Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुणे जिल्ह्यात कोरोना रुगणसंख्या वाढली

| Updated on: Jan 17, 2022 | 11:41 PM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron  Cases Maharashtra LIVE : पुणे जिल्ह्यात कोरोना रुगणसंख्या वाढली
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 40 हजाराच्या पुढेच आहे. रविवारी राज्यात 41 हजार 327 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 40 हजार 386 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात रविवारी 8 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालीय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jan 2022 11:34 AM (IST)

    जालना जिल्ह्यात नागरिकांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन

    गेल्या आठवड्याभरापासून जालना शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग वेळो वेळी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. पण नागरिक मात्र कोरोना नियम पायदळी तुडवत स्वतःच कोरोना दूत बनत आहेत. ना सोशल डिस्टन्स ना ..ना तोंडाला मास्क. त्यामुळे कोरोनाला हरवाचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे..गेल्या आठवड्याभरापासून जालना शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग वेळो वेळी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. पण नागरिक मात्र कोरोना नियम पायदळी तुडवत स्वतःच कोरोना दूत बनत आहेत. ना सोशल डिस्टन्स ना ..ना तोंडाला मास्क. त्यामुळे कोरोनाला हरवाचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे..

  • 17 Jan 2022 10:49 AM (IST)

    टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्यात, खासदार सुप्रिया सुळे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

    – टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्यात, खासदार सुप्रिया सुळे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

    – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज भेट घेऊन करणार मागणी,

    – यासंदर्भात सरकारने सक्सेस स्टोरी दाखवाव्यात

  • 17 Jan 2022 09:53 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढली,हॉटस्पॉट गावांची संख्या 30 वर

    पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढली

    अवघ्या पंधरा दिवसात ग्रामीणमधील 7 वर असलेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या 30 वर

    ही हॉटस्पॉट गावे ही शहरालगत असलेल्या तालुक्‍यांतील

    त्यामध्ये हवेली-11 तर मुळशी तालुक्‍यात 8 हॉटस्पॉट गावांची संख्या

    मावळ आणि जुन्नर प्रत्येकी 4, आंबेगाव 2 तर खेड तालुक्‍यात 1 गावांचा समावेश

  • 17 Jan 2022 09:29 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 58 हजार 89 कोरोना रुग्ण

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 58 हजार 89 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

  • 17 Jan 2022 09:10 AM (IST)

    बूस्टर डोस घेतल्या नंतर ही वसईत डॉक्टर महिला कोरोना पॉझिटिव्ह

    – बूस्टर डोस घेतल्या नंतर ही वसईत डॉक्टर महिला आल्या कोरोना पॉझिटिव्ह

    – डॉ भक्ती तळेकर असे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टर महिलेचे नाव असून त्या वसई विरार महापालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात कार्यरत होत्या..

    – 10 जानेवारी रोजी त्यांनी बूस्टर डोस घेतला होता.. त्यानंतर 14 जानेवारीला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे

  • 17 Jan 2022 08:56 AM (IST)

    माजी मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी मुंबईला हलवलं

    यवतमाळ: माजी मंत्री तथा शिवसेना आमदार संजय राठोड यांना कोरोनाची लागण

    ऑक्सिजन कमी झाल्यामुळे उपचारासाठी मुंबईला हलविले

  • 17 Jan 2022 08:24 AM (IST)

    उस्मानाबादमध्ये कोरोना सहायता निधी खर्चा विना पडून

    उस्मानाबाद : कोरोना सहायता निधी खर्चा विना पडून

    जिल्ह्यातील शिक्षकाकडून जमा केलेला निधी अखर्चित असल्याने शिक्षकात नाराजीचा सूर

    कोरोनाच्या पहिल्या लाटेत जमा केलेल्या सहायता निधीतील 87 लाख बँकेत पडून

    निधी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ योग्य कारणासाठी खर्च करण्याची मागणी

  • 17 Jan 2022 07:51 AM (IST)

    कोरोना लसीकरण मोहिमेत कोल्हापूर महानगरपालिकेची आघाडी

    लसीकरण मोहिमेत कोल्हापूर महानगरपालिकेची आघाडी

    महापालिका क्षेत्रात 97 टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस तर 75 टक्के लोकांचा दुसरा डोस देखील पूर्ण

    लसीकरणासाठी वर्षभर राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या सकारात्मक परिणाम

    4 लाख 46 हजार जणांनी घेतला पहिला डोस

    पहिल्या डोस चे लसीकरण संपल्यात जमा

  • 17 Jan 2022 07:04 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ

    आज दिवसभरात तब्बल 3035 नव्या रुग्णांची नोंद

    3035 पैकी नाशिक शहरातील 1678 ग्रामीण भागातील 1185 मालेगाव 61 तर जिल्हा बाह्य 111

    दिवसभरात नाशिक जिल्ह्यात पालिका क्षेत्रातील 1 रुग्णाच्या मृत्युची नोंद

  • 17 Jan 2022 06:21 AM (IST)

    महाराष्ट्रात 41327 कोरोना रुग्णांची नोंद 

    महाराष्ट्रात 41327 कोरोना रुग्णांची नोंद

Published On - Jan 17,2022 6:13 AM

Follow us
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.