नवी मुंबईत विशेष कोव्हिड लसीकरण सत्र, दिव्यांग, निराधार, व्याधीग्रस्त महिलांसाठी खास सुविधा
ऐरोली सेक्टर 17 मधील प्रेमदान आश्रमात असलेल्या निराधार, वयोवृध्द आणि विविध व्याधींनी ग्रस्त महिलांना आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते.
हर्षल भदाणे-पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : येथील ऐरोली सेक्टर 17 मधील प्रेमदान आश्रमात असलेल्या निराधार, वयोवृध्द आणि विविध व्याधींनी ग्रस्त महिलांना आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लसीकरण सत्र आयोजित करीत कोव्हिड-19 (Covid-19) वरील लसीकरण करण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या लसीकरण सत्राचा लाभ आश्रमातील 109 महिलांनी घेतला. (covid-19 vaccination session in Navi Mumbai, special facility for disabled, destitute, diseased women)
कोव्हिड-19 च्या पहिल्या लाटेत येथील 2 महिलांना तापाची लक्षणे जाणवल्याने त्याठिकाणी विशेष कोव्हिड तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 100 हून अधिक महिला कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. या सर्व महिलांची मनोवस्था आणि शारीरिक अपंगत्वाची स्थिती तसेच बहुतांशी महिलांचे 60 वर्षांपुढील वय आणि त्यांना असलेल्या विविध प्रकारच्या सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) ही स्थिती आव्हानात्मक होती. या सर्व बाबींचा विचार करून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आश्रमालाच कोव्हिड-19 केअर सेंटर म्हणून घोषित करीत या महिलांची विशेष काळजी घेण्यात आली. महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने या निराधार, दिव्यांग, व्याधीग्रस्त तसेच वयोवृद्ध महिलांची सेवा करताना आरोग्य सेवेसोबतच मानवतावादी दृष्टिकोन ठेवला आणि अतिशय समर्पित वृत्तीने काम केले.
अशीच भावना कायम राखत आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या महिलांकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. यामधील प्रत्येक लाभार्थी महिलेची सरकारच्या कोव्हिन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आणि लसीकरण करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून येथील निराधार, वयोवृध्द, मतिमंद तसेच विविध व्याधींनी त्रस्त महिलांचा विचार करून आयोजित केलेल्या या विशेष लसीकरण सत्राबद्दल संस्थेमार्फत समाधान व्यक्त करण्यात आले.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,32,364
देशात 24 तासात डिस्चार्ज –2,07,071
देशात 24 तासात मृत्यू –2713
एकूण रूग्ण – 2,85,74,350
एकूण डिस्चार्ज – 2,65,97,655
एकूण मृत्यू – 3,40,702
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 16,35,993
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 22,41,09,448 (New 132364 Corona Cases )
घराबाहेर खेळताना बिबट्याचा हल्ला, पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू https://t.co/tJiTnwTWR7 #LeopardAttack | #JammuKashmir | #Budgam | #Leopard | #AdhaShakil
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
संबंधित बातम्या
सीरम इन्स्टिट्यूट स्पुतनिक वी लसीची निर्मिती करणार? केंद्र सरकारकडे परवागनी मागितली
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींची संख्याही घसरली
(covid-19 vaccination session in Navi Mumbai, special facility for disabled, destitute, diseased women)