Photo Story: मुंबईकरांचं डोकं फिरलंय का?; धोक्याचा इशारा दिल्यानंतरही क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी!

धोक्याचा इशारा देऊनही मुंबईकर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (coronavirus: People flout social distancing norms in Crawford market in Mumbai)

Photo Story: मुंबईकरांचं डोकं फिरलंय का?; धोक्याचा इशारा दिल्यानंतरही क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी!
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 7:51 PM

मुंबई: कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे सावध राहा. निष्काळजीपणा करू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका. लॉकडाऊन करायचा की नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना कळकळीने सांगितलं. त्यानंतरही मुंबईकर बेफाम आणि बेफिकीर असल्याचं दिसून आलं आहे. धोक्याचा इशारा देऊनही मुंबईकर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (coronavirus: People flout social distancing norms in Crawford market in Mumbai)

कोरोनाचा संसर्ग पुन्हा फैलावत आहे. मुंबईकरांनी काळजी घेण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. तरीही मुंबईकर बेफिकीर असल्या सारखं वागत आहेत. काल गेट वे ऑफ इंडियावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मास्क न लावता लोक फिरत होते. तर आज मुंबईत दादरच्या मार्केटमध्ये आणि फोर्टमधील क्रॉफर्ड मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. जणू काही मुंबईत कोरोना नसल्याप्रमाणेच मुंबईकरांची मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे कोरोना नियमांचे तीन तेरा वाजले होते. पालिकेकडून या खरेदीदारांना दंडही आकारण्यात येत होता. मात्र, तरीही मुंबईकरांची गर्दी काही कमी होताना दिसत नव्हती.

क्रॉफर्ड मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नाही

आज दुपारी क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती. यावेळी मार्केटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. या मार्केटमधील सर्व दुकाने सुरू होती. अनेकजण डोक्यावर टोपली, बॉक्स आणिइतर सामान घेऊन जात होते. त्यातच मार्केटच्या गल्लीतून टॅक्सी जात असल्याने वाहतुकीची कोंडीही झालेली पाहायला मिळत होती. संपूर्ण परिसरात गजबजाट आणि गोंगाटा झाला होता.

Crawford market in Mumbai

मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

या गर्दीत अनेकांनी मास्क लावलेले दिसत होते. तर बरेचजण मास्क न लावताच फिरत होते. काहींनी तोंडाला मास्क लावले होते. पण नाकावर मास्क ठेवला नव्हता. शिवाय गर्दीतून एकमेकांना खेटून, रेटून आणि धक्का देत प्रत्येक जण मार्ग काढत होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले होते.

Crawford market in Mumbai

पुरुषच अधिक

दादर आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये आज प्रचंड गर्दी होती. पण मार्केटमध्ये महिलांपेक्षा पुरुषच अधिक प्रमाणात दिसून येत होते. त्यातही तरुणांची संख्या अधिक होती.

200 रुपये दंड, पण परिणाम नाही

या गर्दीत मास्क शिवाय फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून 200 रुपयांचा दंड आकारला जात होता. दंड भरल्यानंतर पुन्हा मुंबईकर गर्दीत जात असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग होत आहे. त्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे.

Crawford market in Mumbai

मुंबईची सद्यस्थिती काय?

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. (coronavirus: People flout social distancing norms in Crawford market in Mumbai)

मुंबईतील कोरोना अपडेट

24 तासात नवे रूग्ण – 921 24 तासात मृत्यू – 6 एकूण रूग्ण – 3,19,128 एकूण मृत्यू – 11,446 एकूण डीस्चार्ज – 3,00,959 अॅक्टीव्ह रूग्ण – 5859 (coronavirus: People flout social distancing norms in Crawford market in Mumbai)

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, आठ कर्मचाऱ्यांना लागण

(coronavirus: People flout social distancing norms in Crawford market in Mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.