Video| केळवे -माहीममधील धरणाला भगदाड, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी
पालघर जिल्ह्यातील झांझरोळी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. केळवे -माहीम येथील धरणाला मोठे भगदाड पडले आहे. भगदाडामुळे धरणातून पाण्याची गळती सुरू झाली आहे.
पालघर : जिल्ह्यातील झांझरोळी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. केळवे -माहीम येथील धरणाला मोठे भगदाड पडले आहे. भगदाडामुळे धरणातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. धरणातून पाण्याची गळती सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल
झांझरोळी परिसरात असलेल्या धरणाला भगदाड पडले असून, पाण्याची गळती सुरूच आहे. पाण्याची गळती होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
17 गावांचा पाणीपुरवठा बंद
धरणाला भगदाड पडल्याने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच धरण परिसरातील काही गावातील लोकांचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर देखील करण्यात येणार आहे. धरणाला गळती लागल्यामुळे सुमारे 17 गावांचा पाणीपुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. धरणाला भगदाड कसे पडले याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटलांच्या पुनर्विचार याचिकेवर होणार सुनावणी
शिवसेनाचा साधा सरपंचही नाही गोव्यात, या प्रमोद सावंतांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर!
खुलताबाद पंचायत समितीच्या उभसभापतीपदी प्रभाकर शिंदेंची निवड, भाजप कार्यकर्त्यांचा आनंदात जल्लोष