मी तर खानदानी पाटील, दुसऱ्यांच्या… गौतमी पाटील हिच्यावर बड्या कलाकाराची टीका

एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. अशातच राधा पाटीलने तिच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

मी तर खानदानी पाटील, दुसऱ्यांच्या... गौतमी पाटील हिच्यावर बड्या कलाकाराची टीका
Gautami PatilImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 9:27 AM

संदीप शिंदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 2 नोव्हेंबर 2023 : गौतमी पाटील हे नाव अनेकांसाठी काही नवीन नाही. सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून तिने ख्याती मिळवली आणि तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे. गौतमीचा एकही कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला नाही असं होत नाही. त्याचप्रमाणे वाद आणि गौतमी पाटील हेसुद्धा जणू एक समीकरणच बनलं आहे. कधी तिच्या कार्यक्रमात राडे होताना दिसतात, तर कधी पोलीस संरक्षण पुरवू न शकल्याने कार्यक्रम रद्द झाल्याच्याही बातम्या असतात. गौतमी पाटीलनंतर आणखी एक डान्सर तरुणाईमध्ये विशेष चर्चेत आली, ती म्हणजे राधा पाटील. इन्स्टाग्रामवर राधा पाटील मुंबईकर या नावाने ती चांगलीच प्रसिद्ध आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना तरुणांची प्रचंड गर्दी असते. आता टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत राधा पाटीलने गौतमीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

काय म्हणाली राधा पाटील?

“लावणीचे पावित्र्य जपण्यासाठी या क्षेत्रात नव्याने आलेल्या कलाकारांनी कार्यक्रमात अश्लीलपणा करु नये. लावणीच्या कार्यक्रमात सध्या जो काही अश्लीलपणा सुरु आहे, तो नाही झाला पाहिजे. असे प्रकार बंद झाले पाहिजेत. नविन येणाऱ्या कलाकारांच्या घाणेरड्या डान्सवर समाजातून टीका होणारच ना. सुरेखा पुणेकर सांगतात त्याप्रमाणे, असं जर होत राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही,” अशी अप्रत्यक्ष टीका राधाने गौतमीवर केली आहे.

हे सुद्धा वाचा

गौतमीच्या आडनावावरून टोला

“कलेशी प्रामाणिक राहून नृत्य केलं की नाव होतंच. गौतमी चांगलं नाचते. शेवटी आपण कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते. मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काय माहीत नाही. मी तर खानदानी पाटील आहे. पाटील असल्याचे सगळे पुरावे देऊ शकते,” असंही ती पुढे म्हणाली. याआधी गौतमीच्या पाटील या आडनावावरून बराच वाद झाला होता. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला होता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.