Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: दिलासादायक! राज्यात आज एकाही ओमिक्रॉनबाधिताची नोंद नाही
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. मंगळवारी राज्यात 33 हजार 914 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 86 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 500 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75 लाख 69 हजार 425 वर गेलीय तर आतापर्यंत 71 लाख 20 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 237 जणांच्या मृत्यूंची नोंद झालीय.