कोरानामुळे वुहानच्या रस्त्यावर पडलेल्या प्रेतांचा व्हिडीओ खोटा, चीनमधून परतलेल्या लातूरच्या विद्यार्थ्याचा दावा

वुहानच्या रस्त्यावर कोरोना रुग्णांचे असंख्य प्रेत पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा वुहानमधून परतलेल्या लातूरच्या एका विद्यार्थ्याने केला आहे (corona virus viral video).

कोरानामुळे वुहानच्या रस्त्यावर पडलेल्या प्रेतांचा व्हिडीओ खोटा, चीनमधून परतलेल्या लातूरच्या विद्यार्थ्याचा दावा
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 10:19 AM

लातूर : कोरोनामुळे चीनच्या वुहान शहरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वुहानच्या रस्त्यावर कोरोना रुग्णांचे असंख्य प्रेत पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा वुहानमधून परतलेल्या लातूरच्या एका विद्यार्थ्याने केला आहे (corona virus viral video). या विद्यार्थ्याचे नाव आशिष कुर्मे असं आहे.

आशिष कुर्मे हा वुहान शहरातील एका विद्यापीठात एमबीबीएसचं शिक्षण घोतोय. मात्र, चीनमध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कोरोनामुळे रस्त्यावर चालत्या लोकांचा मृत्यू होत असल्याचा व्हिडीओ खोटा असल्याचं त्याने म्हटलं. “मी हा व्हिडीओ भारतात आल्यानंतर पाहिला. मात्र, इतकीही भीषण परिस्थिती वुहानमध्ये नाही”, असं आशिषने सांगितलं (corona virus viral video).

वुहानच्या रस्त्यांवर शांतता

“कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढायला लागला तसतसा वुहानच्या रस्त्यांवरील गर्दी आणि रेलचेल कमी होऊ लागली. काही दिवसांनी सर्वच रस्ते दिवसा सामसूम बघायला मिळाले. कुणीही रस्त्यावर फिरत नव्हतं. रस्त्यांवर चिडीचूप शांतात होती. या शांततेमुळे घरातून बाहेर पडायला भीती वाटायची”, अशी माहिती आशिषने दिली.

“सुरुवातीला शहरात कुठेही जाण्या-येण्याला बंदी नव्हती. मात्र, कोरोना व्हायरस वाढल्यानंतर शहरात बंदी घालण्यात आली. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलं. आम्हाला मास दिले गेले. या सर्व घडामोडींमुळे आम्ही भारतात परतण्याचा निर्णय घेतला”, असं आशिषने सांगितलं.

भारतात कोरोनाचे 31 रुग्ण

कोरोना व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. कोरोनाचा पहिला रोगी हा चीनमध्ये आढळला. कोरोनामुळे चीनमध्ये 3 हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक अटेंडंस न करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातमी : वाशिममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखी जनजागृती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.