नाशिकमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन?; छगन भुजबळांकडून संकेत
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. (Covid-19 cases surge, three weeks lockdown in nashik?)
लासलगाव: नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. लॉकडाऊन करायचा झाल्यास 8 किंवा 15 दिवसांचा करून चालणार नाही. तर किमान तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा लागणार आहे, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात तीन आठवड्याचा लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Covid-19 cases surge, three weeks lockdown in nashik?)
छगन भुजबळ यांनी येवला-लासलगाव मतदारसंघात अचानक कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली. भुजबळ यांनी प्रथमतः विंचूर येथे उभारण्यात आलेल्या खाजगी कोविड केअर सेंटरची पाहणी केली. तसेच डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सद्या 30 बेडस कार्यान्वित असून अधिक 10 ऑक्सिजन बेडस वाढविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
ही मनुष्य वाचवण्याची लढाई
जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. मनुष्य वाचविण्याची ही संकटाची लढाई असून खाजगी डॉक्टर, नर्स व स्वयंसेवी संस्थानी यांनीही या लढ्यात उतरावे, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच होम क्वॉरंटाईन रुग्ण घराबाहेर पडत असल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, असं सांगतानाच होम क्वॉरंटाईन रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसात तक्रार करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
राजकारणाचा विषय नाही
लॉकडाऊन हा विषय राजकारण करण्याचा विषय नाही. हा काही मैदान गाजवण्याचा विषय नाही. हा काही आंदोलनं करण्याचाही विषय नाही, असा टोला विरोधकांना लगावतानाच कोरोनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन चर्चा करण्यात यावी. याबाबत उपाययोजना सूचवण्यात याव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.
उड्डाणपुलाची पाहणी
भुजबळ यांनी यावेळी लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल व बायपास रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भूसंपदानाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून घ्याव्यात, असे आदेशही त्यांनी दिले. (Covid-19 cases surge, three weeks lockdown in nashik?)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 April 2021https://t.co/x62wzAztBy
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2021
संबंधित बातम्या:
मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली?; आता काँग्रेसचा फडणवीसांना सवाल
शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय, पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार
पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची तयारी, कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर
(Covid-19 cases surge, three weeks lockdown in nashik?)