ते100 टक्के प्रमाणात मागणी आणि विक्री,

    पुण्यातील ठोक डिस्ट्रीब्युटरकडे एन 95 मास्कची मागणी,

    मास्कच्या किमतीत कोणतीही वाढ नाही शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे होतीये मास्कची विक्री,

  • 11 Jan 2022 10:53 AM (IST)

    बुस्टर डोससाठी पात्र असलेल्या पुणे जिल्ह्यात अद्याप 18 लाख नागरिकांनी दुसरा डोसच घेतला नाही

    बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या तब्बल 18 लाख नागरिकांनी घेतलेला नाही दुसरा डोस…

    पुणे जिल्ह्यात प्रशासनाच्या आकडेवारीत चिंताजनक माहिती

    10 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधित तिसऱ्या डोसला झाली सुरुवात

    मात्र पुणे जिल्ह्यात अद्याप 18 लाख नागरिकांनी दुसरा डोसच घेतला नाही…

  • 11 Jan 2022 10:22 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार

    नवी दिल्ली पंतप्रधान आज महत्त्वाची बैठक घेणार

    संध्याकाळी चार वाजता देशातल्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदी बैठक करणार

    कोरोना संदर्भात पंतप्रधान करणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा

    व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संध्याकाळी चार वाजता मोदी साधणार संवाद

  • 11 Jan 2022 10:22 AM (IST)

    राजधानी दिल्लीत निर्बंध कडक होण्याची शक्यता

    नवी दिल्ली राजधानी दिल्लीत निर्बंध कडक होण्याची शक्यता

    आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार

    केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेकडे राजधानीच लक्ष

  • 11 Jan 2022 09:41 AM (IST)

    भारतात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद

    भारतात 1 लाख 68 हजार 63  कोरोना रुग्णांची नोंद

    69959 रुग्ण कोरोनामुक्त

    24 तासात 277 मृत्यूची नोंद

    देशात 8 लाख 21 हजार 446 सक्रिय रुग्ण

    ओमिक्रॉन बाधितांची संख्या 4461 वर

  • 11 Jan 2022 09:02 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त ग्रामपंचायत स्पर्धा, जिल्हा परिषदेकडून आयोजन

    पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त ग्रामपंचायत स्पर्धा

    जिल्हा परिषदेकडून 10 जानेवारी. ते 15 मार्च या दरम्यान स्पर्धेचं आयोजन

    कोरोनापासून दूर ठेवणाऱ्या गावाला प्रथम बक्षिस मिळणार 50 लाख रुपये रोख तर 50 लाख रुपयांची कामंही केली जाणार मंजूर

  • 11 Jan 2022 08:41 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्ण वाढले

    -पिंपरी-चिंचवड शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होऊ लागली

    -मागील दहा दिवसात 7 हजार 77 नवीन रुग्णांची भर पडली. पण, वाढत्या रुग्णसंख्येत लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे

  • 11 Jan 2022 08:39 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेत पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

    पुणे जिल्हा परिषदेत पाच कर्मचारी आढळून आले कोरोना पॉझिटिव्ह ,

    जिल्हा परिषदेत कामाच्या निमित्ताने लोकांची असते मोठी वर्दळ,

    जिल्हा परिषदेतील कामावर येणाऱ्या प्रत्येकाची गेटवरचं केली.जाणार अँन्टीजेन चाचणी,

    आज सगळ्या कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद करून घेणार आरटीपीसीआर,

    पाच कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा रिपोर्ट येणं बाकी,

  • 11 Jan 2022 08:16 AM (IST)

    नाशिकमध्ये पहिल्या दिवशी अडीच हजार बूस्टर डोस

    नाशिकमध्ये पहिल्या दिवशी अडीच हजार बूस्टर डोस

    दीड हजाराहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि 1 हजारापेक्षा जास्त फ्रंट लाईन वर्कर्सला दिला बूस्टर डोस

    बूस्टर डोस साठी जिल्ह्यात 375 केंद्र कार्यान्वित

  • 11 Jan 2022 06:52 AM (IST)

    Nagpur Corona Update: नागपुरात कोरोनाची धास्ती वाढली,पॉझिटिव्हचा आकडा हजारांच्या जवळ

    नागपुरात कोरोनाची धास्ती वाढली ,पॉझिटिव्हचा आकडा हजारच्या जवळ

    कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या दररोज उच्चांक गाठताना दिसून येत आहे.

    सोमवारी 971 रुग्णांची नोंद झाली.

    यातील 792 रुग्ण शहरातील, 117 रुग्ण ग्रामीण भागातील तर, 62 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.

    रुग्णांची एकूण संख्या 4,98,559 झाली असून मृतांची संख्या 10123 वर स्थिर आहे.

  • 11 Jan 2022 06:08 AM (IST)

    Maharashtra Omicron Update : राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

    आज राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

    सर्वाधिक रुग्ण पुण्यात 28 रुग्णांची नोंद,

    पुणे ग्रामीण 2 पिंपरी चिंचवड 1

    आतापर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद,

    467 जणांना आतापर्यंत मिळाला डिस्चार्ज !

Published On - Jan 11,2022 6:07 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.